'ओ मनचली कहा चली' ट्रकवर लिहिलेल्या भन्नाट शायरी ...

मालवाहू, प्रवासी वाहनांच्या मागचा मजकूर हासुद्धा मनातल्या काव्याचा आशयगर्भ उत्स्फूर्त अविष्कार असतो.
ओ मनचली कहा चली
ओ मनचली कहा चलीDainik Gomantak
Published on
Updated on

आपण कधी रस्त्यावरून धावणाऱ्या मालवाहू ट्रक, टेम्पो, प्रवासी रिक्षा, ट्रॅक्स (Taxi) आधी वाहनांच्या पाठीमागची छोटी वाक्ये किंवा, आपण त्याला पथ-काव्यच म्हणू, कधी वाचता का? काही-काही फारच लक्षवेधी आणि आकर्षक असतात. भाव-कवितांचा नजराणाच जणू! साहित्यात नवे नवे रचनात्मक आणि कलात्मक असे जागतिक स्तरांवरचे प्रयोग होतच असतात. कथेमध्ये ‘अलक’ (अति लघुत्तम कथा) असा नवीनच प्रयोग अवतरला आहे. कवितेमध्ये हायकु आहेत, कणिका, रुबाई असे लघुत्तम प्रयोगही आहेत. त्यात या ‘पथ-काव्या’ची भर घालायला हरकत का असावी?

मालवाहू, प्रवासी वाहनांच्या (Vehicle) मागचा मजकूर (Text) हासुद्धा मनातल्या काव्याचा आशयगर्भ उत्स्फूर्त अविष्कार असतो. उदाहरणार्थ हेच पहा ना, ‘तुझ्यात जीव रंगला, साथ तुझी हवी मला, हे जीवन जगताना, आठवण येते तुझी मला, मी एकटी असताना....’काही ट्रकांच्या (Truck) मागच्या मजकूरातून आपल्या वाहनांबद्दल असलेली श्रद्धा, प्रेम, अभिमान दिसून येतो. ट्रकसारखे (Truck) आकाराने मोठे, अवजड वाहन असेल तर ‘शहर का राजा’, ‘रस्त्यांचा राजा’ अशी नावे. ट्रॅक्स, रिक्षा, मालवाहू असे आकाराने लहान असलेले वाहन असेल तर ‘शहर की रानी’, ‘रस्त्याची राणी’ वगैरे’ ‘दिल्ली चलो, महाराष्ट्र चलो, चलो किसी मेले मे, दुनिया भर की सैर करो, माल भरो मेरे ठेले मे....’ एकेका ट्रकची किंमत लाखों रुपयांच्या घरात असते. कुणी आयुष्यभराच्या कमाईतून तर कोणी बँकेमधून (Bank) , आपल्या इष्ट मंडळींकडून कर्ज घेऊन विकत ट्रक विकत घेतलेला असतो आणि माल सुखरूप जागी पोहोचून परत परत येईपर्यंत तो बिचारा रस्त्यावरून धावत असतो. अवतीभवती स्पर्धेचे विचित्र जग, शत्रूंची धंद्यावर वाईट नजर.... हे सगळं सकारात्मक (Positive) रीतीने स्वीकारून धंदा करण्याची जिगर मालवाहू वाहनांच्या मागच्या मजकुरात प्रतिबिंबित झालेली दिसते. रोज काम मिळायला हवे.. रोज धंदा व्हायला हवा या भावनेने केलेले आवाहन ‘माल भरो मेरे ठेले मे’.... या शब्दातून दिसते.

ओ मनचली कहा चली
असे करायचे पोर्तुगीज गोव्यावर राज्य

‘आई बाबांचा आशिर्वाद’, ‘आजी-आजोबांचा आशीर्वाद’ अशा आशयाच्या मजकूरातून त्यांच्याविषयी असलेला आदर आणि प्रेम व्यक्त होते. ‘मेरा भारत महान’, ‘जय महाराष्ट्र’, ‘जय गोवा’ यासारख्या ओळींतून आपल्या देशाविषयाचा, प्रांताविषयीचा अभिमान व्यक्त होतो. ‘श्रद्धा आणि सबुरी’, ‘भिऊ नको, मी तुझ्या पाठीशी आहे’ ‘हे देवा, सर्वांना सुखी ठेव’ अशा शब्दांमधून सद्गुरूविषयी श्रद्धा आणि विश्वास व्यक्त होतो. ‘दामबाब’, ‘दूध सागर’, ‘आई चांगभलं’, ‘जगदंब’, ‘हर हर महादेव’ अशा नावातून त्या त्या ठिकाणच्या श्रद्धास्थानांबद्दल आदर भाव व्यक्त होतो. एका टॅक्सीवर लिहिले होते, ‘मनचली’. टॅक्सीवाल्याचा (Taxi) खुलासा होता की त्याच्या टॅक्सीला (Taxi) पाहून लोकाना ते ग़ाणे आठवावे,-‘ ओ, मनचली कहॉ चली.....’

काहीवेळा चमत्कृतीपुर्ण मजकूरही दिसतो. उदाहरणार्थ, 13 मेरा 7, ‘1 तेरा 7 है’. ‘मै भरके के चली जाऊंगी, तुम देखते रहो” असे एखाद्या गीताच्या ओळीत किंचितसा बदल करून लिहिले जाते. ‘आंग मुजे चोय पुण हात लाय नाका’ हे जशी एखादी देखणी अस्तुरी आपल्याकडे कटाक्ष टाकणाऱ्या एखाद्याला आव्हानात्मकपणे सांगते, अगदी तसंच रस्त्यावर धावणारी एखादी वाहनसुंदरी, ‘देखो मगर प्यार से’ असं लाडिकपणेही सांगते.

‘सदा सुहागन’, भावेश्री हि नावे वात्सल्यपुर्ण बापाने ठेवल्यासारखी. वाहनसुंदरीना अनेकदा वाटते की आपण इतक्या वेगवान, कर्तबगार आणि देखण्या आहोत तर कुण्या पाप्याची आपल्याला नजर लागणे सहज शक्य आहे. मग ती बजावून सांगतात, ‘बुरी नजरवाले तेरा मुह काला’, ‘बुरी नजरवाले तेरा बेटा जीये, बडा होके तेरा खून पीये’. तर काही वाहनांच्या समजूतदारपणे, लिहिलेले असतं, ‘दुश्मन की दुवा’, ‘किसी की अमानत देख, तू हैरान न हो. खुदा तुझे भी दे गा, तू परेशान न हो.

वाहनांच्या (Vehicle) पाठीला काही डोळे नसतात. आपलं वाहन कितीही जपून चाललले तरी मागून कोणी धडक दिली तर? मागून येणाऱ्या वाहनांना जरा रास्त सुचना, इशारे, धमक्या, कानपिचक्या देऊन आपलं वाहन (Vehicle) सेफ (Safe) ठेवण्याचीही पराकाष्टा होते, - ‘वेट फोर साईड’, ‘सुरक्षित अंतर ठेवा’, ‘बाबुजी जरा धीरे’, ‘अति घाई संकटात नेई’ इत्यादी इत्यादी. काहींवर तर स्पष्ट लिहिलेलं असतं, ‘दो मे एक, नोकरी या लापरवाही?, ‘तुम्हाला पोरेबाळे आहेत की नाहीत?’ घाटदऱ्यांमधून जाणाऱ्या ट्रकवर (Truck) चक्क मराठमोळे काव्यही सापडते, ‘आला आला खंडाळ्याचा घाट, करू नको थाट. नाही तर लागेल तुझी वाट!’ आणि एखाद वाहन (Vehicle) सूचकतेने सांगते, ‘बुलाती है मगर जाने का नही.’ – सुज्ञास अधिक सांगणे न लगे.

ओ मनचली कहा चली
जाणून घ्या बांदोडा येथील प्राचीन महालक्ष्मी मंदिराचा इतिहास

वाहनामागची (Vehicle) ही बोलकी पथकाव्ये सूचकपणे खूप काही सांगत असतात. धमक्यांची, आपलेपणाची, परकेपणाची, सूचनांची ही भाषा, आपली आणि वाहनांची (Vehicle) साथ दोस्तीच कथन करत असतात. वाहनचालकाना घरदार, मुले-बाळे सोडून, घाटातील वळणे-आडवळणे ओलांडून किती तरी दूर दूर जावं लागतं. त्या प्रवासात (travel) येणारी व्याकुळता, एकटेपणा वाहनामध्ये (Vehicle) काव्याच्या रूपात उमटतो. कोणी लिहिलं असेल हे रस्त्यावरचा हटके काव्य? वाटेवरच्या या अनाम काव्यप्रभूना ‘बॉन वॉयेज!’ - नारायण महाले

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com