जाणून घ्या बांदोडा येथील प्राचीन महालक्ष्मी मंदिराचा इतिहास

बांदोडा येथील नागेश मंदिराच्या समिती कार्यालयाच्या भिंतीवरील विजयनगर काळातील दगडी शिलालेख या विधानाचा पुरावा आहे.
जाणून घ्या बांदोडा येथील प्राचीन महालक्ष्मी मंदिराचा इतिहास
जाणून घ्या बांदोडा येथील प्राचीन महालक्ष्मी मंदिराचा इतिहास
Published on
Updated on

आपल्या गोव्यात (Goa) महालक्ष्मीची काही मंदिरे (temple) आहेत. पणजी (Panjim) येथील महालक्ष्मी मंदिर, बांदोडा येथील महालक्ष्मी मंदिर, नेत्रावळीचे महालक्ष्मी मंदिर, कोलवा येथील महालक्ष्मी मंदिर, शिरसई येथील महालक्ष्मी मंदिर इत्यादी. आजच्या लेखात आपण बांदोडा येथील महालक्ष्मी मंदिराबद्दल जाणून घेऊ. महाराष्ट्रातील शिलाहार राजांनी सामान्य युगातील 765 पासून 1010 पर्यंत गोव्यावर राज्य केले.

जाणून घ्या बांदोडा येथील प्राचीन महालक्ष्मी मंदिराचा इतिहास
गोव्यातील 18 वर्षांवरील महिलेला मिळणार दरमहा 1000 रूपये

प्राचीन काळात गोव्यावर राज्य (State) करणाऱ्या शिलाहारांच्या दक्षिण कोकण (Konkan) शिलाहार आणि उत्तर कोकण शिलाहार अशा दोन शाखा होत्या. शिलाहार हे महालक्ष्मीचे उपासक होते. नेत्रावळी येथील महालक्ष्मी मंदिर, कोलव्याचे महालक्ष्मी मंदिर आणि बांदोडाचे महालक्ष्मी मंदिर ही तिन्ही मंदिरे बहुधा दक्षिण कोकण शिलाहार युगातील आहेत. बऱ्याच जणांचे असे मत आहे की बांदोडा येथे जे महालक्ष्मीचे मंदिर आहे, ते सोळाव्या शतकात पोर्तुगीजांच्या जाचामुळे कोलवा येथून स्थलांतरित केले होते. परंतु हे खरे नाही. बांदोडा येथील महालक्ष्मी मंदिर हे या ठिकाणीच बांधण्यात आलेले मूळ मंदिर असून सोळाव्या शतकात कोलवा येथून ते स्थलांतरित झालेले नाही, ही वस्तुस्थिती आहे.

बांदोडा येथील नागेश मंदिराच्या समिती कार्यालयाच्या भिंतीवरील विजयनगर काळातील दगडी शिलालेख या विधानाचा पुरावा आहे. विजयनगर काळातील विजयनगरचा राजा देवराय प्रथम यांच्या नावावरील हा शिलालेख सामान्य युगातील 1413 या वर्षाचा आहे. या शिलालेखात ‘1413 मधील बांदोडा येथील महालक्ष्मी मंदिर’ असा स्पष्ट उल्लेख आहे. याचा अर्थ 1413 सालातही हे मंदिर बांदोडा येथेच होते. म्हणजेच सोळाव्या शतकात कोलवा येथून ते स्थलांतरित झाले नव्हते. मग कोलवा येथील महालक्ष्मीचा या बांदोडा येथील महालक्ष्मीशी काय संबंध? निःशंकपणे कोलवा येथे असलेले महालक्ष्मीचे मंदिर 1560 मध्ये रायतूर येथील किल्ल्याचा पोर्तुगीज किल्लेदार दिओगो रॉड्रिग्स याने इन्क्विझिशन काळात पाडले होते.

त्यामुळे या कोलवा महालक्ष्मीच्या निस्सीम भक्तांनी पोर्तुगीजांच्या हातून महालक्ष्मीच्या मूर्तीची विटंबना होऊ नये म्हणून त्याच वर्षी ही मूर्ती बांदोडा येथील महालक्ष्मीच्या मंदिरात स्थलांतरित केली. ही कोलवा येथील महालक्ष्मीची मूर्ती बांदोडा येथील महालक्ष्मीच्या मूर्तीच्या मागे गुप्तपणे ठेवण्यात आली.

जाणून घ्या बांदोडा येथील प्राचीन महालक्ष्मी मंदिराचा इतिहास
‘नो मास्क-नो टोकन’; दूधसागरला भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी कडक नियम

अंत्रुज महाल किंवा फोंडा तालुक्यातील बांदिवडे किंवा बांदोडा येथील महालक्ष्मी मंदिर हे शांत आणि रम्य असे सुंदर मंदिर आहे. सुंदर सजवलेले फाटक भक्तांचे मंदिरात स्वागत करते. पिवळ्या आणि केशरी रंगांच्या मिश्र छटा उंच दीपस्तंभासह उभ्या असलेल्या या सुंदर मंदिराचे अध्यात्म आणि सौंदर्य वाढवितात. बांदोडा येथील महालक्ष्मीच्या उत्कट भक्तांद्वारे मंदिरात वर्षभर अनेक विधी आणि उत्सव केले जातात.

बांदोडा हा सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध असा गाव आहे. श्री रामनाथ मंदिरासारख्या स्थलांतरित आणि श्री नागेश आणि श्री महालक्ष्मी मंदिरासारख्या मूळ मंदिरांच्या निवासाने हा गाव अधिकच पावन झाला आहे. वीरगळ, सती शिळा, ‘दिवजा फातोर’, लिंग, सौंदेकर राजाचा शिवतीर्थ राजवाडा, बांदोडा येथील जैन वस्ती, 1904 साली बांधलेले सेंट रॉक हिल चर्च, 1424 सालापासून उभे असलेले बोकडबाग येथील सरदेसाईंचे वारसा जतन करणारे घर ही बांदोडा गावातील इतर अनेक वैशिष्ट्ये आहेत. इतिहासात रमलेल्या बांदोडा या सुंदर गावातील महालक्ष्मी मंदिर गावातील तेज आणि प्रसन्नता अधिक वाढवते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com