Indo-British International Art Festival: लंडनच्या नेहरू सेंटर येथे 131 व्या स्पंदन इंडो ब्रिटीश आंतरराष्ट्रीय कला महोत्सवाचे, आयोजन करण्यात आले होते. गोव्यातील 13 कलाकारांना यात भाग घेण्याची संधी मिळाली.
एकूण 25 कलाकारांच्या 82 कलाकृतींचा प्रदर्शनात समावेश होता.
यातील 6 कलाकृतींची विक्री झाली. दररोज 100 हून अधिक लोकांनी कला दालनाला भेट दिली. महोत्सवाच्या उद्घाटन दिनी आपल्या भाषणात नेहरू सेंटरचे उप संचालक, श्री. संजय सिंह यांनी गोवा सरकारने आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी गोव्यातील कलाकारांना प्रायोजित केल्याबद्दल कौतुक केले.
लंडनमधील कार्यक्रमासाठी भारतीय उच्चायुक्तालयाने कला दालन प्रायोजित करणे, ही भारतीय कलाकारांसाठी एक उत्तम संधी होती. त्यांनी त्यांच्या इव्हेंट्स बुलेटिनमध्येदेखील हा कार्यक्रम प्रकाशित केला तसेच ईमेल आणि इतर माध्यमांद्वारे लोकांना आमंत्रित केले.
भारतीय कला आणि कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच त्यांना जागतिक ओळख मिळवून देण्यासाठी आयोजित केलेल्या या उपक्रमाचे, उच्चायुक्तालय आणि कला दालनातील अधिका-यांनी कौतुक केले.
यूके मधील भारतीय उच्चायुक्तालयाची सांस्कृतिक शाखा म्हणून नेहरू सेंटर काम करते. आता पुढील 100 महिन्यात 100 देशात अशा प्रकारचे प्रदर्शन आयोजित करण्याचे उद्दिष्ट स्पंदन बाळगते.
नेपाळ, जॉर्जिया, लंडन येथे झालेल्या कलामहोत्सवाच्या या आयोजनानंतर आता इटलीपासून सुरू होणार्या 27 युरोपियन युनियन देशांमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्याचा प्रकल्प त्यांनी घोषित केला आहे. हा प्रकल्प डिसेंबर 2024 पर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती जैन यांनी या प्रकल्पाविषयी बोलताना दिली.
इंडो ब्रिटिश आंतरराष्ट्रीय कला महोत्सवात सहभागी असलेले गोमंतकीय कलाकार
अंकिता नाईक
बाझील मोटा
गिरीश गुजर
दीपक च्यारी
अनुज शेट नार्वेकर
ज्योती गुजर
विनय प्रभू म्हांबरे
पिएटीझ
सीया परब
शैलेश वेंगुर्लेकर
महेश तेंडुलकर
सीया पंडित
रूडी डिसिल्वा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.