4 Union Ministers resign before cabinet expansion
4 Union Ministers resign before cabinet expansionDainik Goamntak

Cabinet Expansion- मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी केंद्रातील 4 मंत्र्यांचा राजीनामा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार(Cabinet Expansion) आज सांयकाळी होणार आहे. नरेंद्र मोदींच्या दुसऱ्या टर्ममधील हा पहिला मंत्रिमंडळ विस्तार असेल
Published on

पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाचा(Cabinet Expansion) विस्तार आज सांयकाळी होणार आहे. नरेंद्र मोदींच्या दुसऱ्या टर्ममधील हा पहिला मंत्रिमंडळ विस्तार असेल. केंद्रीय मंत्री सदानंद गौडा(Sadanad Gowda), शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक(Ramesh Pokhriyal), कामगारमंत्री संतोष गंगवार(Santosh Gangway) आणि देबोश्री चौधरी(Deboshri Choudhary) यांनी राजीनामा दिला आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार अशा बातम्यांनी दिल्लीसह देशाच राजकारण तापले होते. नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यापासून हा केंद्रीय मंत्रिमंडळाचा पहिलाच विस्तार होणार होता त्यामुळे या मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लागणार यासह हा विस्तार कधी होणार याकडे साऱ्या देशाचं लक्ष लागले होते पण हि प्रतीक्षा आता संपली आहे कारण हा विस्तार आज सायंकाळी होणार आहे.


4 Union Ministers resign before cabinet expansion
केंद्रीय मंत्रिमंडळाचा उद्या होणार विस्तार; 'या' चेहऱ्यांना मिळणार संधी

तत्पूर्वी दिल्लीचे राजकारण जोरात सुरु आहे कारण विद्यमान मंत्रिमंडळात अनेक बदल होताना दिसत आहेत.कारण कालच केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री थावर चंद गेहलोत यांची राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर आज विस्ताराच्या अगदी काही तासापूर्वी संतोष गंगवार, केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनाही बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. यात महिला व बाल विकास राज्यमंत्र्यांनाही राजीनामा घेण्यात आला आहे.

केंद्रीय सामाजिक न्यायमंत्र्यांपासून झाली. केंद्र सरकारने ८ राज्याचे राज्यपाल बदलत असताना केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री थावर चंद गेहलोत यांची कर्नाटकच्या राज्यपालपदी नियुक्ती करत त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला.


4 Union Ministers resign before cabinet expansion
Central Ministry: राणेंचं मंत्रिपद निश्चित !

मंत्रिमंडळ विस्तार करताना विविध राज्यांच्या विधानसभा आणि २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुका जिंकण्याच्या दृष्टीने भाजप रणनीती आखणार हे नक्की होत आणि तसेच होताना दिसत आहे . सध्या केंद्रीय मंत्रिमंडळात ५३ मंत्री आहेत मात्र आता यातल्याच काही मंत्र्यांनी राजीनामा दिल्याने आता नेमका कसा फेरबदल होऊन एकूण किती जणांना संधी मिळेल आणि आज स्थापन होणारे मोदींचे नवीन मंत्रिमंडळ कसे असेल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com