5 Jawan Dead: अरूणाचल प्रदेशात हेलिकॉप्टर दुर्घटनेतील सर्व पाच जवान शहीद

तीन मेजर दर्जाच्या अधिकाऱ्यांचा समावेश; सियांग येथे दुर्गम भागात कोसळले होते रूद्र हेलिकॉप्टर
Rudra Helicopter
Rudra Helicopter Dainik Gomantak
Published on
Updated on

5 Jawan Dead: अरुणाचल प्रदेशातील सियांग जिल्ह्यात भारतीय लष्कराचे रूद्र हेलिकॉप्टर कोसळले होते. या अपघातात हेलिकॉप्टरमधील सर्व पाचही जवान शहीद झाले आहेत. टुटिंग या लष्कराच्या मुख्यालयापासून 25 किलोमीटवर असलेल्या सिंगिंग या गावाजवळ हा अपघात घडला होता.

Rudra Helicopter
India's Forex Reserves: भारताचा परदेशी चलन साठा दोन वर्षातील निचांकी पातळीवर

मेजर विकास भांभू, मेजर मुस्तफा बोहरा, सीएफए टेक एव्हीएन अश्विन के. व्ही., एसएव्ही-ओपीआर बिरेश सिन्हा, एनके-ओपीआर रोहिताश्व कुमार अशी शहीद जवानांची नावे आहेत. या दुर्घटनेपुर्वी हेलिकॉप्टरमधील जवानांनी एअर ट्रॅफिक कंट्रोलला मे डे कॉल केला होता. आणिबाणीच्या परिस्थितीत हा मे डे कॉल केला जात असतो.

अरूणाचल प्रदेशात शुक्रवारी लष्कराचे अॅडव्हान्स्ड लाईट कॉम्बॅट हेलिकॉप्टर रूद्र कोसळले होते. अप्पर सियांग जिल्ह्यात हा अपघात घडला होता. लष्कराच्या टुटिंग येथील मुख्यालयापासून 25 किलोमीटरवर असलेल्या सिंगिंग या गावाजवळ हा अपघात घडला होता. हा भाग अत्यंत दुर्गम असल्याने तसेच तिथे पोहचायला रस्ता नसल्याने तत्काळ बचावपथक घटनास्थळी पोहचू शकत नव्हते.

Rudra Helicopter
Rozgar Mela: PM मोदींचा शब्द ! 75000 जणांना मिळाली नियुक्ती पत्र

दरम्यान, या महिन्याच्या सुरवातीलात अरूणाचल प्रदेशच्या तवांग येथेही लष्कराच्या हेलिकॉप्टरला झालेल्या अपघातात भारतीय लष्करातील पायलटचा मृत्यू झाला होता. काही दिवसांपुर्वीच केदारनाथ धाम येथे खासगी एजन्सीच्या हेलिकॉप्टरला झालेल्या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला होता. यात भाविकांसह पायलटचा समावेश होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com