Painting Art Exhibition: 'चित्रपालवी' कलाप्रदर्शन आजपासून

चित्रांमध्ये निसर्ग चित्रे, मंदिरे, गोव्यातील पारंपरिक घरे, व्यक्तिचित्रणे इत्यादींचा समावेश आहे.
Painting Art Exhibition
Painting Art ExhibitionDainik Gomantak

Painting Art Exhibition: कुजिरा येथील डॉ. के .ब. हेडगेवार विद्यालय व कला आणि संस्कृती संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने हेडगेवार विद्यालयातील रेखाटलेल्या चित्रांचे ‘चित्रपालवी’ हे शालेय बालचित्रकारांच्या चित्रांचे प्रदर्शन, दि. 20, 21 व 22 एप्रिल 2023 या कालावधीत कला आणि संस्कृती संचालनालयाच्या पाटो येथील कलादालनात प्रदर्शित होत आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन आज, दिनांक 20 रोजी, संध्याकाळी 5 वाजता होईल.

Painting Art Exhibition
Painting Art ExhibitionDainik Gomantak

डॉ. के. ब. हेडगेवार हायस्कूल विभागातील इयत्ता पाचवी ते दहावी मधील 27 बाल चित्रकारांनी कॅनव्हासवर काढलेली 60चित्रे या प्रदर्शनात मांडण्यात येतील.

विद्यालयाचे चित्रकला शिक्षक प्रवीण नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली, विद्यालयात संध्याकाळी घेतल्या जाणाऱ्या खास वर्गामधून तसेच सुट्टीत आयोजित केलेल्या कार्यशाळेमधून मुलांनी ही चित्रे रंगवलेली आहेत.

या चित्रांमध्ये निसर्ग चित्रे, मंदिरे, गोव्यातील पारंपरिक घरे, व्यक्तिचित्रणे इत्यादींचा समावेश आहे. या प्रदर्शनात वैविध्यपूर्ण विषयांची मांडणी चित्राद्वारे केलेली आपल्याला पाहायला मिळेल.

Painting Art Exhibition
Serendipity Arts Festival: वेध सेरेंडिपिटीचे ः क्यूरेटर जाहीर

दिनांक 20 एप्रिल रोजी, ‘चित्रपालवी’ हे प्रदर्शन उद्घाटनानंतर सर्वांसाठी खुले असेल. दिनांक 21 व 22 रोजी हे प्रदर्शन सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत सर्व कलाप्रेमींसाठी कलादालनात खुले राहणार आहे.

Painting Art Exhibition
Painting Art ExhibitionDainik Gomantak

डॉ. के. ब. हेडगेवार हायस्कूलमध्ये चित्रकला शिक्षक असलेले प्रवीण नाईक हे स्वत: गोव्यातील प्रथितयश चित्रकार आहेत. अनेक प्रतिष्ठित चित्रकला प्रदर्शनात त्यांच्या चित्रांनी स्थान पटकावले आहे. अमूर्त शैलीत रंगवलेल्या त्यांच्या चित्रांमधून नेहमीच आशयसंपन्न अभिव्यक्ती साकार होताना दिसते. त्यांच्याकडून रंग-आकाराचे धडे घेताना त्यांच्या शालेय विद्यार्थ्यांना त्यांच्या अनुभवाचा फायदा नक्कीच मिळत असेल.

Painting Art Exhibition
Blog: सोयीने नव्हे तर आवडीने...

अशा शाळाही फार अपवादात्मक असतील ज्या आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांची चित्रे एखाद्या कला दालनात सार्वजनिकपणे प्रदर्शित करत असतील. विद्यार्थ्यांच्या कलाकौशल्याला मिळणारी अशी दाद त्यांनाही नक्कीच बळ देत असेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com