बिहारमध्ये विषारी दारू पिल्याने 25 जणांचा मृत्यू

बिहारमध्ये होळी साजरी करताना विषारी दारू प्यायल्याने अनेक जण पडले आजारी
25 people died after drinking poisonous liquor In Bihar
25 people died after drinking poisonous liquor In Bihar Dainik Gomantak

बिहार: राज्यातील तीन जिल्ह्यांमध्ये होळी साजरी करताना बनावट दारू प्यायल्याने 25 जणांचा मृत्यू झाला आहे. विषारी दारू पिल्याने मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यातील 25 पैकी 10 मृत्यू फक्त बांका जिल्ह्यात झाले आहेत. (25 people died after drinking poisonous liquor In Bihar)

25 people died after drinking poisonous liquor In Bihar
J&K बँकेशी संबंधित 20 लोकांविरुद्ध CBI ने केला गुन्हा दाखल

त्याचबरोबर विषारी दारू प्यायल्याने अनेकजण रुग्णालयात दाखल आहेत. या घटनांनंतर मृतांच्या नातेवाइकांचे म्हणणे आहे की, हे सर्व मृत्यू राज्यात विकल्या जाणाऱ्या बनावट दारूमुळे झाले आहेत. दुसरीकडे, बांका एसपी अरविंद कुमार गुप्ता यांचे म्हणणे आहे की, हे सर्व मृत्यू बनावट दारू प्यायल्यामुळे झाले आहेत, सध्या याबाबत कोणतीही माहिती नाही. सर्व मृतदेहांचे पोस्टमार्टम केले जात आहे. अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे (Death) खरे कारण समोर येईल. भागलपूरमधील मृत्यूची प्रशासकीय पुष्टी भागलपूरच्या नाथनगर भागातील साहेबगंजमध्ये झालेल्या मृत्यूनंतर होळीच्या (Holi) दिवशी सर्वांनी दारू प्यायल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. मयत विनोद यादवच्या पत्नीने सांगितले की, दारू प्यायल्यानंतर पतीची तब्येत थोडी बिघडू लागली.

25 people died after drinking poisonous liquor In Bihar
जम्मू-काश्मीरमध्ये CRPF ची गरज भासणार नाही, अमित शहांचं मोठं वक्तव्य

विनोद सिंह यांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, भागलपूरच्या नाथनगर येथील साहेबगंज परिसरात होळीच्या दिवशी सकाळी सर्वजण दारूची बाटली घेऊन घरी आले, त्यानंतर त्यांनी दारू प्यायली, परंतु काही वेळाने त्यांची प्रकृती अधिकच बिघडली. मृत सर्व एकाच गावातील आहेत. रुग्णालयात दाखल केले असता सर्वांचा संशयास्पद मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्टपणे सांगितले असल्याचे मृतांच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे. या मृत्यूंमागे केवळ विषारी दारू असल्याचे त्यांनी सांगितले. तर स्थानिक पोलिसांचे (Police) डीएसपी प्रकाश कुमार यांनी सांगीतले की, आतापर्यंत फक्त तीन जणांच्या मृत्यूची पुष्टी झाली आहे. मृत्यू का आणि कसा झाला, याची माहिती गोळा करत आहे. तसेच मधेपुरा जिल्ह्यातील मुरलीगंजमध्ये ४ जणांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. विषारी दारू हे देखील या मृत्यूंमागचे कारण सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, होळीमध्ये विषारी दारू प्यायल्याने आतापर्यंत 22 जण आजारी पडले आहेत. पलटी झालेल्यांना मुरलीगंज पीएचसी आणि खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. 3 मृत दिघी गावातील असून एक जण मुरलीगंज मुख्य बाजारपेठेतील प्रभाग 9 मधील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com