Coromandel Express Accident
2 जून रोजी ओडिशातील बालासोर (ओडिशा ट्रेन अपघात) येथे भीषण रेल्वे अपघात झाला. शेकडो लोकांना जीव गमवावा लागला, हजाराहून अधिक लोक जखमी झाले. वेदनादायक चित्रे आणि कथा समोर आल्या.
कुठे एक बाप मृतदेहांच्या ढिगाऱ्यात आपल्या मुलाला शोधताना दिसला, तर एका घरातील तीन मुले या जगातून कायमचे निघून गेले. एका व्यक्तीने अपघातात आपली पत्नी आणि मुले गमावली. त्यानंतर भरपाईचे पैसे मिळाल्यावर तो ढसाढसा रडला. म्हणाला, 'या पैशाचं काय करू?'
रेल्वे रुळांवर विखुरलेल्या सामानाचेही चित्र समोर आले. कुठे चपला पडलेल्या दिसल्या तर कुठे अख्खी पिशवी. उघडी झालेली पिशवी, विखुरलेली खेळणी, अर्धी रिकामी असलेली पाण्याची बाटली.
यावेळी आशा अनेक आठवणी या ढिगाऱ्यात गाडल्या गेल्या आणि दुखाच्या काळात वहिच्या काही पानांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या पानांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या पानांवर प्रेमकविता लिहिल्या आहेत.
अपघातस्थळी एक रंगीबेरंगी वही सापडली आहे. ज्यावर लाल, निळा, हिरवा आणि गुलाबी रंगाच्या फुलांचे चित्र बनवले होते. आणि त्यासोबत दोन ओळींची कविता लिहिली. बंगाली भाषेत लिहिलेल्या कवितेच्या काही ओळी अशा आहेत,
'ओलपो ओलपो मेघ थेके वृष्टी सृष्टी होई. छोटा छोटा गोलपो थेके भालोबाशा सृष्टी होई.'
याचा अर्थ,
'जसा पाऊस लहान लहान ढगांमधून पडतो, त्याचप्रमाणे छोट्या छोट्या कथा प्रेमाला जन्म देतात.'
आता ही कविता कोणी लिहिली? कोणालाही माहित नाही. लेखक जिवंत आहे की नाही हेही माहित नाही. ही वही एका पिशवीजवळ पडून होती. पण त्यावर ना कोणाचे नाव होते ना पत्ता. या वहीच्या प्रत्येक पानावर प्रेमाच्या कविता लिहिल्या आहेत. प्रेम-संबंधातील चढ-उतार या कवितांमध्ये नोंदवले गेले आहेत.
या रेल्वे अपघातात एकूण 275 जणांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याच वेळी, 1000 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.
यापूर्वी, 2 जूनच्या संध्याकाळी चेन्नईकडे जाणारी शालीमार-चेन्नई सेंट्रल कोरोमंडल एक्सप्रेस रुळावरून घसरल्याने बालासोर रेल्वे अपघात झाला होता.
शेजारच्या रुळावर उभ्या असलेल्या मालगाडीला तो धडकला. त्यामुळे कोरोमंडल एक्स्प्रेसचा मागचा डबा तिसऱ्या ट्रॅकवर पडला. तिसऱ्या ट्रॅकवर समोरून येणारी बेंगळुरू-हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेस कोरोमंडल एक्स्प्रेसच्या डब्यांना धडकली आणि रुळावरून घसरली.
अपघाताबाबत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगमुळे हा अपघात झाला. त्याची पडताळणी केली जात आहे.
अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, अपघाताचे कारण आणि त्याला जबाबदार असलेल्या लोकांची ओळख पटली आहे. त्याचबरोबर या रेल्वे अपघाताची सीबीआय चौकशी करण्याची शिफारस रेल्वेमंत्र्यांनी केली आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.