Rozgar Mela: PM मोदींचा शब्द ! 75000 जणांना मिळाली नियुक्ती पत्र

PM Modi in Rozgar Mela: देशात रोजगार मेळाव्याचे आयोजन केले जात आहे.
PM Modi
PM Modi Twitter/ANI
Published on
Updated on

PM Modi Diwali Gift: देशात रोजगार मेळाव्याचे आयोजन केले जात आहे. हा रोजगार मेळा आज 22 ऑक्टोबरपासून सुरु झाला आहे. पीएम मोदींनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे रोजगार मेळाव्याचा शुभारंभ केला. यावेळी बोलताना पंतप्रधानांनी सांगितले की, 'यापूर्वीही नियुक्तीपत्रे देण्यात आली होती. मात्र आतापासून केंद्र एकाच वेळी नियुक्ती पत्रे देईल.'

दरम्यान, पीएम मोदी म्हणाले की, 'विकसित भारताचा (India) संकल्प पूर्ण करण्यासाठी आम्ही स्वावलंबी भारताच्या मार्गावर चालत आहोत. यामध्ये नवनवीन शोध, उद्योजक, शेतकरी आणि सहकारी संस्थांचा मोठा वाटा आहे. स्टार्टअप इंडिया मोहिमेने देशातील तरुणांची क्षमता जगभरात प्रस्थापित केली आहे. 2014 पर्यंत देशात केवळ काहीशे स्टार्टअप होते, आजपासून ही संख्या 80000 हून अधिक झाली आहे.'

PM Modi
Rojgar Mela: पंतप्रधान मोदी देणार देशातील तरुणांना रोजगाराची भेट, 10 लाख रोजगार देण्याचे लक्ष्य

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, 'आज भारत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था (Economy) आहे. 7-8 वर्षात आम्ही 10 वरुन 5 वर झेप घेतली आहे. हे शक्य झाले, कारण गेल्या 8 वर्षात देशाच्या अर्थव्यवस्थेतील ज्या उणिवा अडथळे निर्माण करत होत्या त्या आम्ही दूर केल्या आहेत.'

PM Modi
Ration Card: मोफत राशन घेणाऱ्यांना लागली लॉटरी, सरकारने घेतला मोठा निर्णय

दुसरीकडे, आज ज्या 75 हजार तरुणांना पीएम मोदींनी नियुक्ती पत्रे दिली, त्यांची पोस्टिंग 38 मंत्रालये/विभागांमध्ये वेगवेगळ्या स्तरावर असेल. त्यांचे जॉइनिंग ग्रुप अ आणि ब (राजपत्रित), गट ब (अराजपत्रित) आणि गट क मध्ये असेल.

केंद्र सरकारच्या (Central government) म्हणण्यानुसार, त्यांच्या पदांमध्ये केंद्रीय सशस्त्र दलांव्यतिरिक्त उपनिरीक्षक, कॉन्स्टेबल, लोअर डिव्हिजन क्लर्क (एलडीसी), स्टेनो, पर्सनल असिस्‍टेंट्स, आयकर निरीक्षक आणि मल्टी-टास्किंग स्टाफ (एमटीएस) यांचा समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Rahul Gandhi Amit Shah Firing Allegation
Young biker losing control while performing a dangerous stunt on a public road
7000 Students Tested Positive HIV
Priyanka Gandhi Attack PM Modi
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com