Blog : गृह अधिक लक्ष्मी...

जगात सगळ्यात जास्त पगार आईला मिळायला हवा, कारण मुलासाठी ती अख्खे आयुष्य खर्च करते.
Women Empowerment
Women Empowerment Dainik Gomantak
Published on
Updated on

आसावरी कुलकर्णी

गृहं गृहमित्याहुर्गृहिणी गृहमुच्यते।

गृहं तु गृहिणीहीनं कान्तारादतिरिच्यते

(केवळ दगड विटांनी बांधलेल्या घराला घर म्हणत नाहीत तर गृहिणी हेच घर असते. जिथे गृहिणी नसते ते घर अरण्या समान असते ..इति महाभारत.)

कार्येषु मन्त्री करणेषु दासी भोज्येषु माता शयनेषु रम्भा। धर्मानुकूला क्षमया धरित्री भार्या च षाड्गुण्यवतीह दुर्लभा

इति गरुड पुराण

गृहिणी, गृहलक्ष्मी अर्धांगिनी कधी कधी सरकार, कारभारीण इत्यादी. जगातला सगळ्यात फुकट दुर्लक्षित असा व्यवसाय. मानुषी चिल्लर ही 2017 मध्ये विश्वसुंदरी बनली. त्यावेळी तिला प्रश्न विचारण्यात आला होता की जगातला सगळ्यात जास्त पगारास पात्र व्यवसाय किंवा पद कोणते. त्यावेळी तिने दिलेल्या उत्तराने तिला विश्वसुंदरी पद मिळाले. ती म्हणाली की जगात सगळ्यात जास्त पगार आईला मिळायला हवा, कारण मुलासाठी ती अख्खे आयुष्य खर्च करते.

Women Empowerment
Mahadayi Water Dispute : 'म्हादई' प्रकरणात केंद्राची कृती संघराज्यविरोधी

भलेही तो पगार पैशाच्या रूपात नसेल. भावनावश करणारे तिचे है उत्तर सर्वांना फार आवडले. युगानुयुगे हा व्यवसाय, हे पद स्त्री निगुतीने निभावते. तुम्ही म्हणाल व्यवसाय? उलट सुलट चर्चा, पोस्ट,, ट्रोलिंग सगळे सुरू होईल लगेच. पण हे मी नाही 2012 पासून किंवा त्याही पूर्वीपासून भारतात गृहिणी किंवा हाउसवाइफ पद हे पगारास पात्र असे पद आहे अशी चर्चा होते आहे.

संसदेच्या 2012 सालच्या हिवाळी अधिवेशनात अशा प्रकारचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. गोव्यात 2012साली स्वर्गीय मनोहर पर्रीकर यांनी पहिल्याच बजेट सत्रांत स्त्रियांसाठी गृहआधार ही योजना सुरू केली होती, ज्यात नोकरी न करणाऱ्या स्त्रियांना दरमहा 1000 रुपये देण्याचे सरकारने ठरविले होते. आज याच उपक्रमान्तर्गत 1500 दिले जातात.

सुप्रीम कोर्टमध्ये 2021 साली जस्टिस एन व्ही रमण यांच्या अध्यक्षतेखाली एक निवाडा देण्यात आला, ज्यात घरकाम किंवा हाउसवाइफसाठी दरमहा पगार देण्यात यावा किंवा पगारास हे पद पात्र आहे असे नमूद केले होते.

या वेळी निवाड्यात जस्टिस रामणा पुढे म्हणाले होते की गृहिणी जे काम करते त्याचे मूल्यवर्धन करणे खरेच कठीण आहे. पण असे केल्याने सामाजिक एकता , अधोरेखित करण्यासाठी एक यशस्वी पाऊल ठरेल. ज्या प्रकारची कामे घर सांभाळण्यासाठी करावी लागतात, ज्यात जास्ती जास्त महिलाच असतात त्याचे योग्य मूल्य मिळणे गरजेचे आहे.

या सगळ्याची सुरुवात 2011साली झालेल्या जनगणनेतून समोर आलेल्या माहितीमुळे झाली. यात भारतात 15 कोटी महिलांनी हाउस वाइफ हा प्रमुख व्यवसाय असे लिहिले होते.

थोडेसे चक्रावून टाकणारे हे आकडे आहेत. कारण भारतात तरी स्त्रिया जरी व्यवसाय कोणताही करत असल्या तरी गृहिणी पद हे अघोषित असे पद आहे जे इच्छा असो वा नसो प्रत्येक विवाहित स्त्रीकडे चालून आलेले पद आहे.

या लेखमालेसाठी योग्य आकडे मिळावेत म्हणून एक धावते सर्वेक्षण करण्यात आले. प्रश्नावलीद्वारे किंवा प्रत्यक्ष संवादाद्वारे वेगवेगळ्या स्त्रियांचा विचार मी टिपला आहे. गोव्यतील स्त्रियांचे प्रश्न, त्यांचे हुंकार स्पष्टपणे टिपता यावेत त्यासाठी हा प्रपंच. कारण आपण जेव्हा लेखणी हातात धरतो त्यावेळी मनातून झिरपणाऱ्या विचारांना शब्दरूप येते.

पण एखाद्या महत्त्वाच्या घटकांबद्दल लिहिताना ते केवळ एकतर्फी मतमांडणी न राहता फॅक्टचेकर म्हणून मांडले जावे असे मला वाटले. अचानक आलेल्या गृहिणीपदामुळे निर्माण झालेल्या गोंधळ भीती आणि आत्मपरीक्षणातून उतरलेले हे विचार आहेत. या प्रश्नांवर चर्चा व्हावी, जमल्यास त्यांची उत्तरे मिळवीत एवढीच अपेक्षा.

या विषयी बोलत राहूच ‘फुले आणि काचा’मध्ये..

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com