I compete naturally: नैसर्गिक शरीरस्वास्थ्याचा यथोचित पुरस्कार

आयसीएन आयोजित करत असलेली स्पर्धा नैसर्गिक शरीरसौष्ठवपटूंना योग्य न्याय देते- साहिल
Bodybuilding
BodybuildingDainik Gomantak
Published on
Updated on

साहिल चोपडेकर

आयसीएन (आय कॉम्पिट नॅचरली) ही स्टरोईड किवा तत्सम गोष्टींना दूर ठेवून, जगभर आयोजित केली जाणारी शरीरसौष्ठव स्पर्धा आहे, मॉडेलिंग, बॉडीबिल्डींग, शरीरसौष्ठव, बिकीनी, फॅशन इत्यादी विभागात आयसीएन स्पर्धा आयोजित करते.

सुदृढ नैसर्गिक क्रीडापटूचा समुदाय तयार करणे हे उद्दिष्ट ती बाळगते. आरोग्य आणि तंदुरुस्तीसाठी प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीची उर्जा ही अक्षय्य असते हेच सिध्द करण्याच्या ते कायम प्रयत्नात असतात. ‘आयसीएन’ची भारतीय शाखादेखील वर्षभर अशा स्पर्धा भारतात आयोजित करत असते.

नरिमन पॉईंट, मुंबई येथे 27 मे रोजी आयोजित झालेल्या स्पर्धेत गोमंतकीय शरीरसौष्ठव स्पर्धकांनी भाग घेतला होता. त्यात वास्कोच्या साहिल शर्मा व पणजी येथील साहिल चोपडेकर यांनी घवघवीत यश मिळवले.

पणजी येथील साहिल चोपडेकर याने तीन विभागात भाग घेतला होता. ‘मॅन्स फिजीक’ या विभागात त्याला तिसरे स्थान (ब्राँझ पदक) लाभले तर ‘मॅन्स फिटनेस मॉडेल’ व ‘मॅन्स क्लासिक फिजिक’ या इतर दोन विभागात त्यांने अनुक्रमे 4 थे व 5 वे स्थान मिळवले. विविध विभागात मिळून या स्पर्धेत भारतभरच्या 396 स्पर्धकांनी भाग घेतला होता.

Bodybuilding
ST Reservation: राजकीय आरक्षणासाठी आता जाग आली?

गोव्यातदेखील अनेक शरीरसौष्ठव स्पर्धा आयोजित होतात, पण त्यापैकी बहुतेक स्पर्धामध्ये स्टॅरोईडसेचे सेवन करून शरीराला आकार दिलेले बॉडीबिल्डर भाग घेत असतात.

साहील चोडणकर म्हणतो, ‘गेली चार वर्षे मी माझे शरीर बळकट करण्याच्या हेतूने जीममध्ये जातो मात्र गोव्यात आयोजित होणाऱ्या स्पर्धेत मी अशासाठी भाग घेणे टाळतो.

कारण यापैकी बहुतेक स्पर्धात ‘ड्रग टेस्ट’ हा प्रकार नसतो. मला माझे शरीर ड्रग किंवा स्टॅरोइडसपासून मुक्त ठेवून काम करायचे आहे. आयसीएन ही जगभर ड्रग टेस्टेड स्पर्धा आयोजित करणारी एक विश्‍वासार्ह संस्था आहे.

या संस्थेने आयोजित केलेल्या शरीरसौष्ठव स्पर्धेमधील स्पर्धकांची ड्रग टेस्ट यूएसए मधील ओटावा इथल्या लॅबोरेटरीत परिक्षणासाठी पाठवली जाते.’

Bodybuilding
कुशल चेंबर संगीतकार - चेल्सी आणि क्लोई

साहिल पणजी येथील फिटनेस बार या व्यायामशाळेत गेली दोन वर्षे व्यायाम घेतो आहे. आपले शरीर कमावण्याच्या बाबतीत तो खूपच गंभीर आहे. त्यासाठी त्याने कोचकडून वैयक्तिक मार्गदर्शनही घेतलेले आहे.

आतापर्यंत कुठल्याही शरीरसौष्ठव स्पर्धेत त्याने भाग घेतलेला नव्हता, पण आयसीएन आयोजित करत असलेल्या स्पर्धेत त्याला भाग घ्यावासा वाटला याचे एकमात्र कारण होते ते म्हणजे ही स्पर्धा नैसर्गिक शरीरसौष्ठवपटूंना योग्य न्याय देते.

साहिल या स्पर्धेसाठी गेले चार महिने तयारी करत होता. स्पर्धेच्या तीन विभागात त्याने नाव नोंदवले व या तिन्ही विभागात तो पहिल्या पाचात येऊ शकला. अशाप्रकारे केवळ व्यायाम करुन नैसर्गिक पध्दतीने आपले शरीर कमावणारे खूप कमी लोक असतील.

त्यातून शरीर भले सिनेमांच्या नायकांसारखे परफेक्ट सिक्स पॅक बनतही नसेल कदाचित पण ते ड्रगमुक्त असल्याने आरोग्यपूर्ण नक्कीच असते. साहिल अशाच नैसर्गिक शरीरस्वास्थ्याचा पुरस्कार करतो. त्यामुळे त्याला पदके मिळो वा न मिळो, तो कायम विजेता असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com