IND vs WI: स्वातंत्र्य दिनी किंग कोहलीचा धमाका! वेस्ट इंडिजविरुद्ध ठोकलं दमदार शतक; टीम इंडियासाठी '15 ऑगस्ट' लय खास

Virat Kohli Century: भारतीय संघाने स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी वेस्ट इंडिजचा धुव्वा उडवत विजय मिळवला होता. विशेष म्हणजे, या विजयाचा शिल्पकार किंग कोहली ठरला होता.
Virat Kohli Century
Virat KohliDainik Gomantak
Published on
Updated on

Virat Kohli Century On Independence Day: 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्याआधीपासूनच भारत क्रिकेट खेळत असला, तरी 15 ऑगस्ट या दिवसाचे महत्त्व काही खासच आहे. स्वातंत्र्यानंतर असे खूप कमी वेळा झाले, जेव्हा भारतीय संघाने 15 ऑगस्टच्या दिवशी कोणताही सामना खेळला असेल. 2019 मध्ये असाच एक खास क्षण आला होता, जेव्हा भारतीय संघाने स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी वेस्ट इंडिजचा धुव्वा उडवत विजय मिळवला होता. विशेष म्हणजे, या विजयाचा शिल्पकार किंग कोहली ठरला होता.

2019 चा ऐतिहासिक सामना

दरम्यान, 2019 मध्ये भारतीय संघ वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर होता. या मालिकेतील तिसरा एकदिवसीय सामना 14 ऑगस्ट रोजी सुरु झाला, पण भारत आणि वेस्ट इंडिजमधील वेळेच्या फरकामुळे तो भारतीय वेळेनुसार 15 ऑगस्टच्या दिवशी संपला. हा सामना पोर्ट ऑफ स्पेनमध्ये खेळला गेला. पावसामुळे या सामन्यातील षटकांची संख्या कमी करण्यात आली होती.

या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना वेस्ट इंडिजच्या संघाने 35 षटकांत 7 विकेट्स गमावून 240 धावा केल्या होत्या. वेस्ट इंडिजकडून सलामीवीर क्रिस गेलने जोरदार फलंदाजी केली. त्याने फक्त 41 चेंडूंमध्ये 8 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 72 धावांची वादळी खेळी खेळली होती. त्याच्याशिवाय एविन लुईसनेही 29 चेंडूंमध्ये 43 धावांचे योगदान दिले होते.

Virat Kohli Century
WI vs IND, 4th T20I: अक्षर पटेलच्या नावावर लाजिरवाण्या रेकॉर्डची नोंद, T20 मध्ये पहिल्यांदाच केले 'हे' काम

विराट कोहलीचे दमदार शतक

वेस्ट इंडिजने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी भारतीय संघ मैदानात उतरला. भारताचा सलामीवीर रोहित शर्मा 10 धावा करुन लवकर बाद झाला. त्यानंतर कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि शिखर धवनने डाव सावरला. या सामन्यात विराटने धमाकेदार फलंदाजी करत अवघ्या 99 चेंडूंमध्ये नाबाद 114 धावांची खेळी केली. त्याच्या खेळीत 14 चौकारांचा समावेश होता.

याशिवाय, श्रेयस अय्यरनेही 65 धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. पावसामुळे सामना पुन्हा थांबला, त्यामुळे डकवर्थ लुईस नियमानुसार भारताने (India) 4 विकेट्स गमावून 256 धावा केल्यावर सामना जिंकल्याचे जाहीर करण्यात आले. या रोमांचक सामन्यात भारताने 6 विकेट्सने विजय मिळवत स्वातंत्र्य दिनाचा आनंद द्विगुणीत केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com