गोव्याच्या (Goa) उच्चशिक्षण संचालनालयाचा राज्य शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा काल दिमाखदार वातावरणात पार पडला. आकर्षक सजावट, मंचाची अनोखी मांडणी, पुरस्कार प्राप्त शिक्षकांच्या कार्यकर्तृत्वाचे दृश्य सादरीकरण यामुळे या समारंभाच्या स्तराला देखणी उंची लाभली. ‘एका पिढीला घडवणाऱ्या’ शिक्षकांचा सन्मान कसा करावा याचा हा सोहळा म्हणजे आदर्श वस्तुपाठ होता. गोव्याच्या शिक्षण क्षेत्राशी संबंधित असलेली सारी महनीय व्यक्तिमत्वे या देखण्या समारंभाला (Festival) हजर होती.
गेल्या वर्षी कोरोनाकाळात (Corona) आलेल्या बंधनांमुळे हा पुरस्कार (Award) सोहळा होऊ शकला नव्हता. गेल्या काही वर्षात शिक्षण (Education) क्षेत्रात आपल्या प्रतिभेने चैतन्य निर्माण करणाऱ्या आणि विद्यार्थ्यांमध्ये (Student) हुरूप निर्माण करणाऱ्या वीस आदर्श शिक्षकांचा सन्मान या समारंभात झाला. शिक्षकांना मुख्यमंत्री प्रमोद सावंत (CM Pramod sawant) यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. सभापती राजेश पाटणेकर हे या समारंभाला हजर होते.
या पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा झाला सन्मान
2018-2019 : डॉ.बी.आर.श्रीनिवासन, डॉ. व्हीं.व्ही.कामत, डॉ. रेखा गावकर, डॉ. विकास पिसुर्लेकर, डॉ. सिस्टर मारिया आराधना.
2019-2020 : डॉ. आर.एस.गाड,
प्रा.विद्या देसाई, डॉ. सविता केरकर, डॉ. राधिका नायक, डॉ. राजन मॅथ्यू.
2020-2021 : डॉ. एम.के.जनार्थनम, डॉ. प्रणब मुखोपाध्याय, डॉ. प्रवीण भेंडे, डॉ. वृंदा बोरकर, डॉ.सुशीला सावंत मेंडीस
2021-2022 : डॉ.कौस्तुभ प्रियोळकर, डॉ.ज्योती पवार, डॉ. एफ.एम.नदाफ, डॉ. संजय सावंत, डॉ.डिलेक्टा डिकॉस्टा.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.