नदीच्या पात्रात 'तिस-यां'ची वाढ व्हायला हवी

मात्र काही ठिकाणी ‘तिसऱ्या’ हा शाकाहारही मानला जातो.
Tisrya
TisryaDainik Gomantak
Published on
Updated on

गोवा: आयज आमगेर तिसऱ्यो केल्या’ हे वाक्य स्वयंपाक घरातल्या त्या दिवसाच्या स्वादाची एक प्रकारे संपन्नताच सांगते. तिसऱ्यांचे सुके, तिसऱ्यांचे हुमण ही पोटाच्या तृप्ततेची ग्वाहीच असते- अर्थात मांसाहारी जनांसाठी फक्त. मात्र काही ठिकाणी ‘तिसऱ्या’ हा शाकाहारही मानला जातो.

गोव्यात अशी गावे आहेत जी ‘तिसऱ्यां’साठी प्रसिद्ध आहेत. वेरेंच्या तिसऱ्या, रायबंदरच्या तिसऱ्या, बाणस्तारीच्या तिसऱ्या या मांडवी नदीच्या परिसराचा भाग आहेत. झुवारी नदीच्या पात्रातील वेरेग या जागेवरच्या तिसऱ्याही लोकप्रिय आहेत. या जागांवर तिसऱ्यांचे पीक एकेकाळी विपुलपणे आणि नियमितपणे येत होते.

Tisrya
आता शिगमोत्सव मिरवणुकीची प्रतीक्षा

मात्र गेली काही वर्षे नदीच्या पाण्यात झालेल्या प्रदूषणामुळे आणि अन्य कारणाने तिसऱ्यांची उपलब्धता कमी कमी होत गेली. गेल्यावर्षी मध्यंतरी वेरेंच्या पाण्यात आलेले तिसऱ्यांचे मुबलक पीक ही चक्क बातमीच झाली होती. अगदी हल्ली, ‘वेरेग इथल्या पाण्याच्या पात्रात तिसऱ्या आल्या आहेत’ या बातमीने तिथे तिसऱ्या काढणाऱ्यांची झुंबड उडाली होती. पूर्ण वाढ न झालेल्या तिसऱ्याही लोकाने तिथून काढून नेल्या. हे तिसऱ्यांच्या प्रजननासाठी आणि वाढीसाठी धोक्याचे होते.तिसऱ्यांना उत्पन्न झालेल्या या धोक्याविरुद्ध उपाययोजना करण्यासाठी ‘गोवा राज्य जैवविविधता मंडळा’ने आता काही पावले उचलली आहेत. तिसऱ्यांना संरक्षण मिळावे व त्यांची संख्या वाढावी हाच उद्देश त्यामागे आहे. तिसऱ्या पारंपारिक पद्धतीने, हातानेच काढाव्यात ही महत्त्वाची शिफारसही त्यात अंतर्भूत आहे.

Tisrya
प्रमोद सावंत 23 मार्चला घेणार गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ?

नदीतल्या पात्राच्या (जिथे तिसऱ्या सापडतात) पाच किलोमीटर परिघात राहणाऱ्या स्थानिकांनाच तिसऱ्या काढण्याची मुभा असेल. बाहेरच्या लोकांना तिथल्या तिसऱ्या काढण्यासाठी स्थानिक प्रशासनाची परवानगी घ्यावी लागेल.तिसऱ्यांचे प्रजनन योग्यरित्या व्हावे म्हणून जुलै ते ऑक्‍टोबर या काळात पात्रातून तिसऱ्या काढण्यास बंदी राहील. हा काळ त्यांच्या प्रजननासाठी महत्त्वाचा काळ असतो. बऱ्याच वेळा स्थानिक लोकांपेक्षा पाहुण्यांची गर्दी तिसऱ्या काढण्यासाठी नदीच्या पात्रात झालेली दिसते.मत्स्यसंपत्तीबद्दल काळजी असणाऱ्यांना आशा आहे की ‘जैवविविधता मंडळा’ने लागू केलेले हे नवे नियम, गोव्यातल्या नदीच्या पात्रात तिसऱ्यांची संख्या पुन्हा वाढवण्यासाठी उपयोगी ठरतील.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com