Lieutenant General Upendra Dwivedi
Lieutenant General Upendra DwivediDainik Gomantak

''पाकिस्तानचे 200 दहशवादी जम्मू-काश्मीरमध्ये घुसण्याच्या तयारीत''

उत्तर सैन्यदलाच्या कमांडरचा खळबळजनक दावा
Published on

पाकिस्तानला भारताशी थेट युद्ध करता येत नसल्याने पाकिस्तानने फाळणीनंतर छुप्या पद्धतीने हल्ले करण्याचा प्रयत्न केल्याचं कित्येकदा स्पष्ट झालं आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्य दलाने पुन्हा एक खळबळजनक वक्तव्य केले. उत्तर सैन्यदलाने दिलेल्या स्पष्टीकरणानुसार भारत-पाकिस्तान सीमेवर सुमारे 200 दहशतवादी जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरीच्या तयारीत असल्याचा दावा कमांडर लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी केला आहे. (200 Pakistani terrorists preparing to enter Jammu and Kashmir )

Lieutenant General Upendra Dwivedi
तजिंदर बग्गाविरुद्ध मोहाली कोर्टातून वॉरंट जारी

उत्तर सैन्यदलाचे कमांडर लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी भारत-पाकिस्तान सीमेवर सुमारे 200 दहशतवादी जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरी करण्याच्या तयारीत असुन ते कोणत्याही क्षणी भारतात प्रवेश करू शकतात, असंही त्यांनी म्हटलं आहे. लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यावेळी शुक्रवारी नॉर्थ टेक चर्चासत्रात सहभाग घेतला होता. यावेळी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना द्विवेदी यांनी हा दावा केला आहे.

Lieutenant General Upendra Dwivedi
खलिस्तानी दहशतवादी रिंदानेच नांदेडमध्ये आरडीएक्स पाठवलं

पुढे ते म्हणाले की, गेल्या वर्षभरात भारत-पाक सीमेवर शांतता आहे. शस्त्रसंधीच्या खूपच कमी घटना घडल्या असून हा आकडा एक ते तीन इतकाच आहे. असं असलं तरी गेल्या वर्षभरात 21 विदेशी दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं आहे. सीमेवर शस्त्रसंधीचं उल्लंघन झालं नसलं तरी, सीमेपलीकडे दहशतवाद्यांना पोसलं जात आहे. पाकिस्तानच्या हद्दीत सहा मोठे दहशतवादी तळ आणि 29 लहान छावण्या आहेत. अशी माहिती त्यांनी यावेळी दिली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com