स्टारफिश पिकल

तिच्या या पुस्तकाच्या कव्हरवरूनच एका प्रकारच्या ‘फोर्सची’ जाणीव होते. रणजीत होस्कोटे हे नामवंत कलासमीक्षक म्हणतात.
Starfish pickle book
Starfish pickle book Dainik Gomantak
Published on
Updated on

तिच्या या पुस्तकाच्या कव्हरवरूनच एका प्रकारच्या ‘फोर्सची’ जाणीव होते. रणजीत होस्कोटे हे नामवंत कलासमीक्षक म्हणतात, बीना नायकची ही कादंबरी मनावर पकड घेणारी आणि आपला दृष्टिकोन स्पष्टपणे कथन करणारी गतिमान साहित्यकृती आहे. बीना नायक ही एक इलस्ट्रेटर आहे, ग्राफिक डिझायनर आहे. तिने इतरांच्या पुस्तकांना आतापर्यंत कव्हरे तयार केली आहेत पण हे तिचे स्वतःचे पुस्तक. पहिलेच. पुस्तकाचा विषयही अगदी वेगळा आहे.

पुस्तकाची कथा गोव्यातच घडते मात्र या कादबरीच्या कथेची नायिका एका वेगळ्याच व्यवसायात आहे- समुद्राच्या पाण्यात डाईव्ह करून बुडालेल्या बोटींच्या तळाशी जाऊन त्यातली मालमत्ता वाचवणारी, समुद्राचा तळ लाभलेल्या मृतदेहांना पृष्ठावर घेऊन येणारी, बंदराचे स्तळ साफ करणारी. जगभर हा व्यवसाय अधिक करून पुरुषांमार्फतच चालतो. भारतात तर अशा व्यवसायात असणारी एकही स्त्री नाही. मात्र आपल्या ‘स्टारफिश पिकल’ या कादंबरीतून बीना नायक गोव्यातल्या एका हिंदू स्त्रीला आपली नायिका बनवुन, गोव्यातल्या हिंदुसमाजाचे पदर उलगडून दाखवतात.

Starfish pickle book
Restaurant in Goa: शेलडेतील 'अण्णा'!

व्यक्तिगत अथवा सामाजिक मूल्यांच्या संघर्षांचे यथायोग्य चित्रण करण्याच्या उद्देशाने त्यांनी कदाचित आपल्या कादंबरीच्या कथानकात एका स्त्रीला महत्त्वाचे स्थान दिले असावे. ‘डायविंग’ हा व्यवसाय खूप भपकेदार वाटतो परंतु तो तसा नाही आहे. स्कुबा डायविंग ची ग्‍लॅमरस चित्रे पाहून डायव्हिंगबद्दल तसे चित्र मनात निर्माण होते परंतु ड्रायव्हर्सना या कामाचा योग्य मोबदला बहुतेक वेळा मिळत नाही किंवा हे काम फारसे सन्मानजनक ही समजले जात नाही. बीना नायक म्हणतात, ही कादंबरी काल्पनिक आहे त्यामुळे एका स्त्रीला या व्यवसायात स्थान देण्यात त्यांना प्रत्यवाय नव्हता.

या कादंबरीचे वैशिष्ट्य म्हणजे ही कादंबरी प्रकाशित व्हायच्या आधीच भारतातल्या एका सिनेमा प्रॅाडक्शन हाऊसतर्फे ती त्यांच्या नव्या निर्मितीसाठी विकतही घेतली गेली आहे. असे भाग्य क्वचित एखाद्या साहित्यकृतीला लागते. आज कोरोनाकाळात जेव्हा पुस्तक प्रकाशनाला देखील उतरती कळा आलेली आहे अशावेळी सिनेजगत पुस्तकाच्या प्रकाशन संस्थेबरोबर हात मिळवत आहे ही बाब बीना नायक त्यांना खूप सकारात्मक वाटते. बीना नायक या मूळच्या इलस्ट्रेटर असल्याने त्यांनी जवळजवळ पन्नास चित्रे आपल्या या कादंबरीसाठी तयार केली होती मात्र यापैकी साधारण वीस चित्रे ती आपल्या पुस्तकात वापरू शकली. पुस्तकाच्या पानांची संख्या आणि पुस्तकाचे अर्थकारण यासंबंधी तिला आपल्या या पहिल्या पुस्तकाच्या निमित्ताने कळून आलं हे बीना अगदी हसत नमूद करते.

बीना नायक यांची आणखीन दोन पुस्तके लिहून तयार आहेत. तिने ‘स्टारफिश पिकल’ हे पुस्तक लिहून पूर्ण करायला खूप वर्ष घेतली पण आता तिचं पुढचं पुस्तक यायला इतका वेळ लागणार नाही याची तिला खात्री आहे. सध्या बीना ‘स्टारफिश पिकल’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. उद्या २८ सप्टेंबर रोजी गोवा बुक क्लबने तिच्या या पुस्तकावर ऑनलाइन चर्चा आयोजित केली आहे https://meet.google.com/qjd-wtzt-pzr वर लॉग करून आपण त्यात भाग घेऊ शकता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com