Goa:'आदिल शाह' चा महाल बनला गोव्याच्या इतिहासाचा साक्षीदार

आदिल शाह पॅलेस, पणजीमधील सर्वात जुनी इमारत म्हणून ओळखली जाते.
Adil Shah Palace
Adil Shah Palace Dainik Gomantak
Published on
Updated on

आदिल शाह पॅलेस (Adil Shah Palace), पणजीममधील सर्वात जुनी इमारत (oldest surviving building) म्हणून ओळखली जाते, पणजीपासून 3.6 किमी अंतरावर मांडवी (Mandovi waterfront) नदी जवळ आहे. हा पॅलेस गोव्यातील सर्वात महत्वाच्या ऐतिहासिक ठिकाणांपैकी एक आहे. हा पॅलेस केवळ आर्किटेक्चर आणि शैलीसाठीच नाही, तर 1500 च्या इतिहासाचा साक्षीदार म्हणून पण ओळखला जातो.

Adil Shah Palace
'Nail Art' स्टुडिओ म्हणजे नेमकं काय

हा राजवाडा मुळात आदिल शाही घराण्याचा संस्थापक आणि विजापूरचा शासक युसूफ आदिल शाह याने बांधला होता. युसुफ आदिल शाहला पोर्तुगीजांनी हिडाल्काओ म्हणून संबोधले, त्याने सुमारे दोन शतके विजापूरवर राज्य केले. आर्किटेक्चर पोर्तुगीज वसाहतीचे आहे असे दिसते, परंतु 1500 मध्ये हा आदिल शाहचा उन्हाळी राजवाडा आणि किल्ला होता. या ठिकाणी 55 तोफ आणि खार्या पाण्याच्या खंदकासह हा त्याच्या बचावाचा एक महत्त्वाचा भाग होता. 1510 मध्ये अल्फोन्सो डी अल्बुकर्केसच्या सैन्याने आदिल शाहचा पराभव केला आणि नंतर, हा महाल पोर्तुगीज व्हाईसरॉयसाठी विश्रांतीचा ठिकाण म्हणून वापरला गेला.

Adil Shah Palace
Adil Shah Palace Dainik Gomantak

वर्ष 1759 मध्ये पोर्तुगीजांनी त्याला इदलकांव असे नाव दिले आणि व्हाईसरॉयचे अधिकृत निवासस्थान बनले, तेव्हा जुने गोवा ही राजधानी होती. आदिल शाहने बांधलेला सुंदर राजवाडयाचे नूतनीकरण केले गेले. त्यामध्ये बरेच बदल झाले आहेत, 1918 पर्यंत हे ठिकाण व्हाईसरॉयल निवासस्थान होते या नंतर व्हाईसरॉय डोना पॉला जवळ नवीन निवासस्थानामध्ये राहायला गेले. पुनर्बांधणीपूर्वी हा महाल पर्यटकांचं प्रमुख आकर्षण होता, ज्याच्या सौंदर्याने अनेक पर्यटकांचे लक्ष वेधून घेतले. या मोठ्या बदलामुळे एका महत्त्वाच्या ऐतिहासिक वास्तूचे नुकसान झाले. प्रवेशद्वार हा 1500 च्या सुंदर राजवाड्याचा एकमेव भाग शिल्लक आहे.

Adil Shah Palace
Goa Tourism: पर्यटन हवे, स्वैराचार नव्हे!
the Gate entrance
the Gate entranceDainik Gomantak

या महालाचा शिल्लक राहिलेला एकमेव भाग , हा गेटची रचना त्या काळातील शैली आणि आर्किटेक्चरचा आपल्याला अंदाज देते. या नंतर आपले लक्ष सहा पायऱ्या वर उंच उभ्या असलेल्या गेटकडे जातात. हे गेट बेसाल्टचे बनलेले आहे. गेट मोल्डिंग्ज आणि खांबावर आडव्या लिंटेलने सुशोभित केलेले आहे. खांबांवर ठेवलेली कमान मूळ राजवाड्याचा भाग नाही. हे वास्तुकला आणि इतिहास प्रेमींनी या ठिकाणी आवर्जून भेट द्या. फोटो शूटसाठी हे एक आदर्श ठिकाण आहे. शाही पॅलेसचा एकमेव भाग शिल्लक राहिल्याने प्रवेशद्वार पाहताना ऐतिहासिक स्मारकांचे महत्त्व वाढते. ज्यांना इतिहासाच्या खुणा शोधायला आवडतात त्यांच्यासाठी हे एक आदर्श ठिकाण आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com