भ्रमाचा भोपळा

आठवले की थाप मारणे ही एक कला आहे. ती सर्वांनाच जमते असे नाही. पण ज्याला हे जमले त्याला तात्पुरते का होईना यश हे हमखास मिळतेच.
Fraud
FraudDainik Gomantak

प्रा. रामदास केळकर

एकेकदा आपल्याला उगाचच एखाद्याविषयी गोड समजूत असते पण प्रत्यक्षात आपल्याला अनुभव वेगळाच येतो. जर आपण ते पचवू शकाल तर ठीक, अन्यथा भ्रमनिरास तर होतोच शिवाय आपल्याला प्रचंड नैराश्य येते.

काहीवेळा तर माणूस त्या धक्क्याने आजारी पडतो, मृत्यूही पावतो. तेव्हा आपण उगाचच कोणाकडून अपेक्षा ठेवू नये. शेवटी आपण काय जमवतो हेच खरे असते. अर्थात ह्या सगळ्या अनुभवाच्या गोष्टी असतात. त्या कोणी कोणाला सांगतोच असे नाही.

काहीजण शब्द देतात पण प्रत्यक्षात ज्यावेळी अडचण असते तेव्हा काहीही सबबी सांगून तुम्हांला टोलावतात. एखाद्या चर्चासत्रात बोलावे, अशी सूचना आयोजक करतात पण त्या सूचनेला हरताळ फासून आपले भाषण लांबवितात.

त्याचा त्रास पुढच्या वक्त्याला तर होतोच, शिवाय आयोजकांनाही होतो प्रेक्षक तर जाम वैतागतात. असो. हा भ्रमनिरास झालेला असतो. तरी एक बरे हा भ्रमनिरास किंवा अपेक्षाभंग त्वरित होत असतो.

Fraud
Gomantak Editorial: कटू सत्याची मात्रा

काहीजण उत्तम थापाडे असतात. ते तुम्हांला असे काही भासवितात की आपण ‘यंव’ करू शकतो, ‘त्यंव’ करू शकतो. आपल्या हा ओळखीचा, तो ओळखीचा, हे सगळे ऐकून आपण सर्दच होतो. त्यांच्या थापांना भुलतो. पण प्रसंग आल्यानंतर हा थापाड्या काही ना काही सबबी सांगून तुम्हांला कटवतो तो कायमचा.

यावरून आठवले की थाप मारणे ही एक कला आहे. ती सर्वांनाच जमते असे नाही. पण ज्याला हे जमले त्याला तात्पुरते का होईना यश हे हमखास मिळतेच.

नंतर मागाहून तुमच्यावर थापाड्या म्हणून शिक्का बसला तरी काही बिघडत नाही. कारण ते सगळे मागाहून असते ना! एक म्हणजे थाप सिद्ध करणे कठीण असते. तो फक्त अनुभवच असतो.

फार पूर्वी एका गृहस्थाने एकाला शहरातील एका भव्य इमारतीत नेले. विशेष म्हणजे त्या इमारतीला मागून व पुढून यायला जायला दरवाजे होते.

पण गृहस्थाबरोबरच्याला त्याची काही माहिती नव्हती. त्या गृहस्थाने त्याच्याजवळून काही रक्कम घेतली व त्याला तिथे थांबवून आपण त्या इमारतीत शिरला व दुसऱ्या वाटेने गूल झाला.

Fraud
Indian Education System: रेखाटनापासून पुढे....

तो इसम बिचारा त्याची वाट बघत खूप वेळ तिथेच राहिला. मग कोणीतरी सांगितले की या इमारतीतून बाहेर जाण्यासाठी दरवाजा आहे. बिचारा काय करणार? अक्कलखात्यात पैसा जमा करून बिचारा घरी आला, एक प्रचंड अनुभव घेऊन.

त्या गृहस्थाने पुन्हा म्हणून आपले तोंड त्याला दाखविले नाही हे वेगळे सांगायला नको. तुमच्या कडची पुस्तके मागून परत न देणारे भामटे जसे असतात तसे तुमच्या तोंडावर गोड बोलून तुमची मागाहून टीका करणारेही असतात.

समजा अफजलखानाच्या भेटीला आपले शिवाजी महाराज, ‘तो काही करणार नाही, अगदी सज्जनपणे वागेल, असे गृहीत धरून जर गेले असते तर हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पुरे झाले असते का? महाराजांनी गुप्तपणे वाघनखे नेली होती व त्यांच्या मदतीने अफझलखानाचा कोथळा बाहेर काढला.

राजकारणात तर वाईट गोष्टींचा अगोदर विचार केलाच पाहिजे शिवाय तल्लखही असले पाहिजे. गोड गोड बोलणारे दगाबाज होतात याचा अनुभव अनेकांना आलेला असतो. त्यानुसार आपण सतर्क राहिलो तर आपल्या क्षेत्रात ठामपणे राहू शकतो. जे राजकारणात ते व्यवहारातदेखील.

Fraud
Mining and Paddy Farming: खाणींमुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतीचे पुनरुज्जीवन

एका गृहस्थाला लॉटरी लागली ही बातमी कर्णोपकर्णी होताच सगळे आप्त न विसरता त्याला भेटले व उधारीवर पैशाची मागणी करू लागले. तो गृहस्थ बिचारा त्यांच्या बोलण्याला फसला आणि रक्कम देत राहिला.

शेवटी त्याच्या अडचणीच्या वेळी त्याला कोणी रक्कम देईना. बरे भांडणार कुणाशी आणि कसे? कारण व्यवहार तोंडीच झाला होता.

शिवाय ते सर्व आप्तच होते. तुम्ही भाबडेपणाने हलगर्जी व्यवहार करू लागलात तर हाती पश्चात्तापाशिवाय काही लागणार नाही. आता तुम्ही हेतूपुरस्सर मदत करू इच्छिता तर गोष्ट वेगळी. पण भ्रमाचा भोपळा फुटेपर्यंत न राहता जर आयुष्यातील व्यवहार केले तर चिंता कमी होईल यात शंका नाही.

आयुष्यात भले भले फसविले जातात त्यांच्या अनुभवावरून आपण शिकावे. सुधा मूर्तींना अशीच मदत करणे आवडते. त्यांच्या दानशूरपणाचा फायदा घेत एकाने असाध्य रोगग्रस्त मुलीच्या आजारपणाला पैसे घेतले व ते स्वतःसाठी वापरले.

कालांतराने त्या मुलीचे निधन उपचारांअभावी झाले. सुधाताईंना हे वृत्त समजले व नंतर त्या सतर्क झाल्या. अशांचा फटका खरोखर गरजूंना पडतो तो वेगळा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com