ट्रंपेट वाजवणारी गोमंतकन्या

Goa Special News: गोव्यात वेलरोज एकमेव कन्या आहे जी ट्रंपेट वाजवते.
Trumpet
TrumpetDainik Gomantak
Published on
Updated on

ट्रंपेट हे वाद्य मुली सहसा वाजवत नाहीत. गोव्यात तर एक वेलरोज सोडल्यास दुसरे कुणीच नाही. पण वेलरोजला हे वाद्य शोभूनही दिसतं. डोळे बंद करून वेलरोज जेव्हा ट्रंपेटवर (Trumpet) सूर छेडत असते तेव्हा तिचे मुळातच सुंदर असलेले व्यक्तिमत्त्व अधिकच विलोभनीय बनते. ती गाणीही गाते. कॅनडाच्या ‘यार्क युनिव्हर्सिटी’तं अभिनयाचे प्रशिक्षण घेतलेली ती प्रशिक्षित अभिनेत्रीही आहे.  

मस्कत, युरोप आणि कॅनडा इथे काळ घालवूनही ती म्हणते, गोव्यासारखा (Goa) सुंदर प्रदेश नाही. वेलरोजचे बालपण गोव्यात, सांतईस्तेव्ह या सुंदर गावात गेले. तिचे वडीलही गायक होते. वेलरोज आपल्या वडिलांना गाताना ऐकायची आणि तिला वाटायचे आपणही वडिलांसारखेच बनावे.

ती गायचीच पण तिच्या वडिलांनी तिला वाद्य शिकवण्यासाठीही प्रवृत्त केले. सात वर्षे वयाची असताना ती सर्वात प्रथम की-बोर्ड वाजवायला शिकली. चर्चमधल्या ‘कॉयर’ गायनावेळी ऑर्गन वाजवणे हे साहजिकच तिच्या वाट्याला आले.

प्रार्थनेला जमणार्या लोकांचे आणि चर्चमधल्या प्रिस्टचे कौतुक तिला लाभायचे. त्या कौतुकाचे पाठबळ तिला अजून आठवते. नंतर ती गिटारकडे वळली. पण का कुणास ठाऊक तिला आपण ट्रंपेट शिकावे असे फार वाटायचे. तिने आपली इच्छा वडिलांना सांगितल्यानंतर ते म्हणाले- ‘का नाही? जर हे वाद्य एक मुलगा वाजवू शकतो तर मुलगी का वाजवू शकणार नाही?’ आणि मग मस्कत इथे शाळेत शिकत असताना वेलरोजने ट्रंपेट शिकायला सुरुवात केली.

वेलरोज
वेलरोज Dainik Gomantak
Trumpet
Goa Travel: आकाशातून गोवा दर्शन

मस्कतच्या शाळेतून बारावी पूर्ण झाल्यानंतर तिने कॅनडाच्या यॉर्क विद्यापीठात अभिनयाच्या अभ्यासक्रमासाठी आपला अर्ज पाठवला. तिला कल्पना होती की तिथे प्रवेश मिळणे बरेच कठीण असते पण दैवावर भरवसा ठेऊन ती विद्यापीठाकडून उत्तराची वाट पाहत राहिली आणि दैवयोगाने तिची निवड झाल्याचे उत्तर तिला विद्यापीठाकडून आले.

अशातऱ्हेने ‘अभिनय’ शिकण्यासाठी ती कॅनडाला पोहचली. तिथे अभिनय शिकत असताना ‘ट्रंपेट वादक’ म्हणून तिचा संबंध संगीत विभागाशीही यायचा. तिथले बहुतेक शिक्षक स्वतःच अभिनेते असल्याने तिथल्या टीव्ही चॅनलचा अनुभव घ्यायची संधीही तिला लाभली.

तिथल्या प्रशिक्षणानंतर वेलरोज आता, गाणी म्हणणारी, ट्रंपेट वादनात कुशल असणारी आणि अभिनयाचे प्रशिक्षण घेतलेली अशा तिहेरी भूमिकेत स्वतःला स्थापित करू पाहते आहे.

ती पुन्हा कॅनडाला (Canada) परतणारच आहे पण आता सध्या गोव्यात ती ‘बॅण्ड्‍स’मधून आपला करिष्मा दाखवत असते. ती म्हणते, एक व्यावसायिक म्हणून जसं आपलं दैव जे ठरवेल, त्याप्रमाणे मी जगाच्या पाठीवर कोठेही असेन. मात्र गोव्याला दुरावण्याची माझी इच्छा नाही. मी गोव्यात पुन्हा पुन्हा परतेन’.

तिला जगभर ट्रंपेट वादन करायचे आहे. एक कलाकार म्हणून ती वैश्‍विक बनण्याचे स्वप्न पाहते. त्याशिवाय तिला स्वतःचे ‘एक्टिंग स्कूल’ही सुरू करायचे आहे. अर्थात ही फार दूरची गोष्ट आहे याचीही तिला जाणीव आहे. आताच तिच्या करियरची सुरुवात होऊ घातलेली आहे. ‘ट्रंपेट वादन’ असो वा अभिनय’, आपल्याला अजून दूरचा पल्ला गाठायचा आहे हे ती अगदी नम्रपणे कबूल करते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com