हिंदू पंचांगाप्रमाणे चांद्रमासाचे 355 दिवसाचे वर्ष असते. परंतु भारतीय सौरवर्ष 365 दिवसांचे असते. दर महिन्याला सूर्य एका राशीतून संक्रमण करत असतो. चैत्रापासून आश्वीनपर्यतच्या सात मासापैकीच एखादा अधिक मास असतो. तेराव्या महिन्यात सूर्याचे संक्रमण नसते म्हणून त्याला मलमास संबोधतात - तोच अधिकमास.
ह्या महिन्यात श्रीकृष्णाची भक्ती, पूजा-अर्चा केली जाते. ‘कृष्णवेणि सांस्कृतिक वृंद’ नेहमीच अशा कार्यक्रमांना उत्तेजन देत असते व महत्व पटवून देत असते. संस्कारांची शिदोरी वाटण्याचे कार्य ते मागील दहा वर्ष करीत आहेत.
सद्गगुरूकृपेवाचून मोक्ष नाही हा पुरातन सिद्धांत आहे. हाच वसा घेउन ‘कृष्णवेणि सांस्कृतिक वृंद’ आपली सेवा गाण्यातून सादर करतात. इतर कार्यक्रमांसोबत ‘कृष्णवेणि सांस्कृतिक वृंद’, रेखा पाटील ह्यांच्या मार्गदर्शनाखाली कन्नड व मराठी भावगीते व भक्तिगीत शिकून गोड व रसाळ पद्धतीने सुमधुर आवाजात सादर करतात.
आपल्या संगीतातून भक्तिसेवा घडावी हा त्यात उदात्त हेतू असतो. अधिक मासाचे औचित्य साधून बालाजी मंदीर कुकळ्ळीया येथे हा कार्यक्रम सादर केला गेला. तबल्यावर तन्वेष वळवईकर ह्याची साथ होती त टाळ साथ कुमार कुलकर्णी ह्यानी केली.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.