'Stealing' is one of the sixty four arts
'Stealing' is one of the sixty four artsDainik Gomantak

Blog: चौसष्ट कलांमध्ये ‘चोरी’ ही एक कलाच

सामान्य नागरिकाने आपल्या कष्ट, बुद्धी, कौशल्य या मार्गाने मिळविलेला पैसा त्याच्या कळत नकळत काढून घेणे म्हणजे चोरीच. ही चोरी अद्ययावत म्हणजे सोफिस्टिकेटेड पद्धतीने केली जाते.-कमलाकर द. साधले
Published on

Blog: लहानपणी एक सिनेगीत ऐकू यायचे,

‘कोई छोटा चोर, कोई बडा चोर

इस दुनियामे सब चोर, चोर’

रामायणकाळापासून हा चोरीचा, लुटीचा वारसा चालत आला आहे. वाल्याचा वाल्मिकी झाला. तसा झालेला मात्र कुठे दिसत नाही. उलट परिवर्तन बऱ्याच ठिकाणी दिसते. चौसष्ट कलांमध्ये ‘चौर्य’ ही एक कला मानली गेलेली आहे. हेरगिरी ही एक चौर्यकलाच.

पण चांगल्या कामासाठी केलेली. वार्ताहरांचे ’स्टिंग ऑपरेशन’ म्हणतात ते त्याच धर्तीचे, साहित्यिक क्षेत्रात ‘वाङ्मयचौर्या’चा उच्चार बऱ्याच वेळा होतो. म्हणजे हे क्षेत्रसुद्धा चौर्यापासून मुक्त राहिलेले नाही!

पूर्वी चोर-दरोडेखोर कुठेतरी जंगलात, डोंगरात, आडवाटेच्या ठिकाणी असायचे. चंबळचे खोरे त्यासाठी प्रसिद्ध होते. त्यांचा मुखिया घोड्यावर बसून हिंडायचा (असे चित्रपटांतील दृश्य.) त्याचा राकट तगडा बांधा, जाडजूड मिश्या, व्यक्तिमत्त्वातच एक दरारा दिसायचा.

'Stealing' is one of the sixty four arts
Blog : गृह अधिक लक्ष्मी...

काळाप्रमाणे यात बदल झालेला आहे. चोरीचा प्रकार, चोरीच्या वस्तू, पद्धत साऱ्यांत बदल घडून आलेला आहे. खंडणीवीर, दादा, गुंड, भाई, सुपारीकिलर या मंडळींनी शहरात आपली दहशत निर्माण केली आहे. पूर्वी शासन व हे चोर-दरोडेखोर यांचा छत्तिसाचा आकडा असायचा. आता त्यांनी सहजीवनाचे तत्त्व अंगीकारले आहे.

मध्ये कधीतरी ‘अ‍ॅनकाउंटर’ नावाच्या छोट्या लढायांद्वारे सुपरदादा आम्हीच हे शासक दाखवून देतात. हे खरोखरच सुपरदादा आहेतच, पण त्या दोन गटांच्या मध्ये ’सोफिस्टिकेटेड’ चोरांची एक फळी आहे. ती व्यापारी-कारखानदारांची. पण राजकारणी आणि त्यांची शासकीय यंत्रणा ही सुपर सॉफिस्टिकेटेड स्थान कायम राखून आहे.

हा चोरांचा पदक्रम (हायरार्की) सांगितला. पण चोरी, लूट कशाला म्हणायचे, सोफिस्टिकेटेड चोर कसे दिसतात कुठे असतात याचा बोध होणे आवश्यक आहे.

सामान्य नागरिकाने आपल्या कष्ट, बुद्धी, कौशल्य या मार्गाने मिळविलेला पैसा त्याच्या कळत (त्याला नाइलाज अशी परिस्थिती निर्माण करून) किंवा नकळत (खिसेकापूप्रमाणे) काढून घेणे म्हणजे चोरीच.

ही चोरी अद्ययावत म्हणजे सोफिस्टिकेटेड पद्धतीने शरीराचा भाग बधिर करून किंवा पूर्ण शरीराला भूल देऊन दात काढून घ्यावे तशी केली जाते.

हे चोर राकट, रांगडे भीतिदायक दिसत नाहीत. ते स्वच्छ रुबाबदार पेहेरावात असतात, शहरातील आलिशान घरात राहतात. आलिशान गाड्यांतून, विमानातून प्रवास करतात.

'Stealing' is one of the sixty four arts
Goa Culture: गाल्फ महोत्सवात कुणबी साडी

देशात पैसा वाढतो तथा चोऱ्याही वाढत आहेत. गेल्या आठवड्यांतील बातमी आहे की भारतातील श्रीमंतांची संख्या वाढत आहे. देशांतील एकूण संपत्तीपैकी 40 टक्के संपत्ती ही 1 टक्का अब्जाधीश धनाढ्यांकडे आहे.

म्हणजेच देशांतील माणसे शंभर आणि एकूण संपत्ती 100 रुपये असे मानले तर त्यातील 40 रुपये एकाच माणसाने हडप केले आहेत आणि उरलेले 60 रुपये राहिलेल्या 99 माणसांकडे आहेत.

म्हणजे या 99 माणसांकडे प्रत्येकी 60 पैशांहून कमी रक्कम आहे. पण हेही गणित तेवढे सरळ नाही. त्यात कोट्यधीश आहेत, लक्षाधीश आहेत, अत्यंत गरीब लोकही मोठ्या संख्येत आहेत.

त्यातील शेवटच्या गरीब माणसांकडे 60 रुपयांतील 6 पैसे असतील का याची शाश्वती नाही. कोरोनाच्या काळात पैशांची निर्मिती बऱ्याच प्रमाणात घटली होती. बरेच लोक नोकरी-धंद्याला मुकले होते. स्थलांतर करावे लागले होते.

बरेच लोक मेलेही. याच काळात अब्जाधीशांची संख्या जगभर कधी नव्हे एवढ्या गतीने वाढली. येथे मला या परिच्छेदातील माझे पहिलेच वाक्य खोटे ठरवावे लागते आहे.

या काळात व्यापार-कारखानदारी, वाहतूक सर्व रोडावले होते. त्यामुळे, पैशांची निर्मितीही. मग ही संपत्ती आली कुठून? येथे चक्क चोरीच दिसते.

'Stealing' is one of the sixty four arts
Traffic rules: शहरात वाहन चालवण्याची आदर्श पद्धत

शेतमालाचे दर ठरविण्याच्या नाड्या बाजारव्यवस्थेच्या हाती गेल्याने ही व्यवस्था या दरांमार्गे शेतकऱ्यांना लुटत आलेली आहे. याला सरकारची साथ असतेच.

जेव्हा शेतकऱ्यांची आंदोलने तीव्र होतात तेव्हा चर्चा-वाटाघाटींचा गाजावाजा करून महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यांत काही हजार कोटींची कर्जे माफ केली गेली आहेत.

बँकांतून झालेल्या कर्जवाटपात 55 टक्के बड्या उद्योगांची आहेत. त्यांतील 87 टक्के थकित आहेत. यांपैकी काही लाख कोटी कर्जे गुपचूप माफ केली जातात. बँकेतील पैसा हा सामान्य बचत-गुंतवणुकदाराचा, त्यांच्या कष्टः कौशल्ये बुद्धी यांतून निर्माण झालेला.

सरकारकडील पैसा हा सामान्य करदात्याचा. बड्या धेंडांची भूमिका केवळ डल्लामारुंची. सार्वजनिक पैशांवरील हा दरोडा आहे. बँकेतील उच्चाधिकारी, सरकारी व राजकीय व्यवस्था यांची मिलीभगत.

चोरी मोठ्या रकमांतूनच नव्हे तर थेंब-थेंबे साचलेल्या तळ्यातूनही होते. दूरसंचार (टेलिकम्युनिकेशन) क्षेत्र प्रचंड वाढलेले आहे. मोबाइल हे एक वेगाने वाढणारे व्यसन आहे.

मोबाइलधारकाच्या प्रत्येक कॉलमधून पैसा-रुपयांचे छोटे छोटे थेंब तळे नव्हे सरोवर साठते. त्यावर या क्षेत्रातील दिग्गज कंपन्या थोडक्याच काळात गब्बर झाल्या आहेत. घाईगडबडीच्या या जगात ही खिसेकापूगिरी उत्तम चालते.

पैशांची निर्मिती होते मानवी (व यांत्रिक) कष्टांतून, कौशल्यांतून व बौद्धिक क्षमतेच्या वापरातून. पण त्यांना याचा योग्य मोबदला मिळतो का? शेतकऱ्यांना बाजारव्यवस्था लुटत आलेली आहे.

त्यात बाजारव्यवस्थेला सरकारची साथ असतेच, जेव्हा शेतकऱ्यांची आंदोलने तीव्र होतात, तेव्हा चर्चा, वाटाघाटी यांचा गाजावाजा करून शेतकऱ्यांची काही हजार कोटींची कर्जे माफ केली जातात.

बँकेतून कर्जवाटप होते तेव्हा निम्म्याहून जास्त कर्णे बड्या भांडवलदारांची असतात. यांपैकी जवळजवळ निम्मी कर्जे बुडविली जातात. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा भरपूर गाजावाजा होतो.

त्याहून कितीतरी मोठ्या रकमांची बड्या लोकांची कर्जे गुपचूप माफ केली जातात त्याची वृत्तपत्रात कुठेतरी कोपऱ्यात एक छोटी बातमी बनून राहते.

एवढेच, बँकेतील पैसा हा लहानसहान गुंतवणूकदारांचा काटकसरीने राहून बचत केलेला पैसा. धनाढ्यांची भूमिका केवळ ़डल्लेमारूंची. त्या धनाढ्यांचा हा दरोडा याला बँकेतील उच्चाधिकारी, सरकारी, राजकीय व्यवस्था हे सर्व अनुकूल.

'Stealing' is one of the sixty four arts
USA Election: महासत्तेचा महानायक कोण? अमेरिकेलाही अध्यक्षीय निवडणुकीची लागली चाहूल

सर्वांत जास्त कर्जबुडवेगिरी चालते ती मोठ्या रकमांच्या कर्जदारांची. हजारो कोटींची कर्जे बुडवून दुसऱ्या देशात पळून जाणारे बरेच आहेत. विजय मल्या हे त्यांचे प्रातिनिधिक नाव आहे. याउलट लहान कर्जदार काहीतरी लटपटी करून आपले कर्ज फेडतात.

ते न जमल्यास शेतकऱ्यांसारखे गरीब आत्महत्या करतात, आणि विजय मल्ल्र्यासारखे मोठे कर्जदार निर्लज्जपणे दुसऱ्या देशांत पळून जाऊन चैनबाजी करतात. हे अट्टल दरोडेखोर आणि त्यांना तसे करू देणाऱ्या बँकांचे अधिकारी?

महिन्याकाठी 100-200 रुपये बचत करून त्या भांडवलातून आपल्या सभासदांना छोटी-छोटी कर्जे देणारे गावागावांतील आपल्या अशिक्षित, अर्धशिक्षितांचे बचतगट या जगातील सर्वांत कार्यक्षम बँका ठरलेल्या आहेत. त्यांच्या इतपत सक्षम कर्जवसुलीच्या जवळपाससुद्धा या मोठ्या बँका पोहोचू शकत नाहीत!

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com