J&K बँकेशी संबंधित 20 लोकांविरुद्ध CBI ने केला गुन्हा दाखल

बँकेची 800 कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक केल्याचा या लोकांवर आरोप
J&K Bank
J&K BankDainik Gomantak
Published on
Updated on

जम्मू-काश्मीर: जम्मू-काश्मीर प्रशासनाच्या विनंतीवरून सीबीआयने जम्मू आणि काश्मीर बँकेच्या माजी अध्यक्षांसह एकूण 20 जणांविरुद्ध विविध गुन्हेगारी कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. या लोकांवर बँकेची 800 कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. या प्रकरणामध्ये जम्मू-काश्मीर सरकारचे 14 अधिकारी सहभागी आहेत. तसेच हे कर्ज REI Agro Limited ला बेकायदेशीरपणे दिल्याचा आरोप आहे. (CBI files case against 20 people associated with J&K Bank)

J&K Bank
जम्मू-काश्मीरमध्ये CRPF ची गरज भासणार नाही, अमित शहांचं मोठं वक्तव्य

सीबीआय (CBI) एफआयआरनुसार, 17 मार्च 2022 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीबीआयने जम्मू आणि काश्मीर बँकेचे 800 कोटी रुपयांचे नुकसान केल्याप्रकरणी बँकेचे माजी अध्यक्ष मुस्ताक अहमद शेख आणि संजय झुनझुनवाला यांच्यासह 20 जणांविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. सीबीआय आणि ईडी जम्मू-काश्मीर बँकेविरोधात (Bank) अनेक प्रकरणांची चौकशी करत आहेत. सीबीआयच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहिती नुसार, या घोटाळ्याच्या संदर्भात जम्मू-काश्मीर प्रशासनाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सीबीआयकडे तक्रार केली होती, ज्यामध्ये असे म्हटले होते की हे कर्ज बँक अधिकाऱ्यांच्या संगनमताने आरईआय अ‍ॅग्रो लिमिटेडला देण्यात आले होते.

विशेष म्हणजे कंपनीची कोणतीही शाखा नसतानाही जम्मू-काश्मीर (Jammu- Kashmir) बँकेच्या माहीम शाखेने आरईआय अ‍ॅग्रो लिमिटेडला 550 कोटींचे कर्ज दिले होते. त्याचवेळी वसंत विहार शाखेने या कंपनीला 135 कोटी रुपये दिले.

J&K Bank
फुटबॉल सामन्यादरम्यान प्रेक्षकांची गॅलरी कोसळली; व्हिडीओ व्हायरल

कर्ज घेण्यासाठी सर्व नियम धाब्यावर बसवण्यात आल्याचा आरोप आहे. हे कर्ज REI Agro Limited ला 2011 ते 2013 दरम्यान देण्यात आले होते. त्यानंतर 2014 मध्ये हे कर्ज NPA म्हणून घोषित करण्यात आले, त्यामुळे बँकेचे मोठे नुकसान झाले.

2019 मध्ये, जम्मू आणि काश्मीरच्या लाचलुचपत प्रतिबंधक शाखेने 1100 कोटींच्या तोट्यासाठी J&K बँकेच्या अधिकाऱ्यांवर FIR नोंदवून देशभरात छापे टाकले. त्यानंतर एसीबीने 32 आरोपींविरुद्ध न्यायालयात आरोपपत्रही दाखल केले होते. जम्मू-काश्मीर सरकारच्या विनंतीवरून आता सीबीआयने या प्रकरणी विविध गुन्हेगारी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. या एफआयआरमध्ये केवळ 800 कोटी रुपयांच्या घोटाळ्याची माहिती देण्यात आली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com