OLD GOAN HOUSES: गोवेकरांनी जपला गोव्यातील जुन्या घरांचा वारसा

गोव्यामध्ये फिरायला आले की इथली देखणी घरे (OLD GOAN HOUSES) आपल्याला भुरळ घालतात. याच घरांबद्दल आज आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत.
OLD GOAN HOUSES
OLD GOAN HOUSESDainik Gomantak
Published on
Updated on

गोवा (Goa) हा नेहमीच जगभरातील सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला आहे, तिची परंपरा, चालीरीती आणि संस्कृती (culture) नेहमीच पिढ्यानपिढ्या जोपासली गेली आहे. इथ भेट देणाऱ्या प्रत्येकाला नेहमीच गोव्याची परंपरा आणि संस्कृती जाणून घ्यायची उत्सुकता असते. बरेच बाहेरचे लोकसुद्धा या ठिकाणी स्थायिक झाले आहेत.गोव्यामध्ये फिरायला आले की इथली देखणी घरे (OLD GOAN HOUSES) आपल्याला भुरळ घालतात. याच घरांबद्दल आज आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत.

OLD GOAN HOUSES
Solar Souto Maior Art Gallery: गोव्याचा हरवलेला भूतकाळ इथे जतन केला जातो
OLD GOAN HOUSES
OLD GOAN HOUSESDAinik Gomantak

पोर्तुगीज वसाहतींचा दीर्घ काळाचा एक वारसा जो अजूनही गोव्यामध्ये बघायला मिळतो. आणि आजही त्यातील काही घरे दैनंदिन वापरात आहे. गोव्यामध्ये आल्यावर तुम्हाला पारंपारिक वाड्यांची भव्य वास्तू बघयला मिळेल, ज्या कमीत कमी 200 वर्षांपूर्वी बांधण्यात आल्या होत्या. गोवा कदाचित उपखंडातील एकमेव आपण ठिकाण असल्याचा दावा करू शकतो जिथे 1700 च्या दशकातील घरे अजूनही प्राचीन अवस्थेत आहेत. आणि आजही मूळ मालकांच्या पिढ्यानपिढ्या याठिकाणी राहतात.

OLD GOAN HOUSES
Goa: जुन्या बाटल्यांत जुनाच मद्यार्क
OLD GOAN HOUSES
OLD GOAN HOUSESDainik Gomantak

गोव्यामध्ये पोर्तुगीजांनी राज्य केलेल्या क्षेत्राच्या निवासी वास्तुकला बघून अधिकच भारावून जायला होत. ब्रिटिश आणि फ्रेंचांनी असेंब्ली आणि रेल्वे स्थानकांसारख्या प्रचंड इमारतींच्या आर्किटेक्चरवर आपली छाप सोडली जी त्या काळाच्या खुणा बनल्या आहेत. गोव्यातील पोर्तुगीजांनी निवासी घरे बांधली जी भारतीय उपखंडात क्वचितच आढळणारी शैली आहे. युरोपीय स्थापत्यशैली आणि भारतीय अभियंता या दोघांच्या कल्पकतेने ही भव्य महाल घरे आजही गोव्यात मोठ्या डौलात उभी आहेत. आजही ओल्ड गोवा, पणजी सारख्या ठिकाणी या स्वरूपाची घरे तुम्हाला बघायला मिळतील. काही लोक नवीन घरे बांधताना आवर्जून या स्थापत्यशैलीप्रमाणे बांधतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com