तिहार तुरुंगातील 82 कर्मचारी सुकेश चंद्रशेखरच्या सेवेत गुंतले होते, EOW ने केला गुन्हा दाखल

तिहार तुरुंगात कोणत्याही प्रकारची शिक्षा भोगण्याऐवजी सुकेश चंद्रशेखर आपले जीवन अगदी आरामात जगत आहे.
Sukesh Chandrashekhar
Sukesh ChandrashekharDainik Gomantak
Published on
Updated on

सुकेश चंद्रशेखरला (Sukesh Chandrasekhar) मनी लाँड्रिंग (Money Laundering) आणि अनेकांना फसवल्याच्या आरोपाखाली तिहार तुरुंगात ठेवण्यात आले आहे. सध्या तिहार तुरुंगात कोणत्याही प्रकारची शिक्षा भोगण्याऐवजी सुकेश चंद्रशेखर आपले जीवन अगदी आरामात जगत आहे. (82 employees of Tihar Jail were involved in the service of Sukesh Chandrasekhar EOW filed a case)

Sukesh Chandrashekhar
Eid Al Adha 2022: गोव्यासह दिल्लीत बकरी ईद उत्साहात साजरी

खरं तर, तिहार तुरुंगात बंद असलेल्या सुकेश चंद्रशेखर या गुंडाला लक्झरी पुरवल्याच्या प्रकरणाची EOW सध्या चौकशी करत आहे. EOW ने सुकेश चंद्रशेखरला मदत केल्याबद्दल तिहार तुरुंगातील 82 कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे.

सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर EOW ने ही चौकशी सुरू केली. EOW ने आपल्या तपासात मोठा दावा करून सर्वांना आश्चर्यचकित केले आहे आणि ते असे की, सुकेश चंद्रशेखरने तिहार तुरुंगातील अधिकारी/कर्मचाऱ्यांना चैनीच्या वस्तू देण्यासाठी सुमारे दीड कोटी रुपये दिले होते.

EOW ला 82 कर्मचारी दोषी आढळले

तपासादरम्यान, EOW ला तिहार तुरुंगातील 82 अधिकारी/कर्मचारी सुकेश चंद्रशेखरला मदत केल्याबद्दल दोषी आढळून आले आहेत. तर त्या 82 अधिकारी/कर्मचाऱ्यांची यादीही तयार करण्यात आली आहे. नुकतेच चंद्रशेखरला तुरुंगातून पत्र पाठवताना पकडण्यात आले होते.

Sukesh Chandrashekhar
आगामी काळात भारतात फक्त इलेक्ट्रिक वाहनं रस्त्यावर दिसतील - मंत्री नितीन गडकरी

यादरम्यान, कारागृहातील सीसीटीव्ही रेकॉर्डिंग पाहता सुकेश चंद्रशेखर याने कारागृहातून पत्र पाठवण्यासाठी नर्सिंग स्टाफच्या कंत्राटी कर्मचाऱ्याचा वापर केल्याचे उघड झाले आहे तर त्याच्यासोबत सुकेशने काही कागदपत्रे दिली. सीसीटीव्ही रेकॉर्डिंगमध्ये एक नर्सिंग कर्मचारी सुकेश चंद्रशेखर यांच्याकडून काही कागदपत्रे घेताना दिसून आली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com