Kerala Houseboat Accident: केरळमध्ये हाऊसबोट पलटी होऊन 21 जणांचा मृत्यू, सात जणांची प्रकृती गंभीर

बोटीखाली आणखी लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
Kerala Boat Accident
Kerala Boat AccidentANI
Published on
Updated on

Kerala Houseboat Accident: केरळमधील मलप्पुरममधील तनूर भागात 40 प्रवाशांना घेऊन जाणारी हाऊसबोट पलटी होऊन 21 जणांचा मृत्यू झाला, यात अधिक लहान मुले आहेत. मृतांची संख्या 21 वर पोहोचली असून 7 जणांची प्रकृती गंभीर आहे.

अपघात होताच सुरूवातीला 9 आणि नंतर काही वेळाने 15 जणांचा मृत्यू झाला. रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास हा अपघात झाला.

रात्री उशिरा मृतांचा आकडा आणखी वाढला. बोटीखाली आणखी लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

बुडालेली बोट किनाऱ्यावर आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अपघातानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचून बचावकार्य सुरू केले.

या बचाव कार्यात अनेक स्वयंसेवक-कार्यकर्तेही मदत करत आहेत. रात्री उशीरापर्यंत बचावकार्य आणि जखमींना रुग्णालयात नेण्याची प्रक्रिया सुरू होती.

अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, बोटीमध्ये क्षमतेपेक्षा जास्त लोक होते.

यासोबतच बोटीवर संरक्षण उपकरणे नसल्याच्याही बोलले जात आहेत. ज्या ठिकाणी हा अपघात झाला ते ठिकाण समुद्रापासून काही अंतरावर आहे.

तनूर जिल्ह्याजवळील ओटीपुरम येथे वाहत्या नदीत बोट किनाऱ्यापासून 300 मीटर अंतरावर असताना हा अपघात झाला.

Kerala Boat Accident
Goa Casino: कॅसिनो मालकाची फसवणूक केल्याप्रकरणी दहा जणांवर गुन्हा दाखल

मलप्पुरममध्ये ज्या ठिकाणी हा अपघात झाला ते ठिकाण थुवलाथिरम समुद्रकिनाऱ्याजवळ आहे. चार जणांना गंभीर अवस्थेत येथील कोट्टाक्कल रुग्णालयात दाखल करण्यात आले असून 21 पैकी 15 मृतदेहांची ओळख पटली आहे.

अशी माहिती मंत्री अब्दुररहमान यांनी दिली आहे. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे, असे इंडियन युनियन मुस्लिम लीगचे (आययूएमएल) आमदार पीके कुनहालीकुट्टी यांनी म्हटले आहे.

कसा झाला अपघात? पोलिस तपास करणार

तनूर येथील थुवलाथीराम समुद्रकिनाऱ्याजवळ सायंकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली. बचावलेल्या लोकांना जवळच्या खासगी आणि सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघाताच्या कारणाचा पोलीस तपास करणार आहेत.

Kerala Boat Accident
Wriddhiman Saha: अरर! साहाने ट्राऊझरच घातली उलटी; हार्दिक, शमीलाही आवरेना हसू, Video एकदा पाहाच

केरळमधील या घटनेवर पंतप्रधान मोदींनी शोक व्यक्त केला आहे. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना पंतप्रधान मदत निधीतून 2 लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याची घोषणा पंतप्रधानांनी केली आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही ट्विट करून या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. तसेच, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही शोक व्यक्त केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com