Women Power
Women PowerDainik Gomantak

संसारातले 'स्त्री' बळ..

'संसार रथाचे दुसरे चाक ही त्या घरची स्रीच असते'
Published on

पणजी: श्रद्धाचा जन्म पणजी शहरातला. तिने आपले दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. लग्नानंतर ती बाणस्तारी गावात पोहोचली. सत्तावीस वर्षांपूर्वी बाणस्तारी गाव शांत, सुंदर, हिरवगार व चारी बाजूंनी दाट झाडी असलेला होता. आता ते गाव गजबजलेले जणू शहर बनले आहे.

तिला दोन मुली एक मुलगा. परिवार जसा वाढत गेला तसा खर्चही वाढत गेला. घरखर्चासाठी आपला देखील हातभार लागावा म्हणून तिने बेसन लाडू, चकली, मका चिवडा वगैरे तयार करून विकायला सुरुवात केली. श्रद्धा आपल्या आईकडून खाद्यपदार्थ बनवायला शिकली होती. त्याचा तिला आता फायदा झाला. जशा ऑर्डरी मिळू लागल्या तसा तिचा स्वतःवरचा विश्वास वाढला. ती अधिक उत्साहाने हे खाद्यपदार्थ बनवू लागली. त्याशिवाय मग तिने पुरणपोळी, सामोसे, बटाटावडेदेखील बनवायला सुरुवात केली. लोकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळू लागला.

वाढदिवस किंवा इतर छोट्या छोट्या कार्यक्रमांच्या निमित्ताने मिळालेल्या ऑर्डरींमुळे व्यवसायही विस्तारू लागला. ओळखी वाढल्या. त्याशिवाय तिचा स्वभावही मनमिळावू व शांत असाच होता. कॅटरिंग असो वा दुसरा कुठलाही व्यवसाय असो, व्यवहारात प्रामाणिकपणा हवा, जो तिच्यात होता. यामुळे तिला हळूहळू जेवणाच्या ऑर्डरीही मिळू लागल्या. वाढदिवस, हळद-लग्नसमारंभ इत्यादीसाठी ऑर्डर्स येऊ लागल्या.

आता ती शंभर ते पाचशे लोकांच्या शाकाहारी तसेच मांसाहारी जेवणाच्या ऑर्डर घेऊ शकते. या कामात तिला तिचा नवर्याची व मुलांचीही मदत होते. मुलं पदवीधर असली तरी त्यांना आपल्या आईचा अभिमान आहे.

Women Power
Goa Election: रायबंदर चर्चच्या सदस्याकडून निवडणूक आचारसंहितेचा भंग

घरातली बाईला जर शिक्षणाचे महत्व कळले तर त्याने पूर्ण घर शिक्षित होते असं म्हणतात ते खरं आहे. श्रद्धाने आपल्या तिन्ही मुलांना त्यांच्या आवडीप्रमाणे शिक्षण दिले. मोठ्या मुलीने एमबीए केले, दुसरीने बीबीए केले आहे. मुलगा वाणिज्य शाखेत शिकतो. मुली जरी पदवीधर असल्या तरी त्यांना अजून कुठं नोकरी मिळालेली नाही. पण त्या निराश नाहीत. त्या आपल्या आईच्या कामात तिला मदत करतात.

Women Power
चुलीसमोरची ऊब आता पूर्वीसारखी उरली नाही

आज श्रद्धाने स्वकष्टाने आपली परिस्थिती सावरली आहे. जे शिक्षण ती स्वतः घेऊ शकली नाही, ते तिने आपल्या तिन्ही मुलांना दिले. नवरा व मुलांनी मदत केल्यामुळे तिचे मनोबल निश्चितच वाढले. अडचणीवर मात करून पुढे जाणे हा धोरणीपणा तिच्यात उपजतच होता. तिने निवडलेल्या व्यवसायात ती आता अर्थार्जन करते याचा तिला अभिमान वाटतो. ती म्हणते, महिलांना संधी मिळाल्या तर त्या स्वतःची व त्याचबरोबर कुटुंबाची प्रगती करू शकतात. महिला स्वतःच्या पायावर उभी राहिली, स्वावलंबी झाली तरच ती आपले कुटुंब स्वकष्टाने उभे करू शकते

- भारती बांदोडकर

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com