'मधुबनी' आयोजित केले चित्रशैलीची कार्यशाळा

आर्ट क्लबतर्फे चित्रकला व हस्तकला या विषयावर शिबिर आयोजित केले...
Madhubani organized painting workshop
Madhubani organized painting workshopDainik Gomantak
Published on
Updated on

म्हापसा: आपण स्वतः निर्माण केलेली चित्राकृती चित्र प्रदर्शनांमध्ये प्रदर्शित झालेली पाहताना मुलांच्या चेहऱ्यावर एक निखळ आनंद निर्माण करतो. प्रदर्शन पाहायला आलेले पालक, शिक्षक व मित्रवर्ग यांच्याशी आपल्या चित्रकृतीबद्दल भरभरून बोलताना मुले थकत नाहीत. सर्वांकडून ऐकायला मिळणारे कौतुकाचे शब्द, त्यांनी केलेल्या कामाचे चीज करून जातात.

म्हापसा येथील सारस्वत विद्यालयात, दरवर्षी वार्षिक परीक्षा संपल्यानंतर मुलांसाठी शाळेच्या आर्ट क्लबतर्फे चित्रकला व हस्तकला या विषयावर शिबिर आयोजित केले जाते. यंदाच्या वर्षी ‘मधुबनी कला’ या चित्रकलाशैलींचे प्रशिक्षण मुलांना दहा दिवसांच्या शिबिरात देण्यात आले. आपल्या भारत देशात प्रत्येक राज्याची विशिष्ट अशी चित्रकला शैली आहे. मधुबनी चित्रकला शैली ‘मिथिला’ या नावानेही ओळखली जाते.

Madhubani organized painting workshop
ग्रंथ आपले सोबती...

तिचे मूळ बिहार राज्यांमधील मिथिला या गावी सापडते. शिबिरार्थींना या अतिशय सुरेख व आकर्षक पद्धतींच्या कला निर्मितीची माहिती मिळावी व त्यांनी या शैलीतून कलाकृती साकारावी या या उद्देशाने हे ‘मधुबनी आर्ट’ शिबिर शाळेने आयोजित केले होते. मुलांनी त्यात अत्यंत उत्साहाने आणि आवडीने भाग घेतला आणि मनमोहक चित्रकृतींची निर्मिती केली. फक्त कागदच नव्हे तर कॅनवास, कपडा, लाकूड, मातीची भांडी, बांबूचे सूप, काचेच्या बाटल्या लाकडाचे चमचे इत्यादी वस्तूंवर मुलांनी चित्रे रंगवून सुंदर आकर्षक सजावटीच्या वस्तू तयार केल्या.

Madhubani organized painting workshop
'आंबा पिकतो रस गळतो, फळांचा राजा आता पुन्हा मोहरतो...'

एकत्रितपणे या शिबिरात मधुबनी शिकताना या दहा दिवसांच्या शिबिरात मुले प्रशिक्षकांकडून तसेच परस्परांकडूनही शिकत होती. विशेष उल्लेख करण्यासारखी गोष्ट म्हणजे मुलांचा उत्साह पाहून या शाळेतील काही शिक्षकांनी देखील मधुबनी कला शिकण्याची उत्सुकता दाखवली व कार्यशाळेत भाग घेऊन स्वतःची चित्रे निर्माण केली. या सगळ्यांची फलश्रुती म्हणजे शाळेच्या संकुआतच एका छान चित्रप्रदर्शनाचे आयोजन होऊन मुलांचे चित्रकौशल्य व प्रतिभा सर्वांसमोर आली. या कार्शाळेत भाग घेतलेल्या काही विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे एक मोठे चित्र रंगवून शाळेला भेट म्हणून दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com