Sukma Naxalite Attack: छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात 3 जवान शहीद

पोलिस-नक्षलवाद्यांमध्ये चकमक, गस्त वाढवली
Naxal Attack in Chhattisgarh | File Photo
Naxal Attack in Chhattisgarh | File PhotoDainik Gomantak
Published on
Updated on

Sukma Naxalite Attack: छत्तीसगडमधील सुकमा येथे पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली असून यामध्ये 3 डीआरजी जवान शहीद झाले आहेत. तर 2 जवान जखमी झाल्याचे वृत्त आहे. कुंडा आणि जागरगुंडा येथे ही चकमक झाल्याचे सांगण्यात येत आहे.

सकाळी 8.30 वाजता चकमक सुरू झाली. नक्षलवादी आधीच जवानांच्या मागावर बसले होते. त्यांनी जवानांवर गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरात जवानांनीही गोळीबार केला. यात तिघा जवानांचा मृत्यू झाला.

Naxal Attack in Chhattisgarh | File Photo
Sonia Gandhi Retirement: सोनिया गांधी सक्रिय राजकारणातून निवृत्त होणार; रायपूर अधिवेशनात दिले संकेत

पोलिस महानिरीक्षक (बस्तर श्रेणी) सुंदरराज पी. यांनी सांगितले की, डीआरजीचे पथक शोध मोहिमेवर असताना जागरगुंडा आणि कुंडा गावांमध्ये सकाळी 9 वाजता चकमक सुरू झाली. राजधानी रायपूरपासून 400 किमी अंतरावर असलेल्या जागरगुंडा पोलीस स्टेशन परिसरात ही घटना घडली.

या चकमकीत एएसआय रामुराम नाग, सहाय्यक हवालदार कुंजम जोगा आणि शिपाई वंजाम भीमा शहीद झाले आहेत. घटनास्थळी अतिरिक्त फौजफाटा पाठवण्यात आला आहे.

Naxal Attack in Chhattisgarh | File Photo
INS SindhuKesari: चीन टेन्शनमध्ये! भारतीय नौदलाच्या पाणबुडीने प्रथमच केली 'ही' अचाट कामगिरी

जागरगुंडाजवळ नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात 3 जवान शहीद झाल्याबद्दल मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. नक्षलवाद्यांच्या या भ्याड कृत्याचा निषेध करत मुख्यमंत्री बघेल म्हणाले की, जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही.

भाजप नेते राजेश मुनत यांनी नक्षलवादी हल्ल्याबाबत राज्यातील काँग्रेस सरकारवर निशाणा साधला. त्यांनी म्हटले आहे की, पुन्हा बलिदान! सुकमा येथे नक्षल चकमकीत ३ जवान शहीद झाल्याची दुखद माहिती मिळत आहे.

मी शूर जवानांना श्रद्धांजली अर्पण करतो. छत्तीसगडमध्ये नक्षलवादाची समस्या वाढली आहे. हे काँग्रेस पक्षाने आपल्या अधिवेशनात मान्य करावे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com