सरकारने बुधवारी संसदेत सांगितले की, 2020 मध्ये मद्यपान करून वाहन चालवल्यामुळे 8,355 रस्ते अपघात झाले. त्याचवेळी चुकीच्या दिशेने वाहन चालवल्यामुळे 20,228 अपघात झाले. राज्यसभेत एका लेखी उत्तरात केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) म्हणाले की, 2020 या वर्षात देशात एकूण 3,66,138 रस्ते अपघात झाले. (India Latest News Update)
ते म्हणाले की, लाल दिव्याचे उल्लंघन केल्यामुळे 2,721 रस्ते अपघात झाले आणि वाहन चालवताना मोबाईलवर बोलल्यामुळे 6,753 अपघात झाले. केंद्रीय मंत्री म्हणाले की, त्या वर्षी 62,738 रस्ते अपघात इतर कारणांमुळे झाले. ते म्हणाले की, 2021 आणि 2020 मध्ये मद्यपान करून वाहन चालवल्याबद्दल 48,144 आणि 56,204 चालान जारी करण्यात आले.
गडकरींच्या म्हणण्यानुसार, 2021 मध्ये नवीन वाहतूक कायदे आणि कठोर दंड याद्वारे उत्तर प्रदेशने सर्वाधिक 447 कोटी रुपये जमा केले. यानंतर हरियाणाने 326 कोटी, राजस्थानने 267 कोटी आणि बिहारने 258 कोटी रुपये जमा केले.
2020-21 मध्ये टोलमधून 27,744 कोटी मिळाले
गडकरी म्हणाले की 2020-21 आणि 2021-22 साठी अनुक्रमे भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) टोल प्लाझांकडून 27,744 कोटी रुपये आणि 24,989 कोटी रुपये टोल म्हणून जमा झाले.
महामार्गालगत 244.68 लाख रोपे लावण्यात आली
दुसर्या प्रश्नाला उत्तर देताना गडकरी म्हणाले की, 2015 मध्ये सुरू करण्यात आलेल्या हरित महामार्ग धोरणांतर्गत गेल्या वर्षी डिसेंबरपर्यंत 51,178 किमी परिसरात पसरलेल्या 869 राष्ट्रीय महामार्गांवर एकूण 244.68 कोटी रोपांची लागवड करण्यात आली होती. एका प्रश्नावर मंत्री म्हणाले की 2020-21 मध्ये सरकारला राष्ट्रीय परवानग्या जारी करण्यापासून 1,636 कोटी रुपये मिळाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.