गोमंतकीय साहित्य आणि स्त्री

वेळेचा, काळाचा दबाव सांभाळणारी ती स्त्री अजून गोमंतकीय साहित्यात आलेली नाही.
Women
WomenDainik Gomantak
Published on
Updated on

गोव्याची स्त्री साहित्यात कितपत दिसते? गोव्याच्या स्त्रीचा विचार करता, ती नोकरी करणारी असली तरी आपल्या घरातल्या परंपरा सांभाळण्याचा दबाव तिच्यावर भयंकर असतो.

रीतीरीवाज सांभाळायचे तर ते घरातल्या बाईने सांभाळावे अशी परिस्थिती आहे. पण त्याचं चित्रण साहित्यात कितपत केलं गेलं आहे हा प्रश्न आहे. वेळेचा, काळाचा दबाव सांभाळणारी ती स्त्री अजून गोमंतकीय साहित्यात आलेली नाही.

Women
Painting Training: पेन्सिल टू पोर्टफोलिओ

कामावर जाताना स्त्रियांना बसमधून प्रवास करावा लागतो. गोव्यातील बसमधून स्त्रियांना करावा लागणारा प्रवास अजिबात सुखावह नाही. गोव्यात दिवसेंदिवस वाढणाऱ्या गर्दीमुळे सकाळच्या वेळेस कामाला निघालेल्या स्त्रीला बसमध्ये सन्मानाने जागा मिळत नाही ही शोकांतिका आहे.

खरे म्हणजे तिचं दुःख कुणालाच कळत नाही. मंत्री-संत्री तर आपल्या गाड्यांमधून प्रवास करत असतात. स्त्रियांच्या या प्रश्नाची कल्पना त्यांना आहे की नाही हा देखील एक प्रश्न आहे. महिला आयोगाच्या सदस्या देखील आपापल्या गाड्यांमधून प्रवास करतात.

त्यामुळे सामान्य स्त्रीला होणारा हा दैनंदिन जाच त्यांनाही जाणवत नाही असे मला वाटते. या त्रासाचं चित्रण कुठे आले आहे साहित्यात? अनेकांना हा ‘विषय’ आहे याची कल्पना देखील नसेल व त्यामुळे तो मांडलाही जात नसेल.

Women
शिवकर्णिका चित्रकला प्रदर्शन

स्त्री शिक्षणाचे प्रमाण गोव्यात चांगले आहे पण तिच्या शिक्षणामुळे तिच्या आजूबाजूला असणाऱ्या माणसांच्या विचारात काही फरक पडला आहे का? खांडोळा कॉलेजमध्ये प्राध्यापिका असलेल्या मुलीबद्दल जे घडले व ज्या प्रकारे तिची हत्या झाली ते दुःखदायक होतं.

ती घटना घडत असताना तिने मदतीसाठी केलेला आक्रोश कुणाच्या कानावर गेलाच नसेल काय? एक स्वावलंबी स्त्रीची प्रगती समाजाला पहावत नसेल काय? बायका जबाबदारीने आपले स्वातंत्र्य निभावू शकतात हा विश्वासच आपल्या समाजात नाही ही देखील एक शोकांतिका आहे.

Women
World Bicycle Day: मिशन लाईफ

विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे आपले राहणीमान बदलत चालले आहे पण त्याला सुसंगत असे वैचारिक बदल होताना काही दिसत नाहीत. नव्या आणि जुन्या काळाचा संबंध साधून नव्या काळाचे जगणे आपण निर्माण का नाही करू शकत?

स्वतंत्र बाण्याने जगणाऱ्या स्त्रिया आहेत. त्या आपल्या पद्धतीने जगताहेत. पण त्यांच्या विचारांचे सर्वसामान्यकरण होताना दिसत नाही. या साऱ्याचे चित्रण गोमंतकीय साहित्यातून होण्याची गरज आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com