Blog : प्रौढ महिलांसाठी सुगम संगीत स्पर्धा

परीक्षक असलेल्या प्रसिद्ध भावगीत गायिका रजनी ठाकूर व प्रतिभाशाली गायिका अर्चना शिंदे यांनीही या महिलांचे कौतुक केले.
Panaji Bhagini Mandal organized an accessible music competition for mature women in the Mandal hall
Panaji Bhagini Mandal organized an accessible music competition for mature women in the Mandal hallDainik Gomantak
Published on
Updated on

शतक वर्षाकडे घोडदौड करीत असलेली, पणजी भगिनी मंडळ ही महिलांची संस्था उपक्रमशील म्हणून सर्वश्रुत आहे. अर्थात ही उपक्रमशीलता, पणजीतील समविचारी भगिनींच्या (महिलांच्या) उत्साहामुळे आली आहे हे वेगळे सांगायची गरज नाही. यशोदिनी नगर्सेकर, वृंदा कंटक, मीना केणी, कांचन तारकर या त्यांच्या कर्तृत्ववान सदस्यांची उणिव आज भासत असली तरी या भगिनी मंडळाची धुरा विद्यमान सदस्यांनी उत्तमरित्या सांभाळली आहे.

महिलांच्या सुप्त कला गुणांना वाव देण्यासाठी जाणीवपूर्वक राबवले जाणारे भगिनी मंडळाचे उपक्रम तर स्तुत्य असतातच पण त्याचबरोबर शालेय तसेंच महाविद्यालयीन विद्यार्थिनी शिष्यवृत्ती, स्नेहमंदिरला दरवर्षी देणगी देणे असे सामाजिक कार्यही हे मंडळ करते.

Panaji Bhagini Mandal organized an accessible music competition for mature women in the Mandal hall
Blog : गुणी गायिका उषाताई आमोणकर

कमी उत्पन्न असलेल्या महिलांना त्यांचे घरगुती खाद्यपदार्थ, हस्तकला वस्तू विक्रीसाठी भगिनी मंडळाने मोक्याची जागा उपलब्ध करून दिली आहे  व चांगला खप झाल्यासच मंडळ त्यांच्याकडून अल्प भाडे आकारते.

पणजी भगिनी मंडळाने निर्मिलेला 'गुजरा हुवा जमाना' हा नृत्य, नाट्य व संगीताचा मिलाफ असलेला कार्यक्रम आणि पद्मश्री धुंडीराज नाट्यप्रयोग आजही रसिकांच्या स्मरणात आहेत. महिलांसाठी पाककला, रांगोळी अशा स्पर्धाही हे मंडळ घेते.

गेल्या शनिवारी पणजी भगिनी मंडळाने प्रौढ महिलांसाठी मंडळाच्या सभागृहात सुगम संगीत स्पर्धा आयोजित केली होती आणि तिला उस्फूर्त प्रतिसादही लाभला. चाळीस वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या 25 महिलांनी या स्पर्धेत भाग घेऊन मराठीतील भावगीते, अभंग, चित्रपट गीते, नाट्यगीते अशी विविध गीते उत्साहाने सादर केली. त्यात साठी उलटलेल्या तर काही सत्तरी ओलांडलेल्या महिलासुद्धा होत्या. स्पर्धेत त्यांचा दांडगा उत्साह दिसून येत होता.

Panaji Bhagini Mandal organized an accessible music competition for mature women in the Mandal hall
Art Festival London: इंडो-ब्रिटीश आंतरराष्ट्रीय कला महोत्सवात गोमंतकीय कलाकार

परीक्षक असलेल्या प्रसिद्ध भावगीत गायिका रजनी ठाकूर व प्रतिभाशाली गायिका अर्चना शिंदे यांनीही या महिलांचे कौतुक केले. अर्चना यांनी आग्रहास्तव एक भावपूर्ण रचना आर्ततेने गाऊन वातावरण भारून टाकले. उज्वला तारकर यांनी आपल्या निवेदनाने कार्यक्रमात रंग भरला. भगिनी मंडळाच्या अध्यक्षा स्वरूपाताई नास्नोडकर यांनी संस्थेच्या कार्याची दिशा व महिलांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्याचा उद्देश सांगितला व महिलांचा हुरूप वाढवला. त्यांच्या वक्तव्यातील सकारात्मकता महिलांना निश्चितच प्रेरणा देणारी होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com