Jammu & Kashmir: जम्मू-काश्मीरमधील 17 नेत्यांनी शुक्रवारी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यामध्ये माजी उपमुख्यमंत्री तारा चंद आणि माजी पीसीसी प्रमुख पीरजादा मोहम्मद सईद यांचा समावेश आहे. हे तेच नेते आहेत जे दोन महिन्यांपूर्वी माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांच्या डेमोक्रॅटिक आझाद पक्षात (डीएपी) सामील झाले होते. यावेळी ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपालही उपस्थित होते.
नेत्यांचे स्वागत करताना, वेणुगोपाल म्हणाले की हा पक्षासाठी आनंदाचा दिवस आहे कारण हे नेते दोन आठवड्यांनंतर जम्मू आणि काश्मीरमध्ये दाखल होणार्या भारत जोडो यात्रेपूर्वी घरी परतले आहेत. भारत जोडो यात्रा ही देशातील एक मोठी चळवळ बनली आहे, त्यामुळेच या सर्व नेत्यांनी काँग्रेसमध्ये येण्याचा निर्णय घेतला आहे.
ही फक्त सुरुवात आहे आणि जेव्हा भारत जोडो यात्रा जम्मू-काश्मीरमध्ये प्रवेश करेल तेव्हा काँग्रेसची विचारधारा असलेले सर्व लोक आणि ज्यांना अखंड भारत हवा आहे ते पक्षात सामील होतील. मला वाटते की हे नेते दोन महिन्यांच्या रजेवर गेले होते. काँग्रेसच्या विचारसरणीवर विश्वास ठेवणाऱ्यांचे भारत जोडो यात्रेत स्वागत आहे. दरम्यान, काँग्रेसमध्ये परतण्यासाठी गुलाम नबी आझाद यांच्याशी काही बोलणी सुरू आहेत का, असे विचारले असता, वेणुगोपाल यांनी अशा कोणत्याही चर्चेचा इन्कार केला.
पक्षाचे नेते जयराम रमेश म्हणाले की, शुक्रवारी एकूण 19 नेते काँग्रेसमध्ये सामील होणार होते, परंतु केवळ 17 नेते दिल्लीत येऊन सामील होऊ शकले. हा पहिला टप्पा असून इतरही लवकरच सामील होतील.
तारा चंद म्हणाले की, आम्ही भावनेच्या भरात आणि मैत्रीसाठी घाईघाईने पक्ष सोडला होता. काँग्रेसने माझ्यासारख्या गरीब माणसाला तिकीट दिले, आमदार केले, सीएलपी नेता केले. आम्ही पुन्हा काँग्रेस पक्षात आलो आहोत. पीरजादा म्हणाले की, मी 50 वर्षे काँग्रेसमध्ये आहे, विविध पदांवर काम केले, 4 वेळा मंत्री झालो. माझ्याकडून चूक झाली, मी भावनिक झालो आणि जवळजवळ दोन महिने झोपू शकलो नाही.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.