गोव्यातील विविध क्षेत्रातील महिला, विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी आल्या एकत्र

Goan Women: फेस्ताच्या सामुदायिक स्वयंपाकघरात स्त्रियांनी गोव्याच्या अस्सल पाककृती बनवल्या,
Goa |Goan women
Goa |Goan womenDainik Gomantak

फेस्त (जत्रा) ‘झिरो वेस्ट’ (कचराविरहित) होते हे त्याचे एक वैशिष्ट्य होतंच पण स्त्रियांना एकत्र करून आयोजित करण्यात आलेले हे पहिले ‘अस्तुऱ्यांचे’ फेस्त होते. ‘राष्ट्रीय बालिका वर्ष 2022 ’ मध्ये गोव्यातील विविध क्षेत्रातील महिला, विचारांची आणि ज्ञानाची देवाणघेवाण करण्यासाठी एकत्र आल्या होत्या.

भाषा-प्रशिक्षक आणि या फेस्ताच्या एक संचालिका ग्वेन गोम्स यांनी स्थानिक महिलांशी त्यांच्या दिनचर्येबद्दल आणि परिसरातल्या स्त्रिया आणि बालिकांना तोंड द्याव्या लागणाऱ्या अनेक समस्यांबद्दल चर्चा केली आणि त्यांच्या अनुभवांचे दस्ताऐवजीकरण केले.

पर्वरी येथील प्रसिद्ध शेफ, इरेन डायस यांनी गोव्याचा एक वारसा खाद्यपदार्थ, ‘दोणे/पुडे’ कसा बनवावा याबद्दल कार्यशाळा घेतली. मडकईच्या रहिवासी अंजली नाईक यांनी माडांच्या झावळ्यांपासून ‘मल्ले’ कशी विणावीत, हे जुने कौशल्य उपस्थितांना शिकवले.

एकमेकांना सामोरे होऊन एकमेकांबद्दल जाणून घेणे हा एक विशेष कार्यक्रम या फेस्ताचा भाग होता. फेस्ताच्या सामुदायिक स्वयंपाकघरात स्त्रियांनी गोव्याच्या अस्सल पाककृती बनवल्या, ज्यात खतखते, घोटांचे (दुय्यम आंबा) सांसव, अळसांदे रोस, अभिजात गोमंतकीय कोशिंबीर, हंगामी लोणचे आणि मिष्टान्नाचा समावेश होता.

Goa |Goan women
ट्रंपेट वाजवणारी गोमंतकन्या

हे ‘ओस्तुऱ्यांचे फेस्त’ (स्त्रियांचा मेळावा) मडकई येथील ‘पीसफूल सोसायटी’च्या प्रांगणात पार पडले. कट्टी आणि घुमट वादनाच्या सांस्कृतिक कार्यक्रमाने आणि सेंद्रीय लेमन ग्रासची खुटी (काळी) चहा आणि ‘पुडे’ यांचा स्वाद घेऊन या फेस्ताची सांगता झाली.

गोंयचो फेस्ताकार मरियस फर्नांडिस यांनी आयोजित केलेले हे ‘ओस्तुऱ्यांचे फेस्त’, त्यांचे आतापर्यंन्तचे 51 वे फेस्त होते. गोव्याच्या सांस्कृतिक विशेषतांना अशा प्रकारच्या फेस्तातून लोकांसमोर आणणे आणि त्यांच्या सांस्कृतिक, सामाजिक महत्त्वाला उजाळा देणे हे अशा फेस्तांचे उद्दिष्ट असते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com