World Bicycle Day: मिशन लाईफ

या उपक्रमात गोव्यातील 7 सायकल क्लब एकत्र आले होते
World Bicycle Day
World Bicycle DayDainik Gomantak
Published on
Updated on

World Bicycle Day जागतिक सायकल दिन आणि जागतिक पर्यावरण दिन यांचे औचित्य साधून रविवार 4 जून आयोजित केल्या गेलेल्या ‘सायक्लोथॉन’ला भरीव प्रतिसाद लाभला.

यात सहभागी झालेल्यामध्ये सर्वात कमी वयाचा सायकलपटू मडगावचा 9 वर्षे वयाचा जोनाह ग्राशियस हा होता. वास्को येथील81वर्षे वयाचे, माजी विंग कमांडर अजित सिंग हे या सायक्लोथॉनमध्ये सहभागी झालेले सर्वात वयस्कर सायकलपटू होते.

World Bicycle Day
Painting Training: पेन्सिल टू पोर्टफोलिओ

या उपक्रमात गोव्यातील 7 सायकल क्लब एकत्र आले- साष्टी रायडर्स, प्रोपेडालेर्झ, स्पोर्टिफ आमिगोस, स्लोप्स ॲन्ट बॅन्डस, पणजी सायकलींग क्लब, गोवा नॅव्हल एरिआ आणि वास्को सायकलींग क्लब अशा सात सायकलींग क्लबच्या सायकलपटूंना पर्यावरण विभाग-गोवा सरकार, गोवा राज्य जैवविविधता मंडळ आणि गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे पाठबळ लाभले होते. गोवा इंडस्ट्रिज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आणि वेर्णा इंडस्ट्रिज असोसिएशनने देखील या उपक्रमाला आपले सहाय्य पुरवले.

World Bicycle Day
शिवकर्णिका चित्रकला प्रदर्शन

या उपक्रमाच्या माध्यमातून, विविधेतून एकता दर्शवणाऱ्या स्वच्छ आणि स्वास्थ्यपूर्ण भारताची ओळख सांगणे हा उद्देश होता. ‘मिशन लाईफ’ हा या उपक्रमातून दिला गेलेला संदेश होता.

कुठ्ठाळी येथील फेरीबोट धक्क्यावर पणजी, मडगाव आणि वास्को येथील सायकलपटू जमल्यानंतर ‘सायक्लोथॉन’ला सुरुवात झाली. सायक्लोथॉनच्या दरम्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

वेर्णा येथील बिर्ला क्रॉस जंक्शन जवळ नूतनीकरण केलेल्या प्रवेशद्‍वांराचे उद्‍घाटन प्रथम करण्यात आले आणि त्यानंतर फळे देणाऱ्या सुमारे 50 पेक्षा अधिक रोपट्याचे रोपण करण्यात आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com