वादा किया हैं तो निभाना पडेगा! सेवा पुरवण्याचे आश्वासन न पाळणाऱ्या PG Hostel ला 40 हजारांचा दंड

Consumer Disputes Redressal: पाहाणी दरम्यान, हे उघड झाले की वसतिगृहाने या वर्षी मार्चमध्ये त्यांचे शुल्क 6,250 रुपयांवरून 12,000 रुपयांपर्यंत वाढवले ​​होते, परंतु त्यांनी दिलेल्या आश्वासनानुसार ते सेवा प्रदान करण्यात अयशस्वी झाले.
40,000 fine on PG Hostel for non-fulfillment of service promises.
40,000 fine on PG Hostel for non-fulfillment of service promises.Dainik Gomantak
Published on
Updated on

40,000 fine on PG Hostel for non-fulfillment of service promises by District Consumer Disputes Redressal Commission-III Hyderabad:

जिल्हा ग्राहक विवाद निवारण आयोग-III (हैदराबाद) ने नुकतेच, महिलांसाठी असलेल्या सिग्नेचर ऑरा लक्झरी पीजी हॉस्टेलला त्यांच्या माहितीपत्रकात नमूद केलेल्या सुविधा प्रदान करण्यात अयशस्वी ठरल्याबद्दल हॉस्टेलमध्ये प्रवेश घेतलेल्यांना 40,000 रुपये भरपाई म्हणून देण्याचे निर्देश दिले आहेत.

याव्यतिरिक्त, हॉस्टेलच्या अधिकाऱ्यांना माहितीपत्रकात दिलेल्या सुविधांची तरतूद सुनिश्चित करण्याचे आणि माहितीपत्रकानुसार निवास व्यवस्था राखण्याचे निर्देश दिले आहेत.

तक्रारदार विनिला पी या 11 एप्रिल 2022 पासून पीजी हॉस्टेलमध्ये राहत होत्या. तथापि, विनिलाने असा दावा केला की, पुरवण्यात येत असलेल्या सुविधा समाधानकारक नाहीत आणि त्या माहितीपत्रकात दिलेल्या जाहिरातीशी सुसंगत नाहीत.

सर्व उपलब्ध पर्यायांचा वापर करुनही, विनिला यांना हॉस्टेलने कोणतीही समाधानकारक तरतूद करुन दिली नाही. त्यामुळे विनीला यांनी नुकसान भरपाईची मागणी करणारी तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला.

40,000 fine on PG Hostel for non-fulfillment of service promises.
विवाहाच्या वैधतेसाठी भटजींची गरज नाही: सुप्रीम कोर्ट

पाहाणी दरम्यान, हे उघड झाले की हॉस्टेलने या वर्षी मार्चमध्ये त्यांचे शुल्क 6,250 रुपयांवरून 12,000 हजार रुपयांपर्यंत वाढवले ​​होते, परंतु आश्वासनानुसार सेवा प्रदान करण्यात ते अयशस्वी झाले.

खंडपीठाने म्हटले, “या आयोगाचे ठाम मत आहे की, हॉस्टेल व्यवस्थापन जाहिरातीप्रमाणे सुविधा देण्यात अपयशी ठरले आहे. हे सेवेतील कमतरता आणि अनुचित व्यापार पद्धती आहे आणि तक्रारदार मानसिक त्रास आणि आर्थिक त्रास दोन्हीसाठी भरपाईसाठी पात्र आहे.”

भरपाईच्या रकमेव्यतिरिक्त, आयोगाने हॉस्टेलला तक्रारीच्या खर्चासाठी अतिरिक्त 5,000 हजार रुपये देण्याचे निर्देश दिले.

40,000 fine on PG Hostel for non-fulfillment of service promises.
किशोरवयीन मुलींनी दोन मिनिटांच्या आनंदाऐवजी आपल्या लैंगिक इच्छांवर नियंत्रण ठेवावे: हायकोर्ट

हा निर्णय सर्व पीजी हॉस्टेल सेवा पुरवणाऱ्यांना एक स्मरणपत्र म्हणून काम करतो की, त्यांनी ग्राहकांना दिलेल्या त्यांच्या वचनबद्धतेचे पालन केले पाहिजे. तसेच त्यांनी दिलेली आश्वासने पूर्ण न केल्यास परिणामांना सामोरे जाण्यास तयार राहावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com