जेसुइट्स आशियातील सर्वांत मोठी पांथिक व्यवस्था

द इंडियाची राजधानी म्हणून औपचारिक घोषणा होणे, गोव्याला फंचलमधील बिशपच्या अधिकारातून वेगळे करणे आणि पोप क्लेमेंट सप्तम यांनी गोव्याला आपल्या अखत्यारित आणणे हा प्रवास दिसतो तितका साधा, सरळ झाला नाही.
Jesuits
Jesuits Dainik Gomantak

वाल्मिकी फालेरो

प्रथम नियुक्त झालेले बिशप होते फ्रान्सिस्को डी मेलो. पण, गोव्यासाठी बाहेर पडण्यापूर्वीच त्यांचे लिस्बनमध्ये निधन झाले. त्यामुळे, निवासी याजक असलेले गॅस्पर जॉर्ज डे लिओ परेरा डी ऑर्नेलास पहिले बिशप बनले.

वा ही एस्तादो पोर्तुगीज द इंडियाची राजधानी म्हणून औपचारिक घोषणा होणे, गोव्याला फंचलमधील बिशपच्या अधिकारातून वेगळे करणे आणि पोप क्लेमेंट सप्तम यांनी गोव्याला आपल्या अखत्यारित आणणे हा प्रवास दिसतो तितका साधा, सरळ झाला नाही. या ऑर्डरवर स्वाक्षरी करण्यापूर्वीच पोपचा मृत्यू झाला. त्यावर स्वाक्षरी त्याच्या उत्तराधिकाऱ्यांनी पूर्वलक्षी प्रभावाने केली होती. पोप पॉल तृतीय यांच्याद्वारे 3 नोव्हेंबर 1534 रोजी तयार केलेले गोवा आशियातील पहिले बिशपच्या अखत्यारित असलेले स्थान बनले.

प्रथम नियुक्त झालेले बिशप होते फ्रान्सिस्को डी मेलो. पण, गोव्यासाठी बाहेर पडण्यापूर्वीच त्यांचे लिस्बनमध्ये निधन झाले. त्यामुळे, निवासी याजक असलेले गॅस्पर जॉर्ज डे लिओ परेरा डी ऑर्नेलास पहिले बिशप बनले. मग औपचारिक चर्चची रचना आकार घेऊ लागली आणि पंथगुरू नसलेले जनरल मिगेल वाझ कुतिन्हो (1534-47) पहिले पाद्री किंवा पंथोपदेशक झाले.

11 सप्टेंबर 1538 रोजी व्हाइसरॉय गार्सिया डी नोरोन्हा यांच्या ताफ्यासोबत आलेले फ्रान्सिस्कन फ्रियर जुआंव द अल्बुकर्क हे पहिले नेमस्त बिशप होते. . 4 फेब्रुवारी 1557 रोजी पोप पॉल-चौथे यांनी पूर्व आफ्रिकेपासून जपानपर्यंतच्या अधिकारक्षेत्रासह गोव्याला आर्चबिशपच्या जबाबदारीत असलेली एक महानगरी बनवले.

व्हाईसरॉय फ्रान्सिस्को कुतिन्हो यांनी 4 नोव्हेंबर 1562 रोजी सेंट कॅथरीनच्या कॅथेड्रलची पुनर्बांधणी करण्याचे आदेश दिले होते. (पॅड्रोडो-प्रोपगंडा फिडे भांडणाच्या जखमेवर मलम म्हणून पोप लिओ-तेरावा यांनी 1886साली गोव्याला अखत्यारित आणले.)

Jesuits
Indian Freedom Struggle : भारतीय स्वातंत्र्यलढ्यात गोव्याचे योगदान अभूतपूर्व

सांता फे हे गोव्यातील पहिले ख्रिस्तपंथीय विद्यालय, 1541 साली एका पाडलेल्या मशिदीवर बांधले गेले. 1542 साली जेव्हा फ्रान्सिस झेवियर आग्नेय भारतात होते तेव्हा त्यांना ते ताब्यात घेण्यास सांगण्यात आले. त्यांनी नकार दिला तेव्हा या विद्यालयाचा ताबा माईसर पाउलो कॅमर्त यांनी घेतला. सांता फे चे नाव बदलून कॉलेजिओ द सांता पाउलो असे करण्यात आले.

23 डिसेंबर 1549 रोजी लोयोलाच्या इग्नेशियसने तयार केलेल्या मोझांबिकपासून मोलुक्कास (किंवा केप ऑफ गुड होप ते जपानपर्यंत) भारताच्या जेसुइट प्रांताचे हे विद्यालय एक मुख्य केंद्र बनले.

जेसुइट्स आशियातील सर्वांत मोठी पांथिक व्यवस्था बनली होती. पॅद्राद अंतर्गत करण्यात येणारा अर्धा शाही खर्च त्यांच्यावरच केला जात असे. त्यांच्याकडे गोव्यात इतर सर्व पांथिकव्यवस्थांपेक्षा जास्त इमारती होत्या. स्विस जेसुइट इतिहासकार जोसेफ विकी यांनी 1541-1758 दरम्यान भारतातील जेसुइट्सची 18 खंडांची ‘डॉक्युमेंटा इंडिका’ संकलित केली. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे दरवर्षी 10 ते 15 जेसुइट गोव्यात यायचे.

1554साली व्हाइसरॉय पेद्रो मस्करेन्हास (1554-55) यांनी गोव्याचे विभाजन केले. त्यानंतर सासष्टी, तिसवाडी आणि बार्देश हे जुन्या काबिजादीतील तीन तालुके ख्रिस्तीकरणासाठी निवडण्यात आले. योगायोगाने हे तेच क्षेत्र जिथे पहिले इंडो-आर्य गोव्यात स्थायिक झाले होते.

Jesuits
पूर्वी वर्ण कशावरून ठरवलं जायचं? ग्रंथांमध्ये काय संदर्भ आहेत वाचा

तिसवाडीचा पश्चिम भाग ज्यामध्ये 15 वायव्य गावांचा समावेश आहे, ते प्रथम आलेल्या डॉमिनिकन लोकांना देण्यात आले. बार्देश फ्रॅन्सिस्कन्सना देण्यात आले. सासष्टी, तिसवाडीची 15 आग्नेय गावे आणि शोरांव, दिवाड आणि सांत इस्तेव ही बेटे - सर्वांत मोठे क्षेत्र - जेसुइट्सना देण्यात आले.

आधीपासून सासष्टीची व्याप्ती खूपच मोठी होती. हे क्षेत्र सगळेच्या सगळे व्यापून टाकेल इतके मनुष्यबळ सोसायटी ऑफ जीझसकडे त्यावेळी नव्हते. त्यांनी त्यांचे मर्यादित मनुष्यबळ जुने गोवे मुख्यालयाच्या जवळच्या भागात केंद्रित केले.

1510पासून विजापूरचे मुस्लीम व पोर्तुगीज यांच्यादरम्यान सासष्टी व बार्देश भागांत अनेक लढाया झाल्या.

Jesuits
Goa Beach: गोव्याच्या सुंदर किनाऱ्यांना सुशोभित ठेवणे आपल्या सर्वांचे कर्तव्य

या लढायांदरम्यान कॅप्टन रुइ डिमेलोच्या नेतृत्वाखाली पोर्तुगीजांचा विजय झाला. आदिलशाहीशी झुंज देत पोर्तुगिजांनी वेर्णापर्यंत त्यांना खदेडले. जवळजवळ किल्ल्यासारखे अभेद्य असलेल्या महालसा नारायणीच्या मंदिरापर्यंत पोर्तुगीज पोहोचले. 1519साली वेर्णाच्या टेकडीवर म्हार्दोळमधील ठाणेदाराचे कार्यालय होते.

येथेच दि. 12 डिसेंबर 1519 रोजी पोर्तुगीज सैन्य, पादरी, डोमिनिकन याजक या सर्वांनी सासष्टीच्या भूमीवर पहिला ‘मास’ साजरा केला. या घटनेच्या स्मरणार्थ घटनास्थळी एक क्रॉस लावण्यात आला. पुन्हा सैन्याची जमवाजमव करून विजापुरींनी पोर्तुगीजांना झुआरीच्या उत्तरेकडे जाण्यास भाग पाडले.

1521 साली सासष्टी तालुका पुन्हा पोर्तुगिजांच्या ताब्यात गेला. चौकीचा कॅप्टन राशोल येथे राहिला आणि तेथे तालुक्याचे मुख्यालय बनवले. आज अस्तित्वात असलेल्या चर्चच्या उजवीकडे असलेल्या एका जागेवर डोमिनिकन सैन्याच्या अधिकाऱ्याने सासष्टीतील पहिले ‘एर्मिदा द कॅसल’ बांधले.

शहरात स्थायिक झालेल्या सैन्याला आणि काही व्यापाऱ्यांना ते सेवा देत असे. चॅपल पाच वर्षे कार्यरत होते. 1524साली म्हार्दोळ टेकडीवर पुन्हा एक मोठा क्रॉस उभारण्यात आला.

दरम्यान, 1540 सालापासून विजापूर मुस्लिमांच्या ताब्यात असताना स्थानिक लोकांचा छळ सुरू झाला होता. राजा जुआंव-तृतीय यांनी तिसवाडीतील सर्व मंदिरे नष्ट करण्याचा आणि त्यांच्या जमिनी जप्त करण्याचा आदेश दिला.

30 जून 1541 रोजी या आदेशाची अंमलबजावणी करण्यात आली. फ्रान्सिस्कन फ्रायर, मेस्ट्रे डिओगो डी बोर्बा आणि पेरो फर्नांडिस यांच्या सहाय्याने जनरल मिंगेल वाझ कुतिन्हो यांनी यात सक्रिय सहभाग घेतला. अनेकदा रहिवाशांना त्यांची मंदिरे स्वत:च्या हातांनी पाडण्यास भाग पाडले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com