Traffic rules: शहरात वाहन चालवण्याची आदर्श पद्धत

बरेचसे चालक पिवळा म्हणजे, ‘तांबडा पडण्यापूर्वीचा घाईगर्दीने निघायचा इशारा’, असे मानतात व तो वेगाने पार करतात, जे कायद्याने पूर्ण चुकीचे आहे. -प्रसाद पाणंदीकर
Driving Skill |Traffic rules
Driving Skill |Traffic rulesDainik Gomantak
Published on
Updated on

Driving in City: आपण गेल्या काही लेखांमध्ये अद्ययावत रस्ता व वाहतूक अभियांत्रिकीचा एक सर्वसमावेशक असा आढावा घेतला. तसेच मागील लेखात द्रुतगती महामार्गांवर गाडी कशी चालवावी हे बघितले. आता आपण वाहनगर्दी, वर्दळ, जंक्शन-नाके व सिग्नल असलेल्या शहरी रस्त्यांवर गाड्या कशा चालवाव्यात ते बघू.

आज रस्त्यांवर, खास करून शहरामध्ये अक्षरशः हजारो वेगवेगळ्या प्रकारची वाहने धावतात, मोठी,मध्यम, छोटी, तिचाकी किंवा दुचाकी. रहदारीच्या मानाने रस्ते लहान असतात. सगळ्या वाहनांत ती अपुरी जागा वापरायची चढाओढ, स्पर्धा व शर्यत लागून जाते. कोणाला संयम किंवा सहनशक्ती नसते. त्यामुळे वाहने वेडीवाकडी व वेगाने हाकली जातात, समन्वय राखला जात नाही व अपघातास कारण ठरतात.

जेव्हा मर्यादित जागेवर असंख्य वाहने सर्व दिशांनी धावतात तेव्हा सगळ्यामध्ये एक शिस्तबद्ध समन्वय असावा लागतो, जेणेकरून एकमेकांवर ना आदळता, सफाईदार व सुरळीतपणे, कोंडी न होता रहदारी चालू राहायला पाहिजे. हा समन्वय साधण्यासाठी रस्त्यावरच्या प्रत्येक चालकाला रहदारी शिष्टाचाराची जाणीव असणे अनिवार्य आहे.

हा शिष्टाचार (प्रोटोकॉल) म्हणजे एका वाहनाने दुसरे एकदम गतिमान असल्याने असल्या गोष्टींचे संपूर्ण व तीक्ष्ण ज्ञान असणे व ते उत्स्फूर्त व तात्काळ पद्धतीने वापरणे गरजेचे ठरते, जेणेकरून रहदारीत सुरळीतपणा येतो व बारीक मोठे अपघात टाळले जाऊ शकतात.

Driving Skill |Traffic rules
Mahadayi River: मी म्हादई बोलतेय...

रहदारीत हा सुरळीतपणा आणण्यासाठी 2017 साली केंद्र सरकारने यांत्रिक वाहन चालन नियमन 2017 ( मोटर व्हेइकल ड्रायव्हिंग रेग्युलेशन्स 2017) कायदा पारित केला. यात रस्त्यावर वाहने कशी चालवावी याच्या अत्यंत सखोल व सर्वसमावेशक सूचना दिलेल्या आहेत.

हा नियमन कायद्यातील व्यवस्थित समजून घेऊन, शिस्तीने, शिष्टाचाराने, शांतीने, परिपक्वतेने, संयमाने व समन्वयाने वाहने चालवली तर रस्ता अपघात बंद किंवा कमी होतील यात शंका नाही. त्यामुळे वाहन चालन नियमन कायदा काय सांगतो हे आपण समजून घेऊया:-

भारतामध्ये गाड्या रस्त्याच्या डाव्या बाजूने चालवल्या जातात. पुढून येणारी गाडी उजव्या बाजूने येते. सगळ्या गाड्यांची सुकाणू उजव्या बाजूला असतात.( राइट हेंड ड्राईव्ह). जगांत 25 टक्के देशांत डाव्या तर उर्वरित 75 टक्के देशांत उजव्या पद्धतीची रहदारी स्वीकारली गेलेली आहे.

  • विभाजक नसलेल्या रस्त्यावर चालवताना गाडी डाव्या बाजूला ठेवणे अनिवार्य आहे. फक्त पुढच्या गाडीला मागे टाकताना, उजव्या बाजूला जाऊन परत रस्त्याच्या डाव्या बाजूला ताबडतोब यावे लागते.

  • विभाजक असलेल्या रस्त्यांवर जर आपण सावकाश वेगाने गाडी चालवत असाल तर गाडी डाव्या बाजूला ठेवावी लागते व दुसऱ्याला पाठीमागे टाकण्याची क्रिया उजवीकडूनच करावी लागते. दुभाजक रस्त्यावर संथ गाडी उजव्या बाजूने चालवणे किंवा दुसरी गाडी डाव्या बाजूने मागे टाकणे हे कायद्याच्या विरुद्ध आहे.

  • जेव्हा रस्त्याच्या मध्ये तुटक पट्टा मारलेला असतो, तेव्हा कुठलेही वाहन तो पार करू शकते. पण जेव्हा तो पट्टा पांढरा किंवा पिवळा अखंड दुहेरी होतो, तेव्हा वाहन त्याच्या डाव्या बाजूला ठेवूनच चालवावे लागते, असे पट्टे पार केले जाऊ शकत नाही. फक्त पुढे आपत्कालीन अडथळा असल्यास ते पार करण्याची मुभा आहे.

  • जिथे जिथे पादचारी मार्ग असतात व रहदारी पोलीस नसतात व ज्यांच्यावर पादचारी रस्ता ओलांडत असतात, त्यांना पहिला हक्क व प्राधान्य बनत असते. त्यामुळे वाहन थांबवून पादचाऱ्याला प्रथम प्राधान्य देणे कायद्याने अनिवार्य आहे.

Driving Skill |Traffic rules
Mahadayi Water Dispute : 'म्हादई' प्रकरणात केंद्राची कृती संघराज्यविरोधी
  • जेव्हा दोन समान महत्त्वाच्या रस्त्यांचा नाका असतो, जिथे सिग्नल किंवा वाहतूक पोलीस असत नाहीत व त्या नाक्यांवर दोन गाड्या काटकोनात जवळ येतात तेव्हा उजव्या बाजूच्या वाहनाला प्राधान्य असते. तोच नाका जर एक प्रमुख रस्ता व एक कमी महत्त्वाचा रस्ता असल्यास, प्रमुख रस्त्यावरच्या वाहनाला प्राधान्य असते.

  • एकाच दिशेने जाणाऱ्या रहदारीत दोन वाहनात एक सुरक्षित असे न्यूनतम अंतर राखणे गरजेचे आहे, जेणेकरून पुढच्या वाहनाने अचानक ब्रेक मारल्यास किंवा वेग कमी केल्यास पाठची गाडी त्यावर आदळू नये.

  • वाहन थांबवताना किंवा वळवताना बाकी रहदारीला दिव्याने किंवा हाताने सूचना देणे अनिवार्य आहे.

  • रस्ता सिग्नलबद्दल गोव्याच्या चालकांमध्ये अज्ञान व अनभिज्ञता आहे. जेव्हा पिवळा सिग्नल पडतो, तेव्हा वाहन थांबवायचे असते. बरेचसे चालक, ‘पिवळा म्हणजे तांबडा पडण्यापूर्वीचा घाईगर्दीने निघायचा इशारा’, असे मानतात व तो वेगाने पार करतात, जे कायद्याने पूर्ण चुकीचे आहे.

Driving Skill |Traffic rules
Blog : गृह अधिक लक्ष्मी...
  • गाडी रस्त्यावर उभी करायची असल्यास पादचारी मार्गावर उभी करणे, तसेच जेथे पार्किंग निषिद्ध आहे, जेथे तिथे व अरुंद, धोकादायक जागेवर, वळणावर किंवा नाक्यांवर वाहन उभे करणे असुरक्षित व कायद्याने गुन्हा आहे.

  • आता सगळ्या रस्त्यांवर रहदारी खुणा व चिन्हे लावलेली असतात. त्यांवरून वळण किंवा गतिरोधक कुठे आहे, वेगमर्यादा, धोकादायक रस्ता, अपघात प्रवणक्षेत्र ओळखून चालक खबरदारी घेऊ शकतो.

  • जेव्हा गतिरोधक असतो तो वेग कमी करण्यासाठी बांधलेला असतो, जेणेकरून सुरक्षितता यावी. असे गतिरोधक दोन तर्‍हेचे असतात, पट्टेरी व वक्र. पण असे पाहण्यात आहे की वाहने पट्टेरी गतिरोधक जुमानतच नसतात. त्यांच्यावर वेग कमी करण्याच्या ऐवजी वाहन जास्त वेगाने चालवले जाते व गतिरोधकाचा उद्देश साध्य होत नाही.

    त्यामानाने वक्र गतिरोधकावर गाड्या वेगाने हाकल्या जाऊ शकत नाहीत. तेव्हा वाहन शिस्तबद्धरीत्या चालवले जाते तेव्हा कुठल्याही गतिरोधकावर वेग कमी करून त्या गतिरोधकाचा आदर करणे व अनुशासन ठेवणे एकदम गरजेचे आहे.

Driving Skill |Traffic rules
Goa Culture: गाल्फ महोत्सवात कुणबी साडी
  • ज्या रस्त्यांवर वेगमर्यादा घातलेल्या असतात किंवा जिथे दृष्टीअंतर कमी असते तिथे वाहनाचा वेग किमान व सुरक्षित ठेवणे गरजेचे असते. त्यामुळे असल्या सगळ्या फलकांना मान देऊन चालवण्याने सुरक्षितता वाढते.

  • हल्लीच्या गाड्या शक्तिमान असतात व सहज त्या तीव्र वेग गाठू शकतात. पण आपत्कालीन स्थितीत अशी गाडी अचानक थांबवणे व टक्कर किंवा अपघात टाळणे हे चालकाच्या शारीरिक तंदुरुस्ती व कौशल्यावर अवलंबून असते. त्यामुळे, वयोवृद्ध, वयस्कर, स्त्रीचालक किंवा तशी क्षमता नसलेल्या चालकांनी ही खबरदारी घेऊन त्यांना आत्मविश्वास असलेल्या वेगानेच चालवणे महत्त्वाचे आहे.

  • गाडी चालवताना कर्कश संगीत, सिनेमा व भ्रमणध्वनीचा उपभोग घेऊ नये. त्यामुळे, चालकाचे लक्ष विकेंद्रित होऊन एकाग्रता भंग पावते. तसेच प्रमाणाबाहेर दारू किंवा अमली पदार्थ घेऊन गाडी चालवल्यास गाडी नियंत्रित केली जाऊ शकत नाही.

  • गाडी चालवताना आसन-पट्टे बांधणे, तसेच दुचाकी चालवताना शिरस्त्राण घालणे अनिवार्य आहे.

  • रस्त्यांवर कमीच ते 154 प्रकारचे रहदारी-सूचना-फलक असतात. ते सगळ्या चित्ररेखा पद्धतीचे असतात. त्यामुळे प्रशिक्षण घेऊन त्यांचे ज्ञान करून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

  • केंद्र सरकारने रहदारीत सुरक्षितता आणण्याकरिता यांत्रिक वाहन चालन नियमन 2017 संमत केला. त्याचा शास्त्रोक्त अभ्यास करून, तंतोतंत पालन करून, तसेच रस्त्यावरचे सगळे फलक, चिन्हे लक्षांत घेऊन शिस्तबद्धरीत्या वाहन चालवल्यास अपघात भरपूर कमी होऊ शकतात व दररोज होणाऱ्या अपघाती मृत्यूत कमालीची घट होऊ शकते व रस्त्यांवर संपूर्ण सुरक्षितता येऊ शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com