Serendipity Arts Festival: वेध सेरेंडिपिटीचे ः क्यूरेटर जाहीर

या सेरेंडिपिटी महोत्सवात दृश्‍य कलांसाठी वीरांगनाकुमारी सोळंकी आणि विद्या शिवदास हे क्युरेटर आहेत
Serendipity Arts Festival
Serendipity Arts FestivalDainik Gomantak
Published on
Updated on

Serendipity Arts Festival येत्या डिसेंबरमध्ये पणजी शहरात होणाऱ्या सेरेंडिपीटी कला महोत्सवाच्या ६ व्या आवृत्तीच्या क्युरेटर्सची नावे जाहीर झाली आहेत. दृश्‍यकला, पाककला, सादरीकरण, क्राफ्ट इत्यादीचा समावेश असलेल्या हा महोत्सव त्या क्षेत्रामधल्या तज्ज्ञ आणि नामांकित क्युरेटरमार्फत संकल्पित होत असतो.

महोत्सवासाठी, पारंपारिक आणि समकालीन शैलींचे मिश्रण असलेल्या हस्तकलांचा शोध संदीप कुमार संगारु आणि अंजना सोमाणी हे क्राफ्ट विभागासाठी घेणार आहेत.

गेल्या वर्षीच्या महोत्सवात नाट्य- विभागाचे संयोजन करणारे क्वासार ठाकोर पदमसी हे यावर्षी पुन्हा याच विभागाचे नेतृत्व करत आहेत. गेल्या वर्षी महोत्सवात सादर झालेली नाटके अप्रतिम होती. यंदाही पदमसी उत्कृष्ट नाटके महोत्सवासाठी निवडतील अशी अपेक्षा आहेच.

या महोत्सवाला चार चाँद लागतात त्यात सादर होणाऱ्या पाककृतींच्या प्रात्यक्षिकांमुळे. संस्कृतीला रसवंत बनवणाऱ्या पाककृतींचे सादरीकरण या सेरेंडिपिटीचा महत्त्वाचा भाग असतो.

संस्कृती आणि लोक या दोन्हीना जोडणाऱ्या ‘अन्न’ या महत्त्वाच्या घटकाला महोत्सवाच्या या आवृत्तीत शेफ थॉमस झकारियास आणि लोकोव्हर टीम पाककला विभागाद्वारे विशेष रूपात सादर करतील.

विक्रम घोष यांनी रिकी केज सोबत गेल्या आवृत्तीत संगीत विभागाचे नियोजन केले होते. यंदाही ते संगीताच्या विविध शैली आणि प्रकार याद्वारे विविध सांस्कृतिक-सामाजिक संकल्पनांना संबोधित करणाऱ्या मैफली महोत्सवात सादर करणार आहेत.

गीता चंद्रन आणि मयुरी उपाध्या शास्त्रीय, प्रायोगिक आणि समकालीन नृत्य सादरीकरणे या महोत्सवासाठी निवडतील. महोत्सवात नृत्य कार्यशाळांचे आयोजन देखील त्या करणार आहेत.

Serendipity Arts Festival
Goa G20 Meeting: स्वित्झर्लंडचे 7, अमेरिकेचे 2 प्रतिनिधी G20 बैठकीसाठी गोव्यात दाखल

या सेरेंडिपिटी महोत्सवात दृश्‍य कलांसाठी वीरांगनाकुमारी सोळंकी आणि विद्या शिवदास हे क्युरेटर आहेत.

त्याशिवाय या आवृत्तीसाठी झुबिन बालापोरिया (संगीत), विक्रम अय्यंगार (नृत्य), एलिझाबेथ यॉर्क आणि अनुषा मूर्ती (पाककला) हे विशेष क्युरेटर असतील.

आयोजकांचा दावा आहे, सेरेंडिपिटी महोत्सवाच्या, 9 दिवस साजरा होणाऱ्या या 6 व्या आवृत्तीत, नावीन्य आणि प्रयोगशीलता यांच्या अंगाने शोध घेऊन, वेगवेगळ्या कलांमधील उत्कृष्ट ते लोकांसमोर आणण्याचा त्यांचा प्रयत्न राहील.

Serendipity Arts Festival
Trekking: ‘ते तेवीस तास’ : विषण्ण करणारा थरार

कला आणि संस्कृती हा लोकांच्या दैनंदिन विमर्षाचा भाग बनावा आणि लोकांचा कलेमधला सहभाग वाढावा हा महोत्सवाचा उद्देश आहे.

या महोत्सवाबद्दल बोलताना सेरेंडिपिटी कला महोत्सवाचे संस्थापक सुनील कांत मुंजाळ म्हणाले, ‘दक्षिण आशियातील सांस्कृतिक समृद्धीला अनेक शतकांपासून, तिच्यावर होत असलेल्या विभिन्न प्रभावामुळे एक अतुलनीय चेहरा मिळत गेला आहे.

अनेक प्रवाह त्यात मिसळत गेले असले तरी तिच्या मूळ मूल्यांना आणि संस्कृतीला अजूनही स्वतःचे वैशिष्ट्य आहे. दक्षिण आशियातील ह्या समृध्द संस्कृतीमधील वैविध्य टिपण्यासाठी आणि त्याना सर्वोत्तम जागतिक व्यासपीठ मिळण्यासाठी उत्कृष्ट क्युरेटर आणि सहयोगींना आम्ही एकत्रित आणले आहे.

गोव्यात डिसेंबरमध्ये होणाऱ्या सेरेंडिपिटी कला महोत्सवात त्यांच्या शोधांमधून आंतर विषयांची विविधता असलेले कला प्रदर्शन सादर होईल.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com