Sao Joao Festival: गोव्यात मान्सूनमध्ये साजरा होणारा 'सांजाव' उत्सव नेमका काय?

संत जॉन यांच्या नावाचा अपभ्रंश होऊन ‘सांजाव' शब्द बनला आहे.
Sao Joao Festival
Sao Joao FestivalDainik Gomantak
Published on
Updated on

What is Sao Joao Festival Goa

गोव्यात प्रत्येक समाजाची जीवनशैली राहणीमान, सण-समारंभ वेगवेगळ्या तऱ्हेने असून गोवेकर प्रत्येकाच्या सण समारंभात आनंदाने सहभागी होतात. गोव्यात उत्सवांची रेलचेल असतेच. त्यातूनही गोव्यातील मान्सून सेलिब्रेशन हे अभूतपूर्व आहे.

मान्सूनच्या सुरुवातीला साजरा होणारा गोव्यातील ख्रिश्चन समाजाचा उत्साहाचा सण म्हणजे ‘सांजाव”. संत जॉन बाप्तिस्ता यांचा जन्मदिवस गोव्यामध्ये ‘सांजाव म्हणून साजरा केला जातो.

संत जॉन यांच्या नावाचा अपभ्रंश होऊन ‘सांजाव' शब्द बनला आहे. हा सांजाव सण 24 जूनला गोव्यातील विविध भागात साजरा होणार आहे. गोवेकरांना या पारंपरिक सांजाव उत्सवाची धूम पाहायला मिळणार आहे.

'सांजाव' म्हणजे काय:-

बायबलमधील कथेनुसार जीजसच्या जन्माची बातमी ऐकल्यानंतर आपल्या आईच्या पोटात असलेल्या जॉन बाप्तिस्त यांनी आनंदाने उडी मारली होती.

जॉ बायबलच्या कहाणी नुसार देवाची आई 'मेरी'ने आपली बहीण एलिजाबेथला आपल्याला जीजस नावाचा बाळ होणार असल्याचे सांगितले.

तेव्हा एलिजाबेथ गर्भवती होती आणि ते ऐकल्यावर तिच्या पोटातील बाप्तिस्त त्यांनी आनंदाने उडी मारली होती. तेव्हापासून हा सण साजरा केला जात असल्याचे बोलले जाते.

ख्रिस्ती लोक विहिरीला एलिझाबेथच्या गर्भाशयाचे प्रतीक मानत असून विहिरीत उडी मारणे म्हणजे ख्रिस्ताचा जन्माचा आनंद साजरा करण्यासारखे मानतात

Sao Joao Festival
MLA Michael Lobo: शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला विरोध नाही, पण सर्वांना विश्वासात घ्यायला हवे होते...

अशा प्रकारे साजरा होतो 'सांजाव:-

धो-धो पडणाऱ्या पावसामध्ये डोक्यावर रंगीत फुलांचे मुकुट घालून (डोक्यावर घातलेल्या मुकुटाला कॉपेल असे म्हणतात) हातामध्ये माडाच्या झाडाच्या फांद्या आणि वाद्यांचा गजर करीत ख्रिस्ती बांधव या दिवशी गटागटाने फिरत असतात.

मौज मस्ती करत कोकणी गाणी गात, घुमट वाजवत सर्वजण आनंदाने नाचतात. या सणात तरुणाईचा उत्साह वाखडण्याजोगा असतो. विहिरीमध्ये डुबकी मारण्याची चढाओढ त्या सोबतच सजवलेल्या होड्यांची स्पर्धा आणि संगीत नृत्याचा कार्यक्रम देखील यावेळी पाहायला मिळतो. (What is the tradition of Sao Joao?)

Sao Joao Festival
सोळा खून, बायकोच्या मैत्रिणीवर बलात्कार करणाऱ्या दुपट्टा किलर महानंद नाईकच्या फॅमिलीचे पुढे काय झाले?

होड्यांची स्पर्धा:-

सांगोड (दोन बोटी एकत्र करून बांधणे) किंवा केळीच्या झाडाच्या खोडांना एकत्र बांधून तयार केलेल्या सजवलेल्या फ्लोटवर रंगीत पोशाख परिधान करून त्यावर ख्रिस्ती बांधव बसून होड्या वल्लव्हण्याची स्पर्धा लावतात.

यावेळी सांगोडवर बसून धार्मिक भजने देखील गायली जातात. यासोबतच अनेक साहसी खेळ आणि स्पर्धा आयोजित केल्या जातात. हे सर्व झाल्यानंतर चर्चमध्ये पोहोचताच मेणबत्त्या पेटवल्या जातात आणि फटाके फोडले जातात.

Sao Joao Festival
Goa Drugs Seizure: गोव्यात ड्रग्ज विकून 'लकी'झाला करोडपती; घर, कार खरेदी केल्याचं उघड

खाद्य पदार्थांची रेलचेल:-

या दिवशी आंबे, फणस, काजू, 'फेनी', बिअर इत्यादी पदार्थांचे एकमेकांना वाटप केले जाते. यादिवशी सासू सुनेसाठी संपूर्ण जेवण तयार करते. जेवणात स्वादिष्ट पदार्थांचा समावेश केला जातो.

सणस, तांदळाची गोड डिश, किसलेले खोबरे, बेदाणे, 'पाटोडिओ', रपूर भाज्या, मिठाचा मासा, खाऱ्या पाण्याचा आंबा आणि मुगाच्या डाळीत बुडवलेली कडक गोलाकार ब्रेड आणि इतर पारंपारिक खाद्यपदार्थांची रेलचेल असते.

असा हा सेंट जॉन द बॅप्टिस्टचा सण 24 जून रोजी साजरा केला जाणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com