Evolution: इव्होल्युशन: मिथ्‌स ॲण्ड बिलिफ्‌स

आज जनरल मेडिकल प्रॅक्टीसची संस्कृतीच लयास जात असताना सरदेसाई यांनी मात्र आपली प्रॅक्टीस चालू ठेवली आहे.
Dr. Ramachandra Sardesai
Dr. Ramachandra SardesaiDainik Gomantak
Published on
Updated on

डॉ. रामचंद्र सरदेसाई

डॉ. रामचंद्र सरदेसाई यांनी जेव्हा पोर्तुगालमधल्या कोईम्ब्रा विद्यापीठातून सर्वोच्च गुणांनी मेडिसिनची पदवी मिळवली तेव्हा त्यांच्या प्राध्यापकांनी तेव्हा त्यांना गोव्यात परतण्याविरुध्द सल्ला दिला होता.

साल होते 1962. गोव्याला त्यावेळी नुकतेच स्वातंत्र्य मिळाले होते. पोर्तुगालमध्ये डॉक्टरांना उज्ज्वल भविष्य होते.

‘एका घोड्यावर बसलेल्या गाढवाप्रमाणे तुझी स्थिती होईल’ अशा शब्दात मिळालेल्या इशाऱ्याला डॉक्टरांचे उत्तर होते. ‘परक्या भूमीत घोडा होण्यापेक्षा मायभूमीत गाढव बनणे मी पसंत करीन' आणि डॉक्टर गोव्यात परतले.

अर्थात त्यांच्या पोर्तुगीज मेडिकल पदवीला भारतात मान्यता नव्हती. त्यामुळे त्यांनी 1969 मध्ये अ‍ॅनाटोमी (शरीरशास्त्र) या विषयात मुंबई विद्यापीठाची पदवी मिळवली. 'गोवा मेडिकल कॉलेज'मध्ये ॲनाटोमी (शरीरशास्त्र) विषयाचे सहाय्यक प्राध्यापक म्हणून ते रुजू झाले.

1993 या वर्षी सेवानिवृत्त होईपर्यंत ते गोवा मेडिकल कॉलेजच्या सेवेत होते. त्यानंतरही बेळगाव येथील 'मराठा मंडळ डेंटल कॉलेज', कोल्हापूरचे 'डी. वाय पाटील मेडिकल कॉलेज' इथे त्यांनी ‘शरीरशास्त्र’ हा विषय शिकवला. गोव्यातील, शिरोडा येथील 'कामाक्षीदेवी होमिआपॅथिक मेडिकल कॉलेज'मध्ये ते आजही शिकवत असतात.

जेव्हा त्यांनी गोवा मेडिकल कॉलेजमधून सेवानिवृत्ती स्वीकारली तेव्हा पणजी येथे क्लिनिक सुरू करून ते जनरल मेडिकल प्रॅक्टीशनर बनले.

आज जनरल मेडिकल प्रॅक्टीसची संस्कृतीच लयास जात असताना डॉक्टर सरदेसाई यांनी 'शेवटचे शिलेदार' बनून आपली प्रॅक्टीस भाटले येथील आपल्या दवाखान्यात ठामपणे चालू ठेवली आहे.

आपल्या पेशंटकडून केवळ 100 रु. फी आकारणाऱ्या त्यांच्या हाताला गुण आहे असे त्यांचे पेशंट अगदी विश्‍वासाने सांगतात.

डॉक्टर समोरच्या माणसाशी कायम हास्यमुद्रेत बोलत असतात आणि त्यांच्या बोलण्यामधला ठामपणा आणि आत्मविश्‍वास हा समोरच्या माणसाला नक्कीच मोहित करतो. संशोधकाचा पिंड असलेला हा डॉक्टर आपल्या वयाच्या 87 व्या वर्षीही इतरांना प्रेरित करतो.

डॉक्टर सरदेसाई यांचे ‘इव्होल्युशन: मिथ्‌स ॲण्ड बिलिफ्‌स' हे पुस्तक काल पणजी येथे एका सोहळ्यात प्रकाशित झाले. मेडिकल कॉलेजमध्ये 'शरीरशास्त्र' हा विषय शिकवताना, डॉक्टरांचे जे संशोधन झाले त्यातून हे पुस्तक जन्माला आले आहे.

'आपला पिंडच संशोधकाचा आहे', हे डॉक्टर अभिमानाने सांगतात. ते म्हणतात, 'अभ्यासाच्या निमित्ताने मला जी संशोधनाची गोडी लागली ती त्यानंतरही कायम राहिली. हे पुस्तक म्हणजे अशाच एका संशोधनाच्या सारांशाचा पहिला भाग आहे. या पुस्तकाच्या दुसऱ्या भागात संशोधनाचा पुढील भाग येईल.

हे पुस्तक तीन भागांत आहे. पहिला भाग उत्क्रांती विषयी आहे, दुसरा भाग जागतिक उत्क्रांतीच्या तुलनेत गोमंतकीय वंशांच्या उत्क्रांतीचे स्थान सांगतो आणि तिसऱ्या भागात प्राचिन मानवी वंशाच्या वेशभूषा आणि चालिरीतीबद्दल  माहिती मिळते.

बऱ्याच ठिकाणी हे पुस्तक वैद्यकीय तांत्रिक भाषेचा उपयोग करत असले तरी विषय सोपा करून सांगण्याच्या त्यातील डॉक्टरांच्या हातोटीमुळे ते वाचकांना समजू शकते. या पुस्तकातील तिसरा भाग तर त्यातील वैविध्यपूर्ण माहितीमुळे वाचनीय बनलेला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com