Viral Video: 19 मिनिटांचा 'तो' व्हायरल व्हिडिओ शेअर कराल तर याद राखा, पोलिसांनी दिली तंबी; काय आहे नेमकं प्रकरण?

19 Minute Viral Clip: गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर 19 मिनिटांची एक व्हिडिओ क्लिप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
Police
PoliceDainik Gomantak
Published on
Updated on

19 Minute Viral Clip: गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर 19 मिनिटांची एक व्हिडिओ क्लिप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ही क्लिप कथितरित्या एका तरुण जोडप्याच्या प्रायव्हेट क्षणांची आहे. नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ही क्लिप पहिल्यांदा समोर आली. मात्र अजूनही अनेक सोशल मीडिया यूजर्स हा व्हिडिओ कुतुहलाने पाहून शेअरही करत आहेत.

व्हिडिओच्या सत्यतेबद्दल संभ्रम

सध्या व्हायरल होत असलेल्या या 19 मिनिटे आणि 34 सेकंदांच्या व्हिडिओचा मूळ स्रोत काय आहे, हे कोणालाही माहीत नाही. तसेच, हा व्हिडिओ त्या जोडप्याने स्वतःच्या इच्छेने शेअर केला आहे की तो आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या साहय्याने बनवण्यात आला, याबद्दल कोणतीही खात्रीशीर माहिती मिळालेली नाही.

पोलिसांचा कठोर इशारा

दरम्यान, या व्हिडिओचा प्रसार मोठ्या प्रमाणावर होत असल्याने आता पोलिसांनी कडक इशारा दिला आहे. नागरिकांना स्पष्टरित्या सांगितले की, ही क्लिप कोणत्याही परिस्थितीत शेअर करु नका, अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, 'sightengine' नावाच्या वेबसाइटवर कोणताही व्हिडिओ 'एआय-जनरेटेड' आहे की नाही, हे तपासण्याची सोय उपलब्ध आहे.

अनेक यूजर्स अजूनही विविध प्लॅटफॉर्मवर हा व्हिडिओ फॉरवर्ड आणि अपलोड करत आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी निवेदन जारी करुन लोकांना विनंती केली की त्यांनी तात्काळ ही व्हिडिओ क्लिप शेअर करणे थांबवावे.

Police
Viral Video: शाळेच्या भिंतीवरुन उडी मारुन शेडवर उतरले, पण खाली पाहतो तर काय... क्लास बंक करणं पठ्ठ्याला पडलं महागात; पोरीनं काढला पळ

व्हिडिओ शेअर केल्यास कठोर शिक्षा

पोलीस अधिकाऱ्यांनी लोकांना स्पष्टपणे समजावून सांगितले की, 19 मिनिटांचा हा व्हायरल व्हिडिओ शेअर केल्यास कायद्यानुसार व्यक्तीला कायदेशीर कारवाईला सामोरे जावू लागू शकते. इंटरनेटवर अश्लील किंवा आक्षेपार्ह व्हिडिओ शेअर करणे हा दंडनीय गुन्हा आहे. कोणी व्हिडिओ शेअर करताना आढळल्यास तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि पाच लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. तसेच, जर कोणी पहिल्यांदाच अश्लील सामग्री शेअर केल्यास त्याला पाच वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि दहा लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. याशिवाय, जर पुन्हा असा गुन्हा केल्यास सात वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो.

Police
रो दे, रो दे... विराट कोहलीने कुलदीप यादवची उडवली खिल्ली, ड्रेसिंग रूममधील Video Viral

याशिवाय, ही कृती भारतीय दंड संहितेच्या (IPC) कलम 292 (अश्लील साम्रगीची विक्री), कलम 293 (अश्लील वस्तूंचे वितरण) आणि कलम 354 सी (छुप्या कॅमेऱ्याने चित्रण किंवा व्हॉयरिझम) अंतर्गत देखील शिक्षापात्र आहे. अधिकाऱ्यांनी जोर देऊन सांगितले की, अशा प्रकारचे व्हिडिओ शेअर करणे हे दुसऱ्याच्या प्रायव्हसीचे (Privacy) गंभीर उल्लंघन आहे. त्यामुळे कोणालाही हा व्हिडिओ मिळाला, तर त्यांनी तो पुढे फॉरवर्ड किंवा अपलोड न करता त्वरित डिलिट करावा. कायद्यानुसार, अशा सामग्रीचा प्रसार करणे हा अत्यंत गंभीर गुन्हा मानला जातो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com