कुरिअरद्वारे गोव्यातून मागवली विदेशी दारु, स्कॉर्पिओमधून पार्सल घ्यायला आले अन् पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Bihar Crime: चौकशीनंतर संशयितांना न्यायालयात हजर केले असता त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
कुरिअरद्वारे गोव्यातून मागवली विदेशी दारु, स्कॉर्पिओमधून पार्सल घ्यायला आले अन् पोलिसांनी ठोकल्या बेड्या
ArrestDainik gomantak
Published on
Updated on

बिहार: कुरिअरद्वारे गोव्यातून विदेशी दारु मागवणाऱ्या दोन व्यावसायिकांना बिहार पोलिसांनी अटक केली आहे. मुझफ्फरपूर जिल्ह्यातील शेरपूर येथे हा प्रकार उघडकीस आला. कुरिअर करण्यात आलेली दारु स्कॉर्पिओमधून घेऊन जाण्यासाठी व्यावसायिक आले असता पोलिसांनी ही कारवाई ही केली.

एका हिंदी वृत्तपत्राने याबाबत वृत्त प्रसिद्ध केले आहे. वृत्तात दिलेल्या माहितीनुसार, शेरपूर येथील कुरिअर कंपनीच्या ऑपरेटरच्या माहितीवरून ही कारवाई करण्यात आली. विजय कुमार आणि अरविंद कुमार (रा. महेशपूर) अशी अटक करण्यात आलेल्या व्यावसायिकांची नावे आहेत.

पोलिसांनी व्यावसायिकांकडून पाटणा क्रमांकाची स्कॉर्पिओ जप्त केली आहे. चौकशीनंतर संशयितांना न्यायालयात हजर केले असता त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

इन्स्पेक्टर ब्यूटी कुमारी यांना एक्सप्रेस सीड कुरिअर कंपनीचा संचालक विशाल प्रताप यांनी याबाबत फोन करुन माहिती दिली. एका अज्ञात कुरिअर कंपनीने शेरपूर येथील कुरिअर कार्यालयात तीन मोठ्या कार्टनमध्ये पॅक केलेली वस्तू आल्याचे त्यांनी सांगितले.

कुरिअरद्वारे गोव्यातून मागवली विदेशी दारु, स्कॉर्पिओमधून पार्सल घ्यायला आले अन् पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Goa Crime: साताऱ्यातील तरुणाने गोव्यातल्या युवतीला घातला 19 लाखांचा गंडा, पोलिसांना आवळल्या मुसक्या

पार्सल घेण्यासाठी दोनजण स्कॉर्पिओमध्ये आले आहेत. संशय आल्याने त्याने दोघांनाही कार्यालयात बसवल्याचे त्यांनी सांगितले. माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल होत चौकशी केली असता त्यांना गोवा बनावटीची विदेशी दारू आढळून आली.

पोलिसांनी एकूण 86 लिटर विदेशी दारू जप्त करत दोघांना अटक केली. चौकशीत दोघांनी कुरिअरद्वारे विदेशी दारू मागवल्याचे कबुल केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com