पर्यावरण जतनासाठी गो स्लो

गोव्यात वास्तव्यास असणाऱ्या रीमा गुप्ता यांनी साधारण दहा वर्षांपूर्वी ‘स्लो फार्म’ची स्थापना केली. (slow- sustainable, local, organic and wholesome)
Environment is Important:
Environment is Important:Dainik Gomantak
Published on
Updated on

हिना शहा

Environment is Important: सेंद्रिय अन्नपदार्थ, सौंदर्य वस्तू आणि हस्तकला याची पर्यावरण स्नेही पद्धतीने केलेली ही निर्मिती आहे. आपली जैवविविधता सांभाळणे आणि आपल्या सहज निवडींमुळे पर्यावरणावर होणारा विपरीत परिणाम कमी करणे हा ‘स्लो’चा मूळ उद्देश आहे. पुढील पिढीसाठी जग उत्कृष्ट बनवण्यासाठी खडतर परिश्रम आवश्यक आहे. रीमा म्हणते, ‘स्लो’ पद्धतीने जगणे म्हणजेच पर्यावरणाच्या मर्यादेत आपल्या गरजा आखणे होय.’

Environment is Important:
गेल्‍या 5 वर्षांत विविध कार्यक्रमांवर सरकारकडून 500 कोटींचा चुराडा

बाल्कनी आणि होम गार्डनिंग या संबंधाने रिमा लोकांना प्रशिक्षित प्रशिक्षित करत असते. अतिशय सोप्या आणि साध्या पद्धतीतून बिया कशा अंकुराव्यात, माती कशी मिसळावी, औषधी वनस्पतींची लागवड कशी करावी, भाज्या कशा लावाव्यात, मशागत कशी करावी यासंबंधी ती माहिती देते.

घरात एखादी जरी खिडकी रिकामी असली तरी तिथे झाडांची योजना करून त्यांच्या जोपासनेसंबंधीच्या साऱ्या गोष्टी आपल्या नित्य सवयीच्या कशा बनतील याच्या युक्त्या ती सांगते. जर जागा मोठी असली तर मोठ्या गार्डनसाठी आणि सेंद्रिय पद्धतीने लागवड करण्यासाठी स्थानिक साहित्याचा वापर करून ती योजना आखू शकते. स्वतःच्या जागेत पर्माकल्चर आणि पुनरुत्पादन शेती तंत्राचा उपयोग करून तिने स्व-शाश्वत पर्यावरण व्यवस्थेचे निर्माण केले आहे.

उत्तराखंड आणि कर्नाटक राज्यात ‘स्लो’ बागा आहेत. रीमाच्या कुटुंबीयांनी गेल्या १७ वर्षाच्या काळात, तिथे वेगवेगळ्या झाडांच्या शेकडो प्रजातींची लागवड केली आहे.

काजूसारखे हंगामी फळ, कोकमसारखे औषधी उत्पादन, जायफळ आणि तमालपत्र हे मसाले तसेच इतर स्थानिक वनस्पतींचा समावेश त्यात आहे.

आपल्या शाश्वत शेतीपद्धती द्वारे तिथे भाज्या व फळे यांचे आंतरपीक घेतले जाते. त्याशिवाय त्यांच्या जागेत मधुमक्षिका पालन देखील नैतिकपूर्ण पद्धतीने होते.

पोळ्यात तयार झालेल्या मधापैकी केवळ 30 टक्के मध जमा केला जातो- तो देखील पावसाळा वगळता इतर मोसमात. याचे कारण हे आहे की मधमाशांनी जमा केलेला मध हा त्यांच्या पावसाळ्यातील अन्नासाठी केलेली बेगमी असते आणि पावसाळ्यात मधमाश्या फार दूरवर उडत जाऊन फळा-फुलांमधून मध गोळा करू शकत नाहीत.

Environment is Important:
Tigers in Goa Forests: गोव्‍याच्‍या जंगलांत वाघांचे अस्‍तित्‍व; विश्‍‍वजीत राणे

स्लो फार्म आपल्या उत्पादनासाठी वापरण्यात येणारे सेंद्रिय घटक त्यांच्या स्वतःच्या जागेतच तयार करते. यामध्ये मेण, खोबरेल तेल, मसाले, औषधी वनस्पती, मध, मिरच्या, फुले यांचा समावेश असतो.

पर्यावरणास अनुकूल असलेली सामग्री वापरून स्थानिक कारागिरांसोबत ‘स्लो’ काम करते. घरात किंवा कपाटात शोभतील अशा सुंदर वस्तूंची निर्मिती ‘स्लो’मार्फत होते देशाच्या वेगवेगळ्या भागांतून त्यासाठी कच्चा माल मागवला जातो. उदाहरणार्थ, बांबू उत्तरपूर्व प्रदेशांमधून येतो तर बदाम काश्मीरमधून येतो.

‘स्लो’चे पॅकेजिंग देखील पर्यावरण स्नेही असेच असते. काचेचा वापर फार कमी केला जातो आणि रिसायकल केलेल्या कागदाची वेष्ट्ने बनतात. बॉक्स पुन्हा वापरण्यास कसे उपयोगी ठरतील याचा विचारही त्यात होतो. ‘स्लो’ची आकर्षक उत्पादने त्यांच्या इन्स्टाग्रामवर आपण पाहू शकता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com