1984 Roits: राजीव गांधींच्या मित्रावर 39 वर्षात चौथ्यांदा सीबीआयकडून चार्जशीट

Jagdish Taitalar: 1984 मध्ये माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर दिल्लीत झालेल्या दंगली प्रकरणी सीबीआयने तब्बल 39 वर्षांनी कॉंग्रेस नेत जगदीश टायटलर यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे.
CBI
CBIDainik Gomantak

Jagdish Taitalar: 1984 मध्ये माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर दिल्लीत झालेल्या दंगली प्रकरणी सीबीआयने तब्बल 39 वर्षांनी कॉंग्रेस नेत जगदीश टायटलर यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. विशेष म्हणजे टायटलर हे दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे जवळचे मित्र म्हणून ओळखले जातात.

हे आरोपपत्र दाखल झाल्यानंतर शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हरमीत काल्का आणि सरचिटणीस सरदार जगदीप सिंह कॅनहॉल यांनी आनंद व्यक्त केला आहे.

सीबीआयने (CBI) आरोपपत्रात म्हटले आहे की, टायटलर यांच्याविरोधात खटला चालवण्यासाठी आमच्याकडे नवीन पुरावे उपलब्ध झाले आहेत. यामध्ये त्यांच्या आवाजाचा नमुना सर्वात महत्वाचा आहे.

दंगलीच्या वेळी एका विशिष्ठ समूदायाच्या विरुद्ध जमावाला भडकवणाऱ्या भाषणाचा व्हीडिओ आमच्या हाती आला आहे. यातील आवाज टायटलर यांच्या आवाजाशी जुळला आहे.

CBI
Jammu And Kashmir: G20 बैठकीपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये NIA ची मोठी कारवाई, जैश-ए चा दहशतवादी अटकेत!

2018 मध्ये मनजीत सिंह जीके यांनी स्टिंग व्हीडिओ व्हायरल केला होता. तेव्हा या घटनेला नवे वळण मिळाले होते.

हा व्हीडिओ एका व्यावसायिकाने आपल्याला पोस्टाद्वारे पाठवल्याचा दावा त्यावेळी मनजीत सिंह जीके यांनी केला होता.

या व्हीडोओमध्ये जगदीश टायटलर जमावाला भडकवताना दिसत आहेत. यामध्ये चित्र स्पष्ट नसले तरी आवाज स्पष्ट येत होता. आणि हाच पुरावा सीबीआयसाठी महत्त्वाचा ठरला.

नानावटी आयोग

केंद्र सरकारने (Central Government) सन 2000 मध्ये या प्रकरणाच्या चौकशीसाठी न्यायमूर्ती नानावटी आयोगाची स्थापना केली.

आयोगाने दिलेल्या अहवालानंतर गृहमंत्रालयाने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला. यामध्ये सन 2005 मध्ये सीबीआयने दंगली प्रकरणी अनेक बड्या नेत्यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल केले होते.

CBI
Jammu And Kashmir: श्रीनगरमध्ये हाय अलर्ट! G-20 बैठकीपूर्वी ISI चे K-2 डेस्क सक्रिय; आत्मघातकी हल्ल्याचा धोका

तीन क्लोजर रिपोर्ट आणि चौथ्यांदा चार्जशीट

28 ऑक्टोबर 2007

1884 च्या दंगली प्रकरणी जगदीश टायटलर यांना क्लीनचीट देणार पहिला क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आला. मात्र, न्यायालयाने हा रिपोर्ट फेटाळत पुन्हा चौकशीचे आदेश दिले.

2 एप्रिल 2002

सीबीआयने यावेळी पुन्हा एकदा खटला बंद करण्याची शिफारस करत पुराव्याशिवाय एखाद्यावर कशी कारवाई करायची असा प्रश्न उपस्थित केला. मात्र, दंगलीत मृताच्या पत्नीची बाजू ऐकल्यानंतर न्यायालयाने पुन्हा चौकशीचे आदेश दिले.

24 मार्च 2015

तपासाअभावी सीबीआयने खटला बंद करण्याची विनंती केली. यावेळीही दंगलीत मृताची पत्नी आपल्या म्हणण्यावर ठाम राहिली. त्यामुळे न्यायालयाने क्लोजर रिपोर्ट पुन्हा फेटाळला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com