गोव्यात ‘स्वरयज्ञ’- रियाज कार्यशाळा होणार संपन्न

प्रख्यात गायक (Singer) आनंद भाटे म्हणतात, ‘संगीत व कला, मग ते कोणतेही क्षेत्र असो, रियाजाला अनन्यसाधारण महत्त्व आहे
गोव्यात ‘स्वरयज्ञ’- रियाज कार्यशाळा होणार संपन्न

गोव्यात ‘स्वरयज्ञ’- रियाज कार्यशाळा होणार संपन्न

Dainik Gomantak 

Published on
Updated on

प्रख्यात गायक (Singer) आनंद भाटे म्हणतात, ‘संगीत व कला, मग ते कोणतेही क्षेत्र असो, रियाजाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. रियाजाशिवाय संगीतामध्ये परिपूर्णता येत नाही. संगीताच्या (Music) आत्म्यापर्यंत पोहोचण्याची साधना म्हणजे रियाज. गायक व गायिका ज्याप्रकारचा रियाज करतात त्यातऱ्हेने त्यांचे गाणे विकसित व परिपक्व होत जाते, गाण्याला अधिक प्रगल्भता येते. त्यामुळे रियाज सतत करत राहावा लागतो. सुरांची स्थिरता, आवाजाचा भरीवपणा यासाठी गळ्यावर मेहनत घेणे आवश्‍यक असते. आकाराचा आणि ओंकाराचा रियाज आज गायनाच्या क्षेत्रात असलेल्या प्रत्येकाला करावाच लागतो.’

रियाजाचे हे महत्त्व जाणून स्वस्तिक गेली बारा वर्षे सलग ‘स्वरयज्ञ’ ही रियाजाला वाहिलेली अनोखी अशी निवासी कार्यशाळा आयोजित करते आहे. यंदाची ‘स्वरयज्ञ’, रियाजाची कार्यशाळा, 24 , 25 व 26 डिसेंबर 2021 रोजी साळ-डिचोली येथील नयनरम्य अशा ‘राऊत फार्महाऊस’येथे संपन्न होणार आहे.

<div class="paragraphs"><p>गोव्यात ‘स्वरयज्ञ’- रियाज कार्यशाळा होणार संपन्न</p></div>
गोव्यात 'एका पिढीला घडवणाऱ्या’ शिक्षकांचा सन्मान

राष्ट्रीय स्तरावर रियाजावर केली जात असलेली ही एकमेव अशी कार्यशाळा आहे. कार्यशाळेत सर्व सहभागी एका विशिष्ट वेळापत्रकानुसार रियाज करतात. कार्यशाळेत ऊँकार साधना, आलाप, ताना, गमक, सरगम, खर्जसाधना असे रियाजाचे विविध प्रकार स्वरसाधकांकडून तयार करून घेतले जातात. कुठल्याही घराण्याचा गायक (Singer) किंवा विद्यार्थी या कार्यशाळेत भाग घेऊन रियाज करू शकतो. शास्त्रीय, उपशास्त्रीय, सुगम संगीत असे गायनाचे विविध प्रकार गाणाऱ्या कोणत्याही कलाकाराला (Artist) किंवा ज्याला संगीत शिकायचं आहे अशा कुठल्याही विद्यार्थ्याला या कार्यशाळेत सहभागी होता येते.

त्याचबरोबर ज्याला नुसता रियाज ऐकायचा आहे अशी व्यक्तीसुद्धा या कार्यशाळेत सहभागी होऊ शकते. कार्यशाळेत वयाची मर्यादा नाही. रियाजाचा कानमंत्र देणाऱ्या या ‘स्वरयज्ञा’त सर्व सहभागी विद्यार्थ्यांकडून रियाज करून घेण्यात येतो व त्याचबरोबर गायकाला (Singer) लागणारी शारीरिक तंदुरुस्ती, दीर्घ श्वास, आवाजाशी निगडित आहार, ध्वनी यंत्रणा, तंत्रज्ञान, आवाजाची घ्यायची काळजी व इतर गोष्टीवरही प्रकाश टाकला जातो. ही कार्यशाळा निवासी असून, येण्या-जाण्याचा प्रवास, निवास, नाश्ता-जेवण आदीची सोय, अल्प शुल्क आकारून ‘स्वास्तिक’ उपलब्ध करून देते.

यंदाच्या या कार्यशाळेत गोमंतकीय गायक डॉ. प्रवीण गावकर शिबिरार्थ्यांकडून रियाज करून घेणार आहेत. त्याचबरोबर पुणे (Pune) येथील प्रसिद्ध प्रवचनकार डॉ. संजय उपाध्ये हे तीनही दिवस शिबिरार्थ्यांना संगत करणार आहेत. ‘जगणे आनंदाचे, कलावंताचे’ या विषयावर तीन दिवस ते स्वरसाधकांना त्यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. त्याशिवाय या शिबिरात गोमंतकीय युवा योग प्रशिक्षक व ‘सूर्यनमस्कार’ या योग प्रकारात विश्वविक्रम करणारे डॉ. पंकज सायनेकर शिबिरार्थ्यांना ‘योग मार्गदर्शन’ करणार आहेत. खास करून गायकाने करावयाचे योग व प्राणायाम प्रकार यावर ते भर देणार आहेत. तीन दिवस सहभागी होणाऱ्या शिबिरार्थ्यांना प्रमाणपत्रही देण्यात येईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com