Goa: नव्या राज्यपालांशी संवाद, गोमंतकीयांची स्पंदने टिपणार

पी. एस. श्रीधरन पिल्लई जनतेत मिसळणारे राज्यपाल आहे. सहा महिन्यांपूर्वी गोव्याच्या (Goa) राजभवनात ते राहून गेलो होते.
New governor of Goa P. S. Sreedharan Pillai
New governor of Goa P. S. Sreedharan PillaiDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: मी जनतेत मिसळणारा राज्यपाल आहे. सहा महिन्यांपूर्वी गोव्याच्या राजभवनात मी राहून गेलो होतो, तेव्हा मला येथेच यायचे आहे, याची सुतराम कल्पना नव्हती. केरळ आणि गोव्यामध्ये साम्य आहे. त्यामुळे आज दिल्लीत असताना मला गोव्याच्या राज्यपालपदी बदली झाल्याचे समजले, तेव्हा सुखावल्यासारखेच झाले असे मनोगत राज्याच्या राज्यपालपदी बदली झालेले पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी ‘गोमन्तक’शी बोलताना व्यक्त केले. (The new governor of Goa P. S. Sreedharan Pillai expressed his views while talking to Gomantak)

प्रश्न : गोव्यात जायचे आहे, हे समजल्यावर मनात कोणती भावना दाटली?

उत्तर : लहानपणापासून मला गोव्याचे आकर्षण होते. मलाच कशाला केरळमधील प्रत्येकाला गोव्याचे आकर्षण असते. त्यामुळे गोव्यात आता जाता मिळणार याचा आनंद झाला. गोव्यात फिरण्यासाठी मी यापूर्वी अनेकदा येऊन गेलो आहे. सहा महिन्यांपूर्वीही दोनापावलच्या राजभवनात माझा मुक्काम होता. त्यावेळी मला येथेच राज्यपाल म्हणून यायचे आहे, याची कल्पनाही मी केली नव्हती.

प्रश्न : मग गोव्यात कधी येणार?

उत्तर : आता कामानिमित्त दिल्लीत आलो आहे. आज दुपारपर्यंत आयझॉलला परतेन. त्यानंतर इतर प्रशासकीय कामे मार्गी लावून मला निघावे लागेल. त्याला किमान एक आठवडा तरी लागेल. मला मनाने उद्याच गोव्याला जावेसे वाटत असले तरी काही कर्तव्ये असतात ती पार पाडावीच लागतात.

New governor of Goa P. S. Sreedharan Pillai
पी एस श्रीधरन पिल्लई यांची गोव्याच्या राज्यपालपदी नियुक्ती

प्रश्न : गोव्यात आल्यावर काही विषय प्राधान्याचे असतील काय?

उत्तर : मी लौकिकार्थाने राजभवनातच राहणारा राज्यपाल नाही. मला लोकांत मिसळण्यास आणि लोकांची स्पंदने टिपणे आवडते. त्यामुळे जनसंवाद हाच माझा एककलमी कार्यक्रम राज्यपालपदी आल्यावर असेल. राज्यपाल हे घटनात्मक पद असले तरी त्या पदावरील व्यक्तीला जनतेच्या आशा आकांक्षांची, भावनांची किमान माहिती असावी लागते. निर्णयप्रक्रीयेसाठी ती महत्त्वाची असते.

New governor of Goa P. S. Sreedharan Pillai
पाहा या 8 राज्यांचे 'हे' आहेत नवीन राज्यपाल...!

प्रश्न : जनतेत अशा मिसळण्याचा काही फायदा या पदावर असताना होतो?

उत्तर : ईशान्येकडील लोक नेहमी बाहेरच्या माणसाशी फटकून वागतात. ती व्यक्ती सरकारी असेल तर बघायलाच नको. सरकारी कार्यक्रमांवर बहिष्कार ठरून गेलेला होता. मी संवाद साधणे सुरु केले आणि ते कार्यक्रमांतही सहभागी होऊ लागले. आपण तर लोकांना प्रेम दिले तर उलटपावली किमान द्वेष वाट्याला येणार नाही एवढे नक्की.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com