मगोप-भाजप युती झाली, मनोमिलन कधी?

मगोप आणि भाजप नेत्यांचे मत, तेच कार्यकर्त्यांचे मत, अशी परिस्थिती आता राहिलेली नाही. दोन्ही पक्षांची युती कागदोपत्री झालेली असली तरी मनोमिलन मात्र दूरच आहे.
Sudin Dhavalikar MGP supports BJP
Sudin Dhavalikar MGP supports BJPDainik Gomantak
Published on
Updated on

मिलिंद म्हाडगुत

मडकईचे आमदार सुदिन ढवळीकर यांच्या मंत्रिपदाच्या शपथ ग्रहणावेळी मगो पक्षाध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी आता परत मगोप-भाजप युती झाली असून ती 10 वर्षे टिकणार, असे सनसनाटी विधान केले. अर्थात दीपक ढवळीकर म्हटले म्हणजे अशी विधाने आलीच. मागे विधानसभेचा निकाल लागण्यापूर्वी ते मगोप-भाजप एकत्रित येणे शक्य नाही, असे बोलत होते आणि आता ही युती 10 वर्षे टिकणार, असा आशावाद व्यक्त करताहेत. सुदिन यांना मंत्रिपद मिळाल्यामुळे मगोपचे ‘हौसले बुलंद’ झाले आहेत, यात शंकाच नाही. हेच मंत्रिपद जर मगोपचे दुसरे आमदार जीत आरोलकर यांना मिळाले असते तर दीपक यांनी हे विधान केले असते की नाही, हे सांगणे कठीण आहे. पण तरीही हे विधान केल्यामुळे त्याचे काय परिणाम होतील, याचा त्यांनी आढावा घेतलेला दिसत नाही. (MGP BJP Alliance News Updates)

Sudin Dhavalikar MGP supports BJP
मुख्यमंत्री सावंतांनंतर विश्‍वजीत राणे 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये

सध्या काही मतदारसंघांत भाजपएवढाच मगोपही प्रबळ आहे. फोंडा (Ponda) मतदारसंघाचे उदाहरण घ्या; येथे या निवडणुकीत भाजपचे रवी नाईक यांना 7,514 मते मिळाली तर मगोपचे डॉ. केतन भाटीकर यांना 7,437 मते मिळाली. फरक होता अवघ्या 77 मतांचा. त्यामुळे मगोप जरी हरला असला तरी त्याची शक्ती नजरेआड करणे शक्यच नाही. त्यामुळे ही युती झाल्यास आगामी निवडणुकीत फोंडा कोणाला जाईल, हा वादाचा प्रश्न ठरू शकतो. तांत्रिकदृष्ट्या विचार केल्यास हा मतदारसंघ भाजपकडे (BJP) जायला हवा. पण मगोपची शक्ती कमी नसल्यामुळे ते या मतदारसंघावर दावा करू शकतात. प्रियोळमध्ये तशीच परिस्थिती आहे. तिथे भाजपच्या गोविंद गावडे यांचा विजय फक्त 213 मतांनी झाला आहे. त्यामुळे तिथेही मगोपला नजरेआड करता येणार नाही.

हे झाले विधानसभा निवडणुकीचे. पक्षकार्य करतानासुध्दा असे प्रश्न उद्‍भवू शकतात. प्रत्येक आमदार हा आगामी निवडणुकीवर डोळा ठेवूनच काम करत असतो. आता फोंडा तालुक्यात चार मंत्री आहेत. त्यातले तीन मंत्री भाजपचे, तर एक मगोपचा (MGP) आहे आणि मगोपला महत्त्वाचे असे वीज खाते देण्यात आले आहे. वीज खाते हे अनेकांच्या गरजेचे असल्यामुळे मगोपचा नागरिकांशी थेट संबंध येऊ शकतो. त्यातून ते आपली ‘व्होट बॅंक’ही वाढवू शकतात, यातूनच शह-काटशहाचाही प्रत्यय भविष्यात येऊ शकेल. प्रियोळमध्ये युती झाल्यास ती जागा भाजपकडे जाणार, यात शंकाच नाही. मग मगो पक्षाध्यक्ष दीपक यांचे काय? ते शिरोड्यात जाणार म्हटले तर तिथेही भाजपचाच आमदार आहे. त्यामुळे ही युती होणार कशी आणि युतीची घोषणा केली असली तरी हे पक्ष परत एकमेकांच्या वाटेत कोलदांडे घालणार नाहीत कशावरून? त्यामुळे सुदिन यांचे मंत्रिपद हे युतीचे सुतोवाच होऊ शकत नाही. त्यात परत या दोन पक्षांच्या कार्यकर्त्यांची मने इतकी दुभंगली आहेत, की नेते जरी एकत्र आले तरी कार्यकर्ते एकत्र येतील की नाही, याची शंकाच वाटते.

Sudin Dhavalikar MGP supports BJP
विधानसभा सरली; गोवा 'भाजप'मध्ये लोकसभेसाठी रस्सीखेच सुरु

सुदिन ढवळीकर भाजप सरकारात मंत्री असल्यामुळे काही ठिकाणी त्यांना माघार घ्यावी लागणार आहे. 2019 साली झालेल्या शिरोड्याच्या पोटनिवडणुकीत मगो पक्षाध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी उमेदवारी दाखल केल्यामुळे सुदिन यांना उपमुख्यमंत्री पदापासून वंचित व्हावे लागले होते. हा इतिहास समोर असल्यामुळे सुदिन (Sudin Dhavalikar) यांना आता ताकसुध्दा फुंकून प्यावे लागणार आहे. याचा प्रत्यय नुकत्याच झालेल्या फोंडा नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत आला आहे. तिथे मगोपने थेट माघार घेऊन भाजपला हिरवा कंदील दाखवला. कदाचित पंचायत निवडणुकीतही असे होऊ शकते. त्याचप्रमाणे पुढील वर्षी होणाऱ्या फोंडा नगरपालिका निवडणुकीतही मगोप बॅकफूटवर जाऊ शकतो. लोकसभेपर्यंत काही प्रश्न उद् भवतील, असे वाटत नाही. पण जसजशी विधानसभा निवडणूक जवळ यायला लागेल, तसा परत एकदा भाजप- मगोपमध्ये संघर्ष उद्भवू शकतो. 2016 साली असेच झाले होते. शेवटच्या क्षणी मगोपने सरकारमधून बाहेर पडून 2017 च्या विधानसभेच्या तोंडावर वेगळी चूल थाटली होती. यावेळी, म्हणजे 2024 च्या निवडणुकीवेळी असा प्रकार परत घडू शकतो. त्यामुळे मगोप-भाजप युतीची घोषणा केली गेली असली तरी ही घोषणा मनाला पटत नाही. आता खरेच ही युती 10 वर्षे सोडा; पण 2024 सालच्या निवडणुकीपर्यंत तरी टिकते की काय, याचे उत्तर मिळायला आणखी काही काळ जावा लागणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com