उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री (Uttar Pradesh Chief Minister) योगी आदित्यनाथ (Yogi Aditya Nath) यांनी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे (Prime Minister Narendra Modi ) कौतुक केले आणि म्हटले की, आज पाकिस्तान (Pakistan) आणि अफगाणिस्तान (Afghanistan) तालिबानमुळे (Taliban) हैराण झाले आहेत, पण तालिबानला माहित आहे की त्यांनी भारताच्या दिशेने पाऊल टाकले तर त्यांच्यावर 'एअर स्ट्राइक' (Air strike) होईल. रविवारी लखनौ येथील इंदिरा गांधी फाउंडेशन येथे भाजपच्या सामाजिक संवाद अभियानांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या सामाजिक प्रतिनिधी परिषदेच्या कार्यक्रमात योगी आदित्यनाथ बोलत होते. (If Taliban moves towards India Like Afghanistan & Pakistan then Air Strike is ready says Yogi AdityaNath)
“यावेळी प्रत्येक व्यक्तीला जागृत व्हायला हवे, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश शक्तिशाली आहे आणि इतर कोणताही देश भारताकडे डोळे वर करून पाहण्याची हिंमत करू शकत नाही. आज पाकिस्तान आणि अफगाणिस्तान तालिबानमुळे हैराण आहेत, पण तालिबानला माहीत आहे की त्यांनी भारताच्या दिशेने वाटचाल केली तर त्यांच्यावर हवाई हल्ला होईल." असे म्हणत मुख्यमंत्री योग आदित्यनाथ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं तोंड भरून कौतुक केलं आहे.
त्याचबरोबर योगिंनी , "महम्मद घोरी आणि हल्लेखोर गाझीचे अनुयायी व्होट बँकेच्या भीतीने हिंदू रक्षक महाराजा सुहेलदेव यांच्या नावाला घाबरतात. सुहेलदेवाचे स्मारक बांधल्यावर लोक गाझींना विसरतील आणि राजकीय ब्लॅकमेलर्सना जनता कचऱ्यात फेकून देईल, या भीतीने ते राष्ट्ररक्षक सुहेलदेव यांच्या स्मारकाला अप्रत्यक्षपणे विरोध करत होते. "असा जोरदार हल्लाबोल विरोधकांवर केला आहे.
ज्यांनी अयोध्येत रामभक्तांची निर्घृण हत्या केली ते देशातील जनतेची माफी मागण्याची हिंमत दाखवू शकतील का? असा सवाल त्यांनी नाव ना घेता समाजवादी पार्टीला विचारला आहे . त्याचबरोबर न्यायालयानेही शेवटी आम्हाला योग्य म्हणून मान्य केले आणि आज अयोध्येत राम मंदिर बांधले जात आहे अशा भावना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी यावेळी व्यक्त केल्या आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.