'Traditional Goan Foodies': ईस्टर एग्ज

ख्रिश्चन बांधवांसाठी, ईस्टर हा महत्वाचा सण, या सणात ‘ईस्टर एग’ला महत्वाचे स्थान असते
Goan Foodies
Goan FoodiesDainik Gomantak
Published on
Updated on

'Traditional Goan Foodies' ख्रिश्चन बांधवांसाठी, ईस्टर हा महत्वाचा सण आहे. उत्साहात साजरा होणाऱ्या या सणात ‘ईस्टर एग’ला महत्वाचे स्थान असते. त्या संबंधित अनेक प्रतिकात्मक धारणा आहेत.

एका धारणेनुसार, अंडे येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचे प्रतिनिधित्व करते कारण त्यातून नवीन जीवनाचा उद्‍भव होत असतो तर दुसऱ्या धारणेनुसार, अंड्याचे कवच रिकाम्या थडग्याचे प्रतीक आहे ज्यातून येशू ख्रिस्ताने नवीन जीवनाचे संकेत दिले.

गोव्यातील ‘ईस्टर’ साजरा करताना, अंडी रंगवणे ही एक परंपरा आहे. कुटुंबातली मंडळी एकत्र येऊन विविध रंगांत आणि नक्षीनी अंडी रंगवून सुंदर कलाकृती तयार करतात.

ही रंगवलेली अंडी मित्र-मंडळी किंवा नातेवाईकांमध्ये वाटली जातात. एकमेकांप्रती असलेल्या प्रेमाचे आणि आदराचे ते चिन्ह असते.

Goan Foodies
Manohar International Airport: ‘मोपा’चे नाव अखेर बदलले, विमानतळ गेटबाहेर झळकले नवे फलक

गेल्या रविवारी साजरा झालेल्या ‘ईस्टर’चे पडसाद सोशल मीडियावर अजूनही उमटताना दिसतात. ईस्टरच्या दिवशी टेबलवर सजलेल्या खाद्य-पदार्थांचे फोटो फेसबुक, इन्स्टाग्रामवर टाकण्याची अहमहमिका त्याच्या आनंदाचा भाग बनलेली आहे.

वडे, प्रॉन रिशोईस, पुलाव, काफ्रिएल, विंन्डालू, प्रॉन पाय, सान्ना-सोर्पोतेल या बरोबरच अंड्याच्या आकारात तयार केलेले अनेक पदार्थ सोशल मेडियावर झळकताना दिसत आहेत.

केवळ गोव्यातील नव्हे तर जगभर पसरलेले गोमंतकीय ख्रिश्चन बांधव पारंपारिक गोमंतकीय पद्धतीने तयार केलेरी ही ‘अंडी’ सोशल मीडियावर टाकून, आपले गोमंतकीय दोर, दूरवर असलेल्या आपल्या ठिकाणावरुन बळकट करण्याचा प्रयत्न करतात.

Goan Foodies
Valpoi News: कोविडनंतर वाळपई आठवडा बाजाराला मिळतंय स्थैर्य

फेसबुकवर असलेल्या ‘ट्रेडिशनल गोवन फुडीज’ या ग्रुपवर देशोदेशीचे गोमंतकीय एकत्र जुळलेले आहेत. आपण बनवलेले विशेष खाद्यपदार्थ (अनेकदा रेसीपीसकट) ते या ग्रुपवर टाकत असतात.

ईस्टर सणानिमित्त ख्रिश्चन बांधवांच्या पोस्टना या ग्रुपवर बहर आलेला आहे. ‘ईस्टर एग्ज’ गेले दोन दिवस या ग्रुपवर उठून दिसत आहेत. जिभेवरच्या रसनेला आवाहन करण्याबरोबरच, ही अंडी एखाद्या कलाकृतीप्रमाणे, नजरेलाही आनंद देत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com