Panjim Bus Accident Case: सत्य? शांती? सेवा? गोवा पोलिसांच्या सदोष कार्यपद्धतीचा आणखी एक प्रातिनिधिक पुरावा!

Panjim Bus Accident Case: गोवा कालवी नदीवरील बस दुर्घटनेतील चालक राजेश नाईक याला पुराव्यांअभावी निर्दोष मुक्त करण्यात आले.
Panjim Bus Accident Case | Goa Police
Panjim Bus Accident Case | Goa PoliceDainik Gomantak
Published on
Updated on

Panjim Bus Accident Case: कालवी नदीवरील कारोणा धक्क्यावर 2012 साली झालेल्या बस दुर्घटनेतील चालक राजेश नाईक याला पुराव्यांअभावी निर्दोष मुक्त करण्यात आले. हा गोवा पोलिसांच्या सदोष कार्यपद्धतीचा आणखी एक प्रातिनिधिक पुरावा आहे. आपल्याच ब्रीदवाक्याच्या नेमके उलट काम करणाऱ्या पोलीस दलात आमूलाग्र बदल होणे आवश्यक आहे.

कालवी नदीवरील कारोणा धक्क्यावर 18 फेब्रुवारी 2012 रोजी दुपारी 12.20 च्या दरम्यान बस नदीत बुडण्याची दुर्घटना घडली होती. चार विद्यार्थिनींसह इतर दोन प्रवाशांचा मृत्यू झाला होता. या घटनेने संपूर्ण गोवा हादरला होता. या प्रकरणी म्हापसा पोलिसांनी चंद्रकांत नाईक याच्यासह चालक राजेश नाईक याच्याविरोधात निष्काळजीपणे वाहन चालवून नागरिकांचे जीव धोक्यात घालून सदोष मनुष्यवध केल्याप्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम 179 आणि 304 अ आणि मोटारवाहन कायद्याच्या विविध कलमांंतर्गत गुन्हा दाखल केला होता.

या खटल्यात पोलिसांना दोन गोष्टी सिद्ध करायच्या होत्या, बसची चाके अत्यंत खराब आहेत व हँडब्रेक काम करत नाही, याची पूर्वकल्पना असूनही चालकाने बस उतार असलेल्या रस्त्यावरून चालवण्याचा निष्काळजीपणा केला आणि दुसरी गोष्ट म्हणजे बस प्रमाणाबाहेर वेगात चालवली. या दोन्ही गोष्टींसाठी लागणारे ठोस पुरावे, साक्षी गोळा करण्यात पोलिसांना अपयश आले. या प्रकरणी न्यायालयाने नोंदवलेले निरीक्षण फार महत्त्वाचे आहे.

‘अपघातग्रस्त होऊ शकेल अशी बसची स्थिती असतानाही चालकाने बस रस्त्याच्या उतरतीवरून वेगाने नेली, ही बाब सिद्ध करण्यास पोलीस अपयशी ठरले.’, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. याला गोवा पोलिसांची अकार्यक्षमता म्हणायचे नाही तर काय म्हणायचे? वाहनचालकाने वाहन चालवण्यात जो निष्काळजीपणा केला व त्यामुळे सहा जणांचा मृत्यू झाला, तसाच निष्काळजीपणा पोलिसांनी तपासात दाखवल्यामुळे या दुर्घटनेतील दोन्ही आरोपी न्यायालयातून मुक्त झाले.

Panjim Bus Accident Case | Goa Police
Books: 'शब्दांकन' पुस्तकांच्या साहित्यप्रकारातील परकाया प्रवेश

न्यायालय जेव्हा आरोपीची ‘पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता’ करते, तेव्हा न्यायाधीशांना आरोपी दोषी असल्याचे तत्त्वतः मान्य असते. पण, न्यायाधीशांना काय वाटते, यापेक्षाही आरोप सिद्ध करण्यासाठी ठोस पुरावे न्यायालयासमोर सादर झाले आहेत, त्या प्रमाणे व त्या प्रमाणात निकाल दिला जातो. आता प्रश्न असा उभा राहतो की, त्या चार विद्यार्थिनींनी व दोन प्रवाशांनी पोलिसांचे असे काय घोडे मारले होते की, पोलिसांनी या प्रकरणाचा काळजीपूर्वक छडा लावला नाही?

नॅशनल क्राइम रेकॉर्डस् ब्यूरो (एनसीआरबी) यांच्या एका अहवालाप्रमाणे, गोव्यात घडलेल्या गुन्ह्यांचे न्यायालयात सिद्ध होण्याचे प्रमाण 19.8 टक्के आहे. गोव्याचा क्रमांक खालून सहावा लागतो. ज्याला ‘जंगल राज’ म्हणून हिणवले जाते त्या बिहारपेक्षाही दोन पायऱ्या आपण खाली आहोत. यावरून गोवा पोलिसांची अकार्यक्षमता सिद्ध होते.

गोव्याला ‘गंभीर गुन्ह्यां’चा इतिहास नाही. पण, गेल्या पाच वर्षांत खून, बलात्कार, जुगार, अमली पदार्थ, वेश्याव्यवसाय आणि मानवी तस्करी या प्रकरणांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. मुंबई एनसीबीने येथे येऊन घातलेल्या छाप्यांचे प्रमाण 90% आहे. अंमली पदार्थांच्या तस्करीचा सुगावा मुंबईत बसून नॉर्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोच्या अधिकाऱ्यांना लागतो, त्याची गंधवार्ताही गोव्यात गुन्हा घडूनही गोवा पोलिसांना नसते.

खरे तर, ‘नसते’ असे म्हणणे थोडे धाडसाचे ठरेल. पूर्ण कल्पना असते, फक्त त्याचे ‘अर्थपूर्ण’ धागे विणण्यात पोलिसांचा वेळ निघून जातो. पकडलेल्या मालात ‘आपला’ वाटा किती, याची सोय आधी पाहिली जाते. मुली, महिला यांच्या मानवी तस्करीची खबर सामाजिक संस्था जेव्‍हा पोलिसांना देऊन छापा टाकण्यास त्यांच्या समवेत जातात, तेव्हा तिथे कुणीच सापडत नाहीत.

उलट अशा संस्थांच्या सदस्यांना धमकीचे फोन येतात. घटनास्थळी कुणीच सापडत नाही, पण खबर कुणी दिली याची माहिती गुन्हेगारांना कशी मिळते? साधी हाणामारी झाली तरी पोलीस दोन्हीकडून ‘लोणी’ खाण्याच्या मर्कटलीला करतात, असा सामान्य गोमंतकीयांचा अनुभव आहे.समाजात गुन्हे कमी व्हावेत यासाठी जो पोलीस यंत्रणेचा वचक असायला हवा तोच नाही. त्यामुळे, गुन्हेगार निर्धास्तपणे गुन्हे करत राहतात आणि सामान्य माणूस पोलिसांना घाबरतात, त्यांच्यापासून चार हात लांब राहतात. बस दुर्घटनेत समजा कुणाचे मृत्यू झाले तर कोणती कलमे लावायची, तीच लावली जातात. सिद्ध करायच्या भानगडीत पोलीस बहुधा पडत नसावेत.

या दुर्घटनेत बसचे ब्रेक आयत्यावेळी फेल झाले होते की, ब्रेक फ्युइडच नव्हते याचा व बसचालक राजेश नाईकला बस दुसरीकडे वळवण्याचा पर्याय होता की, नाही यावर पोलिसांनी भर दिला नाही. इतरांचे जीव वाचवण्याचा प्रयत्न करण्याऐवजी स्वत:चा जीव वाचवण्यासाठी दोघांनी उड्या टाकल्या. चंद्रकांत नाईक तर चक्क पळून गेला होता. निगेल ग्रासिएस, प्रियल साळगावकर, डायना डायस आणि एल्विना डायस या चार विद्यार्थिनींच्या व जोझफिन डायस आणि दयानंद होबळे या दोन प्रवाशांच्या जिवाला काहीच किंमत नाही?

आपल्याला पोस्‍टिंग जिथे कमाई अधिक होते त्या भागांत मिळावी याच्या खटपटी करणे, प्रत्यक्षात पकडलेली रक्कम किंवा पदार्थ कमी करून सांगणे, वाटमारी करणे व इतर अनेक कामे करण्यात कार्यक्षम असणारे पोलीस खऱ्या गुन्हेगाराला न्यायालयातून शिक्षा होईल, असा तपास करण्यात मात्र कमालीचे अकार्यक्षम होतात.

Panjim Bus Accident Case | Goa Police
Coronavirus Update: चीन आपली भाऊबंदकी दाखवायला पुन्हा सज्ज झालाय..कोविडची लाट येतेय?

‘सगळेच खातात, मी का खाऊ नये?’ किंवा ‘कुठला तरी राजकारणी ढवळाढवळ करणारच आहे, मग तपासाला काय अर्थ?’ या प्रश्नांच्या आड लपून स्वत:च्या क्षमतेला मुद्दाम नजरेआड केले जाते. एरवी पाहताक्षणी गुन्हेगार ओळखण्याची दृष्टी पोलिसांजवळ असते, पण त्यामागचा दृष्टिकोन असत नाही.

शांती, सेवा, न्याय हे गोवा पोलिसांचे ब्रीदवाक्य आहे. आपल्या बोधचिन्हावर ‘सत्यमेव’ शब्दात सत्य आणि मेव अशी फारकत केल्यावर ‘मेवा’ खाणे हेच ‘सत्य’ झाल्यास नवल ते काय! ब्रीदासाठी प्राणार्पण वगैरे इतिहासजमा गोष्टींची अपेक्षाच नाही. पण, निदान आपले ब्रीद व लाज राखण्यासाठी तरी गोवा पोलिसांनी स्वत:मध्ये आमूलाग्र बदल घडवावा, हीच अपेक्षा!

समाजात गुन्हे कमी व्हावेत यासाठी जो पोलीस यंत्रणेचा वचक असायला हवा तोच नाही. त्यामुळे, गुन्हेगार निर्धास्तपणे गुन्हे करत राहतात आणि सामान्य माणूस पोलिसांना घाबरतात, त्यांच्यापासून चार हात लांब राहतात. बस दुर्घटनेत समजा कुणाचे मृत्यू झाले तर कोणती कलमे लावायची, तीच लावली जातात. सिद्ध करायच्या भानगडीत पोलीस बहुधा पडत नसावेत.

या दुर्घटनेत बसचे ब्रेक आयत्यावेळी फेल झाले होते की, ब्रेक फ्युइडच नव्हते याचा व बसचालक राजेश नाईकला बस दुसरीकडे वळवण्याचा पर्याय होता की, नाही यावर पोलिसांनी भर दिला नाही. इतरांचे जीव वाचवण्याचा प्रयत्न करण्याऐवजी स्वत:चा जीव वाचवण्यासाठी दोघांनी उड्या टाकल्या. चंद्रकांत नाईक तर चक्क पळून गेला होता. निगेल ग्रासिएस, प्रियल साळगावकर, डायना डायस आणि एल्विना डायस या चार विद्यार्थिनींच्या व जोझफिन डायस आणि दयानंद होबळे या दोन प्रवाशांच्या जिवाला काहीच किंमत नाही?

आपल्याला पोस्‍टिंग जिथे कमाई अधिक होते त्या भागांत मिळावी याच्या खटपटी करणे, प्रत्यक्षात पकडलेली रक्कम किंवा पदार्थ कमी करून सांगणे, वाटमारी करणे व इतर अनेक कामे करण्यात कार्यक्षम असणारे पोलीस खऱ्या गुन्हेगाराला न्यायालयातून शिक्षा होईल, असा तपास करण्यात मात्र कमालीचे अकार्यक्षम होतात.

‘सगळेच खातात, मी का खाऊ नये?’ किंवा ‘कुठला तरी राजकारणी ढवळाढवळ करणारच आहे, मग तपासाला काय अर्थ?’ या प्रश्नांच्या आड लपून स्वत:च्या क्षमतेला मुद्दाम नजरेआड केले जाते. एरवी पाहताक्षणी गुन्हेगार ओळखण्याची दृष्टी पोलिसांजवळ असते, पण त्यामागचा दृष्टिकोन असत नाही.

शांती, सेवा, न्याय हे गोवा पोलिसांचे ब्रीदवाक्य आहे. आपल्या बोधचिन्हावर ‘सत्यमेव’ शब्दात सत्य आणि मेव अशी फारकत केल्यावर ‘मेवा’ खाणे हेच ‘सत्य’ झाल्यास नवल ते काय! ब्रीदासाठी प्राणार्पण वगैरे इतिहासजमा गोष्टींची अपेक्षाच नाही. पण, निदान आपले ब्रीद व लाज राखण्यासाठी तरी गोवा पोलिसांनी स्वत:मध्ये आमूलाग्र बदल घडवावा, हीच अपेक्षा!

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com